मंगळवार, १० एप्रिल, २०१८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त 14 एप्रिल रोजी मद्य विक्री बंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त

14 एप्रिल रोजी मद्य विक्री बंद

उस्मानाबाद, दि.10:- उस्मानाबाद जिल्हयात दि. 14 एप्रिल ते दि. 30 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा होतो. या निमित्ताने जिल्हयात दि. 14 एप्रिल रोजी मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. 

तसेच दि. 12 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत सोनारी ता. परंडा येथे श्री. काळभैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होणार आहे. या यात्रेत 3 ते 4 लाख भाविक दर्शनासाठी येतात. 

या कालावधीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम क्रं. 142 (1) अन्वये उस्मानाबाद जिल्हयात दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असल्यामुळे जिल्हयातील सर्व देशी, विदेशी, एफएल,बीआर-2, परवानाकक्ष बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

तसेच दि. 12 एप्रिल ते दि. 14 एप्रिल या कालावधीत श्री.  काळभैरवनाथ परिसरातील व मौजे सोनारी गावातील सर्व सर्व देशी, विदेशी, एफएल,बीआर-2, परवानाकक्ष बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...