बुधवार, १८ एप्रिल, २०१८

मसला ( खुर्द) येथील अवकाळी  पाऊस, वादळी वाऱ्याने झालेल्या  नुकसानीचे  आमदार  चव्हाण  यांच्याकडून  पहाणी 

मसला ( खुर्द) येथील अवकाळी  पाऊस, वादळी वाऱ्याने झालेल्या  नुकसानीचे  आमदार  चव्हाण  यांच्याकडून  पहाणी 

जास्तीत जास्त  मदत  मिळवून  देण्यासाठी  शासनाकडे  पाठपुरावा  करणार-आमदार  मधुकरराव चव्हाण

=========================

काटी/ प्रतिनिधी  तुळजापूर  तालुक्यातील मसला (खुर्द )  येथे  मंगळवारी सायंकाळी  साडेपाच वाजता  विजेच्या  गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावस, गारपीट,  वादळी  वाऱ्यामुळे  झालेल्या नुकसानमुळी  येथील  नागरिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान  झाले  असून येथील  मागासवर्गीय वस्तीसह, गावातील अनेक  घरांवरील पत्रे उडून गेले अनेक  घरांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान  झाले, वादळी वाऱे एवढे  मोठे  होते घरावरील पत्रे दुरवर  जाऊन  कोसळले होते.  नागरिक  भयभीत  झाले होते. मंगळवारपासून  विद्युत  पुरवठा खंडित  झाला  असून गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.   विद्युत  पुरवठा  खंडित  झाल्याने  येथील पाणीपुरवठाही  बंद  आहे. 

           आमदार  मधुकरराव चव्हाण  यांनी  उपविभागीय  अधिकारी चेतन  गिरासे   यांना  तात्काळ  पंचनामे  करण्याचे  आदेश  दिले होते.  बुधवारी  दिवसभरात  घराची पडझडीचे, फळबागा,  शेतातील पत्र्याचे शेड,  जनावरांचे गोठे, आदी नुकसानीचे जवळपास  सत्तर ते ऐंशी टक्के  पंचनामे  पुर्ण  झाले आहेत.   आमदार  मधुकरराव चव्हाण  यांनी बुधवारी  दुपारी  अडीच वाजता  नुकसानग्रस्त मसला गावास भेट देऊन नुकसानीची पहाणी करुन  मसला येथील  विद्युत पुरवठा   तात्काळ सुरळीत  करण्याच्या  सुचना देऊन  विद्युत पुरवठा  सुरळीत  होई पर्यंत पर्यायी  व्यवस्था  करुन  येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय  करण्याचे आदेश   उपविभागीय अधिकारी  यांना  दिले. तसेच मसला खुर्द  प्रमाणेच काटी  येथेही झालेल्या  नुकसानीचे पंचनामे  करण्याचे आदेश दिले.  नागरिकांशी  सुसंवाद  साधताना  आमदार  चव्हाण  म्हणाले की,   येथे झालेल्या  नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त  नुकसान  भरपाई  मिळवून  देण्यासाठी  शासनाकडे  पाठपुरावा  करणार  असल्याचे  त्यांनी  यावेळी  ग्रामस्थांना आश्वासन दिले. 

             उपविभागीय अधिकारी  चेतन गिरासे, बीडीओ डवळशंख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  धिरज पाटील,  सभापती  शिवाजीराव  गायकवाड,   सरपंच  बालाजी नरवडे, उपसरपंच  आबासाहेब  पाटील,   घनश्याम  निंबाळकर,   विकास  काळदाते,  दत्तात्रय  खराडे, चेअरमन  कल्याण  काळदाते, मंडळ अधिकारी  साळुंके,  तलाठी  निलेश काशिद,  दत्ता कोळी,  ग्रामसेवक  ताटे, विस्तार अधिकारी,  आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...