शुक्रवार, १५ मार्च, २०१९

गया फाऊंडेशन च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी स्नेहल शहाणे यांची निवड

गया फाऊंडेशन च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी स्नेहल शहाणे यांची निवड

तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील सौ.स्नेहल पंकज शहाणे ह्या त्यांचे पती पंकज शंकरराव शहाणे यांच्या सोबत बऱ्याच वर्षापासून अनेक सामाजिक कार्य त्यांनी पतीसोबत केलेले पाहुनच सौ.स्नेहल पंकज शहाणे, यांची समाजभुषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यांत आली आहे.

गया फाऊंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमीत्त मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

तुळजापूर येथील पावन नगरीची सौ.स्नेहल पंकज शहाणे, यांची या वर्षीच्या समाजभुषण राज्यस्तरीय पुरस्कासाठी निवड करण्यांत आली असून, सदरील पुरस्कार रविवार, (दि. १७) मार्च रोजी अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यांत येणार आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १४ मार्च, २०१९

​शिवसेनेला बसणार मोठा धक्का उस्मानाबाद तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा देवदत्त मोरे यांचे कट्टर विरोधक असलेले गणेश जमाले राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात शेकडो समर्थकासह अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

​शिवसेनेला बसणार मोठा धक्का

उस्मानाबाद तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा देवदत्त मोरे यांचे कट्टर विरोधक असलेले गणेश जमाले राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात 

शेकडो समर्थकासह अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

उस्मानाबाद/प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुका युवा सेना तालुकाप्रमुख गणेश जमाले राष्ट्रवादीत काँग्रेस च्या संपर्कात असून  लवकर च ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे   शिवसेनेत मोठ्या ताकतीने काम करणारे नेतृत्व म्हणुन गणेश जमाले यांची ओळख आहे युवा सेनेच्या माध्यमातुन युवकांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे मौजे कसबे तडवळा येथे देवदत्त मोरे पँनल ला धुळ चारत ग्रामपंचायत वर सत्ता मिळवली आहे शिवसेनेची मोठी फळी गणेश जमाले यांनी उभी केली आहे त्यात पक्षासाठी फार मोठे योगदान दिले आहे आपल्या सामाजिक कार्यातुुन त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली असून  विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत  शिवसेनेचे जनमत बनवले आहे त्यामुळे त्यांचा एक मोठा चाहता वर्ग समर्थक तालुका व परिसरात आहेत शिवसेना पक्षाने जर देवदत्त मोरे यांना पक्ष प्रवेश दिला तर खूप मोठा फटका  शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत बसणार आहे याबाबत गणेश जमाले यांना विचारले असता त्यांनी आपले पुढील प्रमाणे मत व्यक्त केले 

देवदत्त मोरे यांनी शिवसेेना पक्षाच्या व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करून त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीस  शिवसेना पक्षात प्रवेश देत  आहे याचे वाईट वाटत असून माझे समर्थक ही नाराज झाले आहेत म्हणून मी माझ्या उस्मानाबाद तालुक्यातील शेकडो समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार,आमदार रणाजगजीतसिंह पाटील,पार्थ पवार यांच्या उपस्थिती मध्ये काही दिवसात प्रवेश करणार आहे 

गणेश जमाले

तालुकाप्रमुख युवा सेना उस्मानाबाद




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शिवसेना, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना उस्मानाबादमध्ये सस्पेन्स कायम


शिवसेना, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना

उस्मानाबादमध्ये सस्पेन्स कायम

उस्मानाबाद/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची घोषणाहून चार दिवसांचा कालावधी लोटला तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँगेसचा उमेदवार ठरलेला नाही.शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आपली दावेदारी कायम असल्याचे सांगत असले तरी संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने सेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे व माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांची नावे आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील की त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या नावावर अजून सस्पेन्स कायम आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

 

उस्मानाबादमधील कोणत्याही निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. आता तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. १९९६ पासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर याठिकाणी कोणत्याच उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी मतदारांनी दिली नाही. त्यामुळे या इतिहासाची पुनरावती झाली तर उस्मानाबादचा खासदार हा नवाच असणार यामध्ये तिळमात्र शंका नाही.

 

१९९६ साली सर्वप्रथम शिवसेनेचे शिवाजी उर्फ बापू कांबळे विजयी झाले होते. त्यानंतर १९९८ मध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे विजयी झाले होते. १९९९ मध्ये पुन्हा शिवसेनेचे शिवाजी उर्फ बापू कांबळे विजयी झाले तर २००४ साली सेनेच्या कल्पना नरहिरे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री ढोबळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यानंतर २००९ साली राष्ट्रवादीचे डॉ. पद्यसिंह पाटील पाच हजार मतांने विजयी झाले होते तर २०१४ साली सेनेचे रवींद्र गायकवाड मोदी लाटेत विक्रमी मताने विजयी झाले होते.

 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बरीच बदलली आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने यंदाची लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की. सेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा लोकसभेला उमेदवारी मिळेल असे वाटत होते. परंतु गेल्या १५ दिवसांतील मुंबईतील मातोश्रीवर वेगळ्याच हालचाली होत आहेत. त्यामुळे उमेदवार बदलण्याची शक्यता सर्वाधिक आहे. नुकत्याच झालेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत उस्मानाबाद व मावळ मतदारसंघातील खासदारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब नाही असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्याशिवाय उस्मानाबाद व मावळ वगळता सर्व खासदारांना पुन्हा कामाला लागा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या उस्मानाबाद मतदासंघात उमेदवार बदलाची शक्यता अधिक आहे.

 

नवा चेहऱ्यास उमेदवारी देण्याचे ठरल्यास उस्मानाबाद  जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी खासदार गायकवाडवर नाराज असलेल्या गटाने घेतली आहे. त्यासोबतच खोचरे यांचे मुंबईतील संबध पाहता त्यांचे नाव या क्षणीतर आघाडीवर आहे. याशिवाय माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांच्या नावावर देखील चर्चा झाली. मात्र, त्यांचा रस लोकसभेपेक्षा उस्मानाबाद विधानसभसाठी अधिक असल्याने त्यांचे नाव थोडंस मागे पडले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नावच फायनल केले असल्याचे समजते. मात्र, त्यांनी अजून होकार अथवा नकार कळविला नसल्याने कोण निवडणूक लढविणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. उस्मानाबाद झेडपीच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून मतदारसंघात सर्वत्र प्रचार सुरू केला आहे. मात्र, अचानक राणाजगजीतसिंह पाटील त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील पती-पत्नीपैंकी एकाचे नाव फायनल होणार हे मात्र निश्चीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या घरीच राहणार आहे. केवळ त्यांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे.

 

 

उस्मानाबादच्या जागेवर भाजपची दावेदारी

दरम्यान, सेनेकडून सर्वसंमतीने उमेदवार ठरत नसल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागा भाजपला सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा भाजपकडून पण उस्मानाबादची जागा भाजपला सोडावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतत्वाखाली करण्यात आली होती. मात्र, विद्यमान खासदारांची जागा शिवसेना सोडेल असे सध्या तरी वाटत नाही.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्र्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

 

बुधवार, १३ मार्च, २०१९

सुजित हंगरगेकर यांची काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर विधानसभा वक्तापदी निवडीबद्दल सत्कार

सुजित हंगरगेकर  यांची काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर विधानसभा वक्तापदी  निवडीबद्दल  सत्कार

 काटी/प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व आमदार मधुकरराव चव्हाण  यांचे कट्टर समर्थक सुजित  हंगरगेकर  यांची बुधवार दि.6 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस वक्ता व प्रवक्ता प्रशिक्षण शिबीरात तुळजापूर विधानसभा वक्ता म्हणून निवड करण्यात आल्याने शनिवार ( 9 ) व सोमवार (11) रोजी  काटी काँग्रेस कमिटी व सावरगाव  येथील  महात्मा  फुले  प्रतिष्ठानच्या वतीने सुजित  हंगरगेकर  यांचा यथोचित सत्कार  करून  शुभेच्छा दिल्या.        

      यावेळी माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, अतुल सराफ, जितेंद्र  गुंड, करीम बेग, अहमद पठाण, सुहास  साळुंके, भैरी काळे, अविनाश  वाडकर, प्रा.भारत गुरव, महात्मा फुले  प्रतिष्ठान  सावरगावचे अध्यक्ष  भारत डोके, बालाजी राऊत,  अशोक माळी, सचिन राऊत,  ज्ञानेश्वर  माळी, राजु डोके, उमेश मारवडकर,  प्रतिक डोके, नागनाथ  बनसोडे, नानासाहेब  जानकर,  सुरज बनसोडे,  महेश  कांबळे,  नागनाथ  सोनवणे, नामदेव  काळे, शिवलिंग  घाणे, बाळासाहेब  डोके,  त्रिगुणशिल साळुंके, भाऊ क्षिरसागर, सयाजी  गायकवाड,   चंद्रकांत  काटे,  सुनिल  परीट, बाळा जाधव, राजु हांडे, भाऊ क्षिरसागर,  आदी मान्यवर उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत -13/03/2019

 दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरी चोरीतील गेला माल जप्त 

 

दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद :-  दिनांक 01.03.2019 रोजी इंदापुर ता.वाशी येथील इंदापुर फाटयाजवळ सुर्या ढाबा ते येरमाळा चौरस्ता पुढे रात्री 11.00 ते 11.30 वा.पावेतो ट्रक क्र. के.ए. 32 डी 0909 या ट्रकची ताडपत्री फाडून ट्रक मधील sigma XXX कंपनीचे 10  टायर चोरटयांनी चोरून नेले बाबत पोलीस ठाणे येरमाळा येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील गेला माल sigma XXX कंपनीचे 5 टायर हे दिनांक 12.03.2019 रोजी गोजवाडा शिवारात विक्रीसाठी शिवाजी उर्फ चिवळया बप्पा काळे रा.लोणखस पारधी पिढी हा घेवून आल्याची माहिती  गुप्त बातमीदारमार्फत मिळाल्याने दरोडा प्रतिबंधक पथक हे गोजवाडा शिवारात गेले असता sigma XXX कंपनीचे 5 टायर जागेवर सोडून आरोपी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला व सदर गुन्हयातील जप्त मुद्देमाल दरोडा प्रतिबंधक पथकाने पोलीस ठाणे येरमाळा येथे जमा केला आहे.

 दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरी जबरी चोरीमधील फरार आरोपी अटक 

 

दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद :-  दिनांक 10.03.2019 रोजी  20.30 ते 21.00 वा.चे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर  बायपास रोड उस्मानाबाद येथे नारायण एकनाथ नागरगोजे रा.लिंबा (खांबा) ता.शिरुर जि.बीड हे त्यांचे कंटेनर क्र. एम.एच. 46 बी.बी. 914 मधुन राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर विदयामाता हायस्कुलच्या पुढे बायपास रोड उस्मानाबाद येथे गतिरोधकावर गाडीचा वेग कमी झाल्याने        1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड दोघे रा. जहागिरदारवाडी तांडा ता.जि.उस्मानाबाद व एक अनोळखी व्यक्ती यांनी नारायण नागरगोजे यांच्या कंटेनरच्या समोर येवुन गाडी आडवुन गाडीमध्ये चढून नारायण नागरगोजे यांना दगडाने व चापटाने मारहान करुन त्यांचे खिशातील सॅमसंग जे 7 कंपनीचा मोबाईल किं.अं. 10,000/- रु. व रोख रक्कम 7,000/-रु. असा एकूण 17,000/- रु चा माल हिसकावुन घेवून मोटारसायकलवरुन पळून गेले. म्हणून नारायण एकनाथ नागरगोजे यांचे फिर्यादवरून 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड दोघे रा. जहागिरदारवाडी तांडा ता.जि.उस्मानाबाद व एक अनोळखी व्यक्ती यांचे विरुध्द दिनांक 11.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 394,341,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जबरी चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड दोघे रा.जहागिरदारवाडी तांडा ता.जि.उस्मानाबाद यांना दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 92 लोकांवर कारवाई 

 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 12/03/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 92 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी  19 हजार 300  रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

2

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापा 1,16,060/- रु. चा माल जप्त 

 

पोलीस स्टेशन ढोकी :-  दिनांक 12.03.2019 रोजी 16.10 वा. प्रदिप व्याय यांचे शेतात वडाचे झाडाखाली मौजे तेर येथे 1) महादेव बळीराम थोरात 2) राजेंद्र लक्ष्मण कोकरे 3) काका मारुती देवकते 4) श्रीमंत सुब्राव रामगुडे 5) शरद सदाशिव एडके सर्व रा. तेर ता.जि.उस्मानाबाद हे गोलाकार बसुन बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम व साहित्यासह एकुण 1,16,060/- रुपयाचे मालासह मिळुन आले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी  पोलीस स्टेशन ढोकी येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन ढोकी  यांनी केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

 

 उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे 47,238/- रु. चा माल जप्त 

 

 

 

 

पोलीस स्टेशन बेंबळी :-  दिनांक 12.03.2019 रोजी 2052 वा. तुळजाभवानी हॉटेलसमोर पाडोळी शिवार येथे जीवन लक्ष्मण पवार रा.समुद्रवाणी तांडा ता.जि.उस्मानाबाद याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी विदेशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 16 बाटल्या किं.अं. 1,280/-रु. विदेशी दारुच्या 4 बाटल्या किं.अं. 800/- रु. असा एकूण 2,080/-रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व पोलीसांची चाहूल लागताच प्रो.गुन्हयाचा माल जागीच सोडून पळुन गेला म्हणून जीवन लक्ष्मण पवार याचेविरुध्द  दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन बेंबळी यांनी केली आहे.

 पोलीस स्टेशन तुळजापूर :-  दिनांक 12.03.2019 रोजी 17.45 वा. कसई चौकात समृध्दी धाब्यात कसई येथे 1) राजकुमार विराप्पा सगट रा.सरडेवाडी ता.तुळजापूर हा  विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 88 बाटल्या किं.अं. 4,576/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व 2) महेश रामचंद्र सुरवसे रा.कसई ता.तुळजापूर हा पळून गेला म्हणून  वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली असुन राजकुमार विराप्पा सगट यास अटक करण्यात आली आहे.  

पोलीस स्टेशन तुळजापूर :-  दिनांक 12.03.2019 रोजी 19.05 वा. वासुदेव गल्ली तुळजापूर येथे उमेश बिभिषण भोजणे रा.तुळजापूर खुर्द याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 30 लिटर गाहभ दारु किं.अं. 1,600/- रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून उमेश बिभिषण भोजणे याचेविरुध्द दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन तुळजापूर यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.  

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 12.03.2019 रोजी 19.00 वा. काळे प्लॉट उमरगा येथे शिवजी सखाराम ढवळे रा.काळे प्लॉट उमरगा याने  विनापास परवाना बेकादेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 10 लिटर गाहभ दारु किं.अं. 400/- रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून शिवजी सखाराम ढवळे याचेविरुध्द दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उमरगा यांनी केली आहे.

 

3

 

पोलीस स्टेशन वाशी :-  दिनांक 13.03.2019 रोजी 10.00 वा. सुनिल विशाल शिंदे रा. मांडवा ता.वाशी हा त्याचे  मांडवा गावातील पुलाजवळ त्याचे कब्जात देशी विदेशी दारुच्या 19 बाटल्या किं.अं. 2,690/-रु व 15 लिटर गाहभ दारु किं.अं. 900/-रु असा एकूण 3,590/- रु. चा माल बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी विदेशी दारु व गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून सुनिल विशाल शिंदे याचेविरुध्द  दिनांक 13.03.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन वाशी यांनी केली आहे.

 

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 13.03.2019 रोजी 10.00 वा. कोरेगाव येथील कोरेगाववाडी जाणारे रोडचे ठिकाणी ता.उमरगा येथे 1) भरत नामदेव देडे रा.मुरली ता.उमरगा 2) महाळप्पा मारुती घोडके रा.महादेव गल्ली उमरगा ता.उमरगा यांनी देशी दारुच्या 96 बाटल्या किं.अं. 4,992/- रु. चा प्रो .गुन्हयाचा माल देशी दारु विनापरवाना बेकायदेशिर‍ रित्या जवळ बाळगुन तिची चोरटी विक्री करत असताना टी.व्ही.एस. स्टार सिटी मोटार सायकल क्र. एम.एच. 25 ए.सी. 7164 जु.वा.किं.अं. 30,000/-रु असा एकुण 34,992/-रु च्या मालासह मिळुन आले म्हणून 1) भरत नामदेव देडे 2) महाळप्पा मारुती घोडके यांचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उमरगा यांनी केली आहे.

 

 

 उमरगा येथे जबरी चोरी 

 

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 12.03.2019 रोजी 11.45 वा. गटशिक्षण कार्यालय, गेटसमोरील रोडवर उमरगा येथे पंढरीनाथ विश्वनाथ सुर्यवंशी रा.बालाजी नगर उमरगा ता.उमरगा हे बँकेतुन काढलेले रोख रक्कम 3,00,000/- रु. व एसबीआय बॅकेचे पासबुक , आयसीआयसीआय बॅकेचे चेकबुक असलेली पिशवी घराकडे घेवून जात असताना दोन अज्ञात चोरटयाने मोटार सायकल वर येवून पंढरीनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने त्यांचे हातातील पिशवी हिसकावून घेवून पळून गेले आहेत. म्हणून पंढरीनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांच्या फिर्यादवरून दोन अज्ञात ईसमाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ परंडा येथे चोरी करण्याचा प्रयत्न गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 11.03.2019 रोजी 20.00 ते दिनांक 12.03.2019 रोजी 08.00 वा.चे दरम्यान विलास महादेव शिंदे रा. देवगाव खु ता. परंडा जि.उस्मानाबाद यांचे परंडा येथील बालाजी इलेक्ट्रीक दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाच्या तरी सहाय्याने अर्धवट उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून विलास महादेव शिंदे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 457,380,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 मौजे ढेकरी शिवारात दोन म्हशींची चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तुळजापूर :-  दिनांक 11.03.2019 रोजी 20.00 ते 12.03.2019 रोजी 06.00 वा.चे दरम्यान आनंद गौतम जाधव रा.ढेकरी ता.तुळजापूर यांचे ढेकरी शिवारातील शेत गट नं. 458 मधील पत्र्याचे शेड समोर बांधलेल्या दोन म्हशी किं.अं. 75,000/- रु च्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्या आहेत म्हणून आनंद गौतम जाधव यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

 ओएलएक्स कंपनीचे वेबसाईटवरुन ऑनलाईन फसवणूक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद :-  दिनांक 08.03.2019 रोजी ते दिनांक 10.03.2019 रोजी चे दरम्यान सारोळा बु येथे व उस्मानाबाद येथे देवानंद उत्तम आगाशे रा.सारोळा बु. ता.जि.उस्मानाबाद यांनी ओएलएक्स कंपनीचे वेबसाईटवर ऑनलाईन गाडीची खरेदी विक्री पाहीली असता देवानंद आगाशे याना वेबसाईटवर साहील कुमार मो.नं. 8905132883 या व्यक्तीने स्वीफट डिझायर कार सन 2013 चे मॉडेल असलेली 2,30,000/- रु किंमतीची कार 2,00,000/- रु किंमतीस पाठवून देतो असे सांगून देवानंद आगाशे यांचे कडून साहील कुमार याने वेगवेगळया दोन पेटीएम व एक फोन पे अकाऊंट वर 1,41,400/- रु. देवानंद उत्तम आगाशे यांना टाकण्यास सांगुन देवानंद उत्तम आगाशे यांना स्विफ्ट डिझायर कार न देता देवानंद उत्तम आगाशे यांची फसवणुक केली म्हणून देवानंद उत्तम आगाशे यांचे फिर्यादवरून साहील कुमार मो.नं. 8905132883 याच्याविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे बेंडकाळ येथे अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु 

 

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 22.02.2019 रोजी 11.00 वा. गोरोबा भानुदास गवळी (मयत) रा.बेंडकाळ ता.लोहारा हे बेंडकाळ ते लोहारा रोडने पायी चालत जात असताना अज्ञात मोटारसायकल चालकाने त्याचे ताब्यातील मोटारसायकल हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून गोरोबा भानुदास गवळी यांना पाठीमागुन जोराची धडक देवून गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला व जखमीस उपचारास घेवून न जाता व अपघाताची खबर पोलीसांना न देता निघुन गेला वगैरे मयताचे कागदपत्र पोलीस स्टेशन सदर बाजार सोलापूर येथुन आ.मृ. नं. 00/19 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे प्राप्त झालेवरून अंगद गोरोबा गवळी रा.बेंडकाळ ता.लोहारा यांचे फिर्यादवरून अज्ञात मोटारसायकल चालकाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोली स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 279,304(अ),338 सह मोवाकाचे कलम 134(अ)(ब),184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ उस्मानाबाद येथे धारदार चाकू बाळगुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 12.03.2019 रोजी 18.30 वा.सु. 1) संदीप अनुरथ गायकवाड रा.एस.टी.कॉलनी उस्मानाबाद 2) धनंजय रामहरी अनभुले रा.सांजा हे बस स्थानक समोर उस्मानाबाद येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने त्यांच्याजवळील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.ई. 2848 वर धारदार चाकू कब्जात बाळगुन घेवून फिरत असताना मिळुन आले व मा.जिल्हाधिकारी सो यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 34 सह भा.ह.कायदयाचे कलम 4/25 सह मपोकाचे कलम 137(1)(अ)   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 12.03.2019 रोजी 15.30 वा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर उडाणपुलाजवळ उस्मानाबाद येथे संजय सुभाष कोरे रा. तावशी गड ता.लोहारा जि.उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र. के.ए. 32 जी 4174 यामध्ये सळई भरुन हयगयीने व निष्काळजीपणे रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अति वेगाने चालवून दुसऱ्याचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने चालवित असताना मिळुन आला म्हणून सुजय सुभाष कोरे याचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

5

 मौजे शिराळा येथे महावितरण कंपनीचे लोखंडी पोल कट करुन नुकसान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 09.03.2019 रोजी 22.00 वाचे नंतर अज्ञात इसमाने 11 केव्ही शिराळा शेती पंप फिडरवरील शहाजी बाजीराव गडदे व शिवाजी ढोरे यांचे बांधावरील महावितरण कंपनीचा डिपी 100 केव्हीए क्षमतेच्या डीपीचेलोखंडी पोल अज्ञात इसमाने गॅस कटरच्या साहयाने कट करुन महावितरण कंपनीचे 2,00,000/-रु. चे नुकसान केले म्हणून दत्तात्रय देविदास दसपुते सहायक अभियंता शाखा कार्यालय, शिराळा आ.म.रा.वि.वि.कं. उपविभाग परंडा यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 427 सह 140 भारतीय विदयुत कायदा 2003 चे कलम 140 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 तुळजापूर येथे ओमीनी कारची पादचाऱ्यास धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तुळजापूर :-  दिनांक 09.03.2019 रोजी  14.30 वा.सु. सुरज शिवाजीराव मोरे रा.एस.टी.कॉलनी तुळजापूर हे वैष्णवी हॉटेल तुळजापूर येथून चहा घेवुन पायी चालत लातुर रोडवर आले असता पाठीमागून ओमीनी मारुती कार क्र. एम.एच. 42 ए.एस.7514 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील मारुती कार ही भरधाव वेगात हयगईने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन सुरज शिवाजीराव मोरे यांना जोराची धडक देवुन डोक्यास, पोटास व दोन्ही पायास किरकोळ व गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला म्हणून सुरज शिवाजीराव मोरे यांचे फिर्याद वरुन ओमीनी मारुती कार क्र. एम.एच. 42 ए.एस.7514 चा चालक याचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 279,337,338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 “ कळंब येथे ट्रक व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यु गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन कळंब :-  दिनांक 09.03.2019 रोजी 21.00 वा. ते दिनांक 13.03.2019 रोजी 00.30 वा.चे रोहीत रत्नाकर काटे (मयत) रा.दत्तनगर नांदेड ता.जि.नांदेड ह.मु. गांधीनगर कळंब हे बस स्थानक कळंब येथुन मोटारसायकल क्र. एम.एच. 26 ए.व्ही. 9272 वर बसुन कळंब चौकाकडे जात असताना फाटक यांच्या दुकानासमोर कळंब येथे पाठीमागुन ट्रक क्र. एम.एच. 43 ई 3425 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ऊसाने भरलेली ट्रक हयगईने व निष्काळजीपणे चालवुन रोहीत काटे यास जोराची धडक देवून गंभीर जखमी केले व जखमीस दवाखान्यात न नेता व अपघाताची माहिती पोलीसांना दिली नाही. तेथील लोकांनी रोहीत काटे यास उपचारासाठी स.द.कळंब येथे दाखल केले तेथुन पुढील उपचारासाठी स.द.अंबाजोगाई येथे दाखल केले असता तेथे रोहीत रत्नाकर काटे याचेवर उपचार चालू असताना तो दिनांक 10.03.2019 रोजी 00.30 वा मयत झाला आहे. म्हणून रोहीत रत्नाकर काटे याचे मामा निलेश अनंतराव काळे रा.गांधीनगर कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद यांचे फिर्यादवरुन ट्रक क्र. एम.एच. 43 ई 3425 चा चालक याचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 279,304(अ),338 सह मोवाकाचे कलम 134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

6

 उस्मानाबाद येथे भरधाव वेगात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हे नोंद 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 12.03.2019 रोजी 18.35 वा. सेन्ट्रल बिल्डींग समोर उस्मानाबाद येथे प्रदिप सुरेश कांबळे रा.तांबरी विभाग उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्र. एम.एच. 25 ए.जी. 9090 ही लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवित असताना मिळुन आला म्हणून प्रदिप सुरेश कांबळे याचेविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 279 सह मोवाकाचे कलम 3(1)/181,239/177,130(3)/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, ३ मार्च, २०१९

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन



लोहारा/ प्रतिनिधी


लोहारा शहरातील ग्रामदैवत श्री शंभू महादेव यांच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सव दि ४ मार्च पासून सुरू होत आहे, सलग चार दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक क्रीडा महोत्सव यासह अनेक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी ९ वाजता शहरातील जगदंबा मंदिर ते महादेव मंदिर पर्यत हरिहर भजनी मंडळाचे वारकरी व ग्रामस्थ, युवकांच्या उपस्थितीत टाळ मृदुगाच्या जलोशात भव्य अशी शोभा यात्रा व शंभू महादेवाच्या पालखीचे जगीं मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्यानंतर १० वाजता महिलासाठी रांगोळी स्पर्धा, त्या नंतर दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे, दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी १० वाजता  शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज (वलाडी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद भाविकांना वाटप होणार आहे सायंकाळी ४ वाजता जगीं कुस्ती स्पर्धेचा फड रंगणार आहे, त्यानंतर या स्पर्धेतील शेवटची कुस्ती जिकणाऱ्या मल्लास २१  तोळे चांदीची पिंड देण्यात येणार आहे, तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ७ वाजता मरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार असून सकाळी १०  वाजता बुद्धीबळ स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता पुरुषासाठी भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा, होणार आहेत, तसेच चौथ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता हायस्कूल लोहारा शाळेतील मैदा नावर भव्य खुल्या राज्यस्तरीय खुल्या  नत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धा साठी सव्वा लाखा पेक्षा अधिक रकमेची बशिसे व चषक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे,तरी या यात्रामहोत्सव व विविध धार्मिक, क्रीडा स्पर्धा ,संस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ लोहारा तालुक्यातील नागरिकांनी व परिसरातील ग्रामस्थांनी घ्यावा असे आव्हान यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे, तसेच स्पर्धासाठी  9881258484, 9421353244, 9420332232,8793157735,8087123803या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे,

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, १ मार्च, २०१९

प्राधिकरण कामासाठी वाढीव निधीसाठी पाठपुरावा करू पत्रकार परिषदेत नूतन शहर विकास प्राधिकरण सदस्य यांची माहिती

प्राधिकरण कामासाठी वाढीव निधीसाठी पाठपुरावा करू


पत्रकार परिषदेत नूतन शहर विकास प्राधिकरण सदस्य यांची माहिती



तुळजापूर  ( प्रतिनिधी ) 

श्री क्षेत्र तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत कामे अद्याप अर्धवट असुन पण माहे-डिसेंबर २०१८ च्या अखेर मासिक अहवालात ७१ कामात ४१ कामे पूर्ण झालेली आहेत.असे या अहवालात उल्लेख आहे.पण एकाही काम पूर्ण नाही ? असा आरोप तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक व विकास मलबा यांनी दि.१ शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता नविन शासकीय विश्राम गृह येथे आयोजित केलेला पञकार परिषदेत बोलत होते. या वेळेस भाजप जिल्हा उपाध्यक्षां मीनाताई सोमाजी जिल्हा चिटणीस गुलचद व्यवहारे, युवा शहर अध्यक्ष प्रसाद पानपुडे, इद्रजीत साळुंके उपस्थित होते.


नाईक पुढे बोलाताना म्हटले की आपण मागील काळात झालेल्या प्राधिकरण अंतर्गत कामाचे माहितीचा पाठपुरावा करून जे कामे अर्धवट आहेत.त्याची सखोल चौकशी करू तसेच या अहवालात अ.क्र.10 मध्ये नगर परिषद अंतर्गत बिडकर तलाव येथे बगीच्या विकसीत करणे.1105.42 एवढ्या रक्कमेचे काम पुर्ण झाले असे नमूद आहे.तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अंतर्गत पापणास तलावाची खोली वाढविणे व सुशोभिकरण करणे हे काम पूर्ण झाले असे नमूद आहे. या कामा करिता 284.44 एवढ्या खर्च झाला आहे.अशा शेरा आहे. अनेक कामे अपुर्ण राहिले आहेत. 313 कोटी विकास कामाची प्रशासकीय मान्यता असुन त्या पैकी 261 कोटी निधी खर्च झाला असुन उर्वरित 52 कोटी कामाच्या निविदेता काढला असुन कामे चालू होतील.समाजा कामास निधी कमी पडल्यास आपण आमदार सुजितसिंह ठाकूर याच्या पाठपुरावाने वाढीव निधीची मागणी मुख्यमंत्री यांच्या कडे करू तसेच शहरात सुसज्ज नाट्यगृह, भवानी रोड वरील पथदिवे,भवानी कुंड येथे तुळजा भवानी व शिवाजी महाराजांच्या महिमा सागंणारे लेजर शो भाविका साठी चालू करण्यास पाठपुरावा करू.तुळजा भवानी मंदिरा जवळ दोन चाकी वाहनाकरिता चार मजली कार पाकीॅग , सध्या उघड्यावर मांस विक्री चालु असुन मच्छी माकेॅट येथे मांस विक्री चालु करावी असे मागणी करू.                 

तसेच विकास मलबा यानी शहर विकास प्राधिकरण कामात आज पर्यंतच्या मोठ्या भ्रष्टाचार झाला असुन कामे ही नित्कृष्ठ दर्जाची झाले असुन दोषीवर कारवाई करण्या साठी मागणी करू.प्रलंबित असलेली ड्रेनेज लाईन हस्तातर साठी पाठपुरावा केला जाईल.राज्य सरकारने शहराचा विकासा करिता दिलेला निधीचा योग्य वापर झाला पाहिजे असे मत विकास मलबा यानी या वेळेस व्यक्त केले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...