सोमवार, ३० एप्रिल, २०१८
झी मराठी च्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता सोमनाथ तडवळकर यांची भूमिका
बुधवार, १८ एप्रिल, २०१८
मसला ( खुर्द) येथील अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे आमदार चव्हाण यांच्याकडून पहाणी
मसला ( खुर्द) येथील अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे आमदार चव्हाण यांच्याकडून पहाणी
जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार-आमदार मधुकरराव चव्हाण
=========================
काटी/ प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द ) येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता विजेच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानमुळी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील मागासवर्गीय वस्तीसह, गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, वादळी वाऱे एवढे मोठे होते घरावरील पत्रे दुरवर जाऊन कोसळले होते. नागरिक भयभीत झाले होते. मंगळवारपासून विद्युत पुरवठा खंडित झाला असून गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथील पाणीपुरवठाही बंद आहे.
आमदार मधुकरराव चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी दिवसभरात घराची पडझडीचे, फळबागा, शेतातील पत्र्याचे शेड, जनावरांचे गोठे, आदी नुकसानीचे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पंचनामे पुर्ण झाले आहेत. आमदार मधुकरराव चव्हाण यांनी बुधवारी दुपारी अडीच वाजता नुकसानग्रस्त मसला गावास भेट देऊन नुकसानीची पहाणी करुन मसला येथील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सुचना देऊन विद्युत पुरवठा सुरळीत होई पर्यंत पर्यायी व्यवस्था करुन येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना दिले. तसेच मसला खुर्द प्रमाणेच काटी येथेही झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नागरिकांशी सुसंवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले की, येथे झालेल्या नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, बीडीओ डवळशंख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धिरज पाटील, सभापती शिवाजीराव गायकवाड, सरपंच बालाजी नरवडे, उपसरपंच आबासाहेब पाटील, घनश्याम निंबाळकर, विकास काळदाते, दत्तात्रय खराडे, चेअरमन कल्याण काळदाते, मंडळ अधिकारी साळुंके, तलाठी निलेश काशिद, दत्ता कोळी, ग्रामसेवक ताटे, विस्तार अधिकारी, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गुरुवार, १२ एप्रिल, २०१८
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष तांबे यांचा दक्षता समितीच्या वतीने सत्कार संपन्न
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष तांबे यांचा दक्षता समितीच्या वतीने सत्कार संपन्न
नळदुर्ग/प्रतिनिधी
नळदुर्ग येथील पोलीस ठाणे ला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांचा दि 12 रोजी दक्षता समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच या पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून अतिशय कर्तव्यदक्ष पणे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संग्राम जाधव यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी दक्षता कमिटीच्या सदस्या कल्पनाताई गायकवाड, शाहिदाबी सय्यद, सुजाता चव्हाण, कस्तुराबाई कारभारी, जिजाबाई जाधव यांची उपस्थिती होती
मंगळवार, १० एप्रिल, २०१८
नळदुर्ग येथे धनगर समाजाचा भव्य महामोर्चा व रास्ता रोको
नळदुर्ग : राज्य शासनाने तात्काळ धनगर समाजाला अनुसुचित जमात प्रवर्गात समाविष्ठ करण्यासाठी नळदुर्ग येथील धनगर आरक्षण समीतीच्या वतीने दि. 13 एप्रील रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोका आंदोलन करण्यात येणार आसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला अनुसुचित जाती प्रवर्गात समाविष्ठ करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते मात्र आज सत्ता येवून ही तीन वर्षे झाली तरी ही भाजप शासन धनगर समाजाला अनुसुचित जाती प्रवर्गात समाविष्ठ करीत नाहीत, त्यांना आरक्षण देत नाहीत, दिलेल्या आश्वासनाचा भाजपा सरकारला विसर पडला असून या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आसल्याचे सांगण्यात येत आहे, शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार घोषणा करुन ही सोलापूर विदयापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आजून ही दिले नाही धनगर समाजाची फसवणुक केली आहे त्यामुळे याच्या निषेधार्थ नळदुर्ग येथील धनगर आरक्षण समीतीच्या वतीने दि. 13 एप्रील रोजी नळदुर्ग येथिल राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता किल्ला गेट पासून धनगर समाज बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, हा मोर्चा क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, शास्त्री चौक ते बसस्थानक असा निघणार असून हा मोर्चा बसस्थानकासमोर आल्यानंतर या मार्चाचे रुपांतर रास्तारोका आंदोलन मध्ये होणार आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, धनगर आरक्ष्ण समीतीचे अध्यक्ष पदमाकर घोडके, दयानंद चौरे, ज्ञानेश्वर घोडके, विलास येडगे, सोमनाथ गुडडे दहिटणा, बालाजी पाटील गुळहळळी, दिनेश सलगरे इटकळ, संजय घोडके, सुनिल बनसोडे लोहगाव, सुरेश बिराजदार, तानाजी घोडके, बलभीमराव पांढरे सिंदगाव, श्रीकांत कोकरे कुन्सावळी, गुणवंत रुपनुर बोळेगाव, नामदेव घोडके होर्टी, श्री तांदळे शहापूर तसेच नंदगाव, निलेगाव, देवसिंगा, सराटी, खुदावाडी, केशेगाव, निलेगाव, धनगरवाडी, खानापूर, येवती, चिवरी उमरगा, चिवरी, आरळी, कार्ला, कांक्रंबा, वानेगाव, बारुळ, बेंबळी, दिंडेगाव, तामलवाडी, काळेगाव, यमगरवाडी, काटी सावरगाव, काटी, यासह तालुक्यातील सर्वच धनगर समाजाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त 14 एप्रिल रोजी मद्य विक्री बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त
14 एप्रिल रोजी मद्य विक्री बंद
उस्मानाबाद, दि.10:- उस्मानाबाद जिल्हयात दि. 14 एप्रिल ते दि. 30 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा होतो. या निमित्ताने जिल्हयात दि. 14 एप्रिल रोजी मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते.
तसेच दि. 12 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत सोनारी ता. परंडा येथे श्री. काळभैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होणार आहे. या यात्रेत 3 ते 4 लाख भाविक दर्शनासाठी येतात.
या कालावधीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम क्रं. 142 (1) अन्वये उस्मानाबाद जिल्हयात दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असल्यामुळे जिल्हयातील सर्व देशी, विदेशी, एफएल,बीआर-2, परवानाकक्ष बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच दि. 12 एप्रिल ते दि. 14 एप्रिल या कालावधीत श्री. काळभैरवनाथ परिसरातील व मौजे सोनारी गावातील सर्व सर्व देशी, विदेशी, एफएल,बीआर-2, परवानाकक्ष बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन आंदोलन
शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन आंदोलन
तुळजापूर (प्रतिनिधी) :-
शेतकयांच्या भाजीपाल्यास हमीभाव मिळणे, विमा संरक्षण मिळणे बाबत दि. 26 मार्च रोजी दिलेल्या निवेदनावर कोणतीही उपाय योजना न केल्याने, दि. 10 एप्रिल (मंगळवार) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री, यांना निवेदन देवून, शासनाचा निषेध म्हणून तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको" व मोफत भाजीपाला वाटप करुन अंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सद्यस्थितीमध्ये भाजीपाल्याचे भाव पडलेले आहेत, त्यामुळे राज्यातील शेतकरी हे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत, त्यामुळे शेतकयांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
ज्याप्रमाणे गुजरात राज्यामध्ये भाजीपाल्यास हमीभाव दिला जातो, त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकयांना भाजीपाल्यास हमीभाव दिला जावा. तसेच इतर शेती मालाप्रमाणे भाजीपाल्याला विमा संरक्षण देण्यांत यावे, जेणेकरुन शेतकयांना मोठे आर्थिक नुकसान होणार नाही.
तसेच शहरी व ग्रामीण भागामध्ये आठवडा बाजार व रोजच्या भरणाया बाजारांमध्ये व्यापारी हे जागा धरुन बसत असल्याने, शेतकयांना सदर बाजारामध्ये जागा उपलब्ध होत नाही. त्यासाठी सदर ठिकाणी शेतकयांसाठी 50 टक्के जागा आरक्षीत करण्यात यावी व त्या जागेत व्यापायांना बसण्यास मज्जाव करावा.
तुर, हरभरा हमी केंद्र सुरु केले आहेत, परंतु ते फक्त नावापुरतेच सुरु आहेत. शेतकयांना चाळणीसाठी व हमालीसाठी दोनशे ते चारशे रुपये द्यावे लागत आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावे.
वरील मागण्यासाठी दि. 26 मार्च रोजी तहसिल
दार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याबाबत शासनाने कोणतीही उपाय योजना न केल्याने दि. 10 एप्रिल (मंगळवार) रोजी शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर सकाळी 11-30 वाजता "रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन अंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनंजय पेंदे, गुरव भोजने, बाळासाहेब जगताप, विष्णु गाटे जगदीश पलंगे, गणेश बेले, प्रदीप जगदाळे, शहाजी जगदाळे, चंद्रकांत नरुळे, संतोष भोजने, जयाजी जगदाळे, नाना साळुंके, राजा हाके, नितेश गाटे, संतु भोजने, विकास मारडे, विकास भोरे, जालींदर जाधव, संजय भोसले, संतोष कणे इत्यादीसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा
काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा
तुळजापूर -न्यूज सिक्सर प्रतिनिधी
तुळजापूर काँग्रेस च्या वतीने दि 17 रोजी जिल्हा बँकेचे संचालक काँग्रेस चे युवा नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसण्यात येणार आहे या उपोषणामध्ये तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस चे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत हे उपोषण महावितरणच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात असणार आहे अनेकदा निवेदने देऊन ही महावितरण कडून दखल घेतली जात नाही यामध्ये शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे हे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता आर आर पेंढारकर यांना देन्यात आले असून यावेळी तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष तानाजी जाधव,माजी पंचायत समिती सदस्य अरुण दळवी,सुरेश कोकरे यांची उपस्थिती होती
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज
उस्मानाबाद, दि.20 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...
-
उस्मानाबाद, दि.20 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...
-
तुळजापुर/ ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदीरात शुक्रवार दि 17 रोजी पहाटे अभिषेक पास काढण्यावरुन भाविक व घुसखोर पा...
-
मुंबई, दि. 06 दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्...