“ दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरी चोरीतील गेला माल जप्त ”
दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद :- दिनांक 01.03.2019 रोजी इंदापुर ता.वाशी येथील इंदापुर फाटयाजवळ सुर्या ढाबा ते येरमाळा चौरस्ता पुढे रात्री 11.00 ते 11.30 वा.पावेतो ट्रक क्र. के.ए. 32 डी 0909 या ट्रकची ताडपत्री फाडून ट्रक मधील sigma XXX कंपनीचे 10 टायर चोरटयांनी चोरून नेले बाबत पोलीस ठाणे येरमाळा येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील गेला माल sigma XXX कंपनीचे 5 टायर हे दिनांक 12.03.2019 रोजी गोजवाडा शिवारात विक्रीसाठी शिवाजी उर्फ चिवळया बप्पा काळे रा.लोणखस पारधी पिढी हा घेवून आल्याची माहिती गुप्त बातमीदारमार्फत मिळाल्याने दरोडा प्रतिबंधक पथक हे गोजवाडा शिवारात गेले असता sigma XXX कंपनीचे 5 टायर जागेवर सोडून आरोपी अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला व सदर गुन्हयातील जप्त मुद्देमाल दरोडा प्रतिबंधक पथकाने पोलीस ठाणे येरमाळा येथे जमा केला आहे.
“ दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरी जबरी चोरीमधील फरार आरोपी अटक ”
दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद :- दिनांक 10.03.2019 रोजी 20.30 ते 21.00 वा.चे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर बायपास रोड उस्मानाबाद येथे नारायण एकनाथ नागरगोजे रा.लिंबा (खांबा) ता.शिरुर जि.बीड हे त्यांचे कंटेनर क्र. एम.एच. 46 बी.बी. 914 मधुन राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर विदयामाता हायस्कुलच्या पुढे बायपास रोड उस्मानाबाद येथे गतिरोधकावर गाडीचा वेग कमी झाल्याने 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड दोघे रा. जहागिरदारवाडी तांडा ता.जि.उस्मानाबाद व एक अनोळखी व्यक्ती यांनी नारायण नागरगोजे यांच्या कंटेनरच्या समोर येवुन गाडी आडवुन गाडीमध्ये चढून नारायण नागरगोजे यांना दगडाने व चापटाने मारहान करुन त्यांचे खिशातील सॅमसंग जे 7 कंपनीचा मोबाईल किं.अं. 10,000/- रु. व रोख रक्कम 7,000/-रु. असा एकूण 17,000/- रु चा माल हिसकावुन घेवून मोटारसायकलवरुन पळून गेले. म्हणून नारायण एकनाथ नागरगोजे यांचे फिर्यादवरून 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड दोघे रा. जहागिरदारवाडी तांडा ता.जि.उस्मानाबाद व एक अनोळखी व्यक्ती यांचे विरुध्द दिनांक 11.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 394,341,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जबरी चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी 1) आकाश प्रकाश राठोड 2) बालाजी केशव राठोड दोघे रा.जहागिरदारवाडी तांडा ता.जि.उस्मानाबाद यांना दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे.
“ उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 92 लोकांवर कारवाई ”
उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 12/03/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 92 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 19 हजार 300 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
2
“ उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापा 1,16,060/- रु. चा माल जप्त ”
पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 12.03.2019 रोजी 16.10 वा. प्रदिप व्याय यांचे शेतात वडाचे झाडाखाली मौजे तेर येथे 1) महादेव बळीराम थोरात 2) राजेंद्र लक्ष्मण कोकरे 3) काका मारुती देवकते 4) श्रीमंत सुब्राव रामगुडे 5) शरद सदाशिव एडके सर्व रा. तेर ता.जि.उस्मानाबाद हे गोलाकार बसुन बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम व साहित्यासह एकुण 1,16,060/- रुपयाचे मालासह मिळुन आले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन ढोकी यांनी केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
“ उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे 47,238/- रु. चा माल जप्त ”
पोलीस स्टेशन बेंबळी :- दिनांक 12.03.2019 रोजी 2052 वा. तुळजाभवानी हॉटेलसमोर पाडोळी शिवार येथे जीवन लक्ष्मण पवार रा.समुद्रवाणी तांडा ता.जि.उस्मानाबाद याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी विदेशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 16 बाटल्या किं.अं. 1,280/-रु. विदेशी दारुच्या 4 बाटल्या किं.अं. 800/- रु. असा एकूण 2,080/-रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व पोलीसांची चाहूल लागताच प्रो.गुन्हयाचा माल जागीच सोडून पळुन गेला म्हणून जीवन लक्ष्मण पवार याचेविरुध्द दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन बेंबळी यांनी केली आहे.
पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 12.03.2019 रोजी 17.45 वा. कसई चौकात समृध्दी धाब्यात कसई येथे 1) राजकुमार विराप्पा सगट रा.सरडेवाडी ता.तुळजापूर हा विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 88 बाटल्या किं.अं. 4,576/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व 2) महेश रामचंद्र सुरवसे रा.कसई ता.तुळजापूर हा पळून गेला म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली असुन राजकुमार विराप्पा सगट यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 12.03.2019 रोजी 19.05 वा. वासुदेव गल्ली तुळजापूर येथे उमेश बिभिषण भोजणे रा.तुळजापूर खुर्द याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 30 लिटर गाहभ दारु किं.अं. 1,600/- रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून उमेश बिभिषण भोजणे याचेविरुध्द दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन तुळजापूर यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 12.03.2019 रोजी 19.00 वा. काळे प्लॉट उमरगा येथे शिवजी सखाराम ढवळे रा.काळे प्लॉट उमरगा याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 10 लिटर गाहभ दारु किं.अं. 400/- रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून शिवजी सखाराम ढवळे याचेविरुध्द दिनांक 12.03.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उमरगा यांनी केली आहे.
3
पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 13.03.2019 रोजी 10.00 वा. सुनिल विशाल शिंदे रा. मांडवा ता.वाशी हा त्याचे मांडवा गावातील पुलाजवळ त्याचे कब्जात देशी विदेशी दारुच्या 19 बाटल्या किं.अं. 2,690/-रु व 15 लिटर गाहभ दारु किं.अं. 900/-रु असा एकूण 3,590/- रु. चा माल बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी विदेशी दारु व गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून सुनिल विशाल शिंदे याचेविरुध्द दिनांक 13.03.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन वाशी यांनी केली आहे.
पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 13.03.2019 रोजी 10.00 वा. कोरेगाव येथील कोरेगाववाडी जाणारे रोडचे ठिकाणी ता.उमरगा येथे 1) भरत नामदेव देडे रा.मुरली ता.उमरगा 2) महाळप्पा मारुती घोडके रा.महादेव गल्ली उमरगा ता.उमरगा यांनी देशी दारुच्या 96 बाटल्या किं.अं. 4,992/- रु. चा प्रो .गुन्हयाचा माल देशी दारु विनापरवाना बेकायदेशिर रित्या जवळ बाळगुन तिची चोरटी विक्री करत असताना टी.व्ही.एस. स्टार सिटी मोटार सायकल क्र. एम.एच. 25 ए.सी. 7164 जु.वा.किं.अं. 30,000/-रु असा एकुण 34,992/-रु च्या मालासह मिळुन आले म्हणून 1) भरत नामदेव देडे 2) महाळप्पा मारुती घोडके यांचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उमरगा यांनी केली आहे.
“ उमरगा येथे जबरी चोरी ”
पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 12.03.2019 रोजी 11.45 वा. गटशिक्षण कार्यालय, गेटसमोरील रोडवर उमरगा येथे पंढरीनाथ विश्वनाथ सुर्यवंशी रा.बालाजी नगर उमरगा ता.उमरगा हे बँकेतुन काढलेले रोख रक्कम 3,00,000/- रु. व एसबीआय बॅकेचे पासबुक , आयसीआयसीआय बॅकेचे चेकबुक असलेली पिशवी घराकडे घेवून जात असताना दोन अज्ञात चोरटयाने मोटार सायकल वर येवून पंढरीनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने त्यांचे हातातील पिशवी हिसकावून घेवून पळून गेले आहेत. म्हणून पंढरीनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांच्या फिर्यादवरून दोन अज्ञात ईसमाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ परंडा येथे चोरी करण्याचा प्रयत्न गुन्हा नोंद ”
पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 11.03.2019 रोजी 20.00 ते दिनांक 12.03.2019 रोजी 08.00 वा.चे दरम्यान विलास महादेव शिंदे रा. देवगाव खु ता. परंडा जि.उस्मानाबाद यांचे परंडा येथील बालाजी इलेक्ट्रीक दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाच्या तरी सहाय्याने अर्धवट उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून विलास महादेव शिंदे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 457,380,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ मौजे ढेकरी शिवारात दोन म्हशींची चोरी गुन्हा नोंद ”
पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 11.03.2019 रोजी 20.00 ते 12.03.2019 रोजी 06.00 वा.चे दरम्यान आनंद गौतम जाधव रा.ढेकरी ता.तुळजापूर यांचे ढेकरी शिवारातील शेत गट नं. 458 मधील पत्र्याचे शेड समोर बांधलेल्या दोन म्हशी किं.अं. 75,000/- रु च्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्या आहेत म्हणून आनंद गौतम जाधव यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4
“ ओएलएक्स कंपनीचे वेबसाईटवरुन ऑनलाईन फसवणूक गुन्हा नोंद ”
पोलीस स्टेशन उस्मानाबाद :- दिनांक 08.03.2019 रोजी ते दिनांक 10.03.2019 रोजी चे दरम्यान सारोळा बु येथे व उस्मानाबाद येथे देवानंद उत्तम आगाशे रा.सारोळा बु. ता.जि.उस्मानाबाद यांनी ओएलएक्स कंपनीचे वेबसाईटवर ऑनलाईन गाडीची खरेदी विक्री पाहीली असता देवानंद आगाशे याना वेबसाईटवर साहील कुमार मो.नं. 8905132883 या व्यक्तीने स्वीफट डिझायर कार सन 2013 चे मॉडेल असलेली 2,30,000/- रु किंमतीची कार 2,00,000/- रु किंमतीस पाठवून देतो असे सांगून देवानंद आगाशे यांचे कडून साहील कुमार याने वेगवेगळया दोन पेटीएम व एक फोन पे अकाऊंट वर 1,41,400/- रु. देवानंद उत्तम आगाशे यांना टाकण्यास सांगुन देवानंद उत्तम आगाशे यांना स्विफ्ट डिझायर कार न देता देवानंद उत्तम आगाशे यांची फसवणुक केली म्हणून देवानंद उत्तम आगाशे यांचे फिर्यादवरून साहील कुमार मो.नं. 8905132883 याच्याविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ मौजे बेंडकाळ येथे अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु ”
पोलीस स्टेशन लोहारा :- दिनांक 22.02.2019 रोजी 11.00 वा. गोरोबा भानुदास गवळी (मयत) रा.बेंडकाळ ता.लोहारा हे बेंडकाळ ते लोहारा रोडने पायी चालत जात असताना अज्ञात मोटारसायकल चालकाने त्याचे ताब्यातील मोटारसायकल हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून गोरोबा भानुदास गवळी यांना पाठीमागुन जोराची धडक देवून गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला व जखमीस उपचारास घेवून न जाता व अपघाताची खबर पोलीसांना न देता निघुन गेला वगैरे मयताचे कागदपत्र पोलीस स्टेशन सदर बाजार सोलापूर येथुन आ.मृ. नं. 00/19 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे प्राप्त झालेवरून अंगद गोरोबा गवळी रा.बेंडकाळ ता.लोहारा यांचे फिर्यादवरून अज्ञात मोटारसायकल चालकाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोली स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 279,304(अ),338 सह मोवाकाचे कलम 134(अ)(ब),184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ उस्मानाबाद येथे धारदार चाकू बाळगुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा नोंद ”
पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 12.03.2019 रोजी 18.30 वा.सु. 1) संदीप अनुरथ गायकवाड रा.एस.टी.कॉलनी उस्मानाबाद 2) धनंजय रामहरी अनभुले रा.सांजा हे बस स्थानक समोर उस्मानाबाद येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने त्यांच्याजवळील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.ई. 2848 वर धारदार चाकू कब्जात बाळगुन घेवून फिरत असताना मिळुन आले व मा.जिल्हाधिकारी सो यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 34 सह भा.ह.कायदयाचे कलम 4/25 सह मपोकाचे कलम 137(1)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 12.03.2019 रोजी 15.30 वा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर उडाणपुलाजवळ उस्मानाबाद येथे संजय सुभाष कोरे रा. तावशी गड ता.लोहारा जि.उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र. के.ए. 32 जी 4174 यामध्ये सळई भरुन हयगयीने व निष्काळजीपणे रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अति वेगाने चालवून दुसऱ्याचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने चालवित असताना मिळुन आला म्हणून सुजय सुभाष कोरे याचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5
“ मौजे शिराळा येथे महावितरण कंपनीचे लोखंडी पोल कट करुन नुकसान गुन्हा नोंद ”
पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 09.03.2019 रोजी 22.00 वाचे नंतर अज्ञात इसमाने 11 केव्ही शिराळा शेती पंप फिडरवरील शहाजी बाजीराव गडदे व शिवाजी ढोरे यांचे बांधावरील महावितरण कंपनीचा डिपी 100 केव्हीए क्षमतेच्या डीपीचेलोखंडी पोल अज्ञात इसमाने गॅस कटरच्या साहयाने कट करुन महावितरण कंपनीचे 2,00,000/-रु. चे नुकसान केले म्हणून दत्तात्रय देविदास दसपुते सहायक अभियंता शाखा कार्यालय, शिराळा आ.म.रा.वि.वि.कं. उपविभाग परंडा यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 427 सह 140 भारतीय विदयुत कायदा 2003 चे कलम 140 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ तुळजापूर येथे ओमीनी कारची पादचाऱ्यास धडक गुन्हा नोंद ”
पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 09.03.2019 रोजी 14.30 वा.सु. सुरज शिवाजीराव मोरे रा.एस.टी.कॉलनी तुळजापूर हे वैष्णवी हॉटेल तुळजापूर येथून चहा घेवुन पायी चालत लातुर रोडवर आले असता पाठीमागून ओमीनी मारुती कार क्र. एम.एच. 42 ए.एस.7514 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील मारुती कार ही भरधाव वेगात हयगईने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन सुरज शिवाजीराव मोरे यांना जोराची धडक देवुन डोक्यास, पोटास व दोन्ही पायास किरकोळ व गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला म्हणून सुरज शिवाजीराव मोरे यांचे फिर्याद वरुन ओमीनी मारुती कार क्र. एम.एच. 42 ए.एस.7514 चा चालक याचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 279,337,338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ कळंब येथे ट्रक व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यु गुन्हा नोंद ”
पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 09.03.2019 रोजी 21.00 वा. ते दिनांक 13.03.2019 रोजी 00.30 वा.चे रोहीत रत्नाकर काटे (मयत) रा.दत्तनगर नांदेड ता.जि.नांदेड ह.मु. गांधीनगर कळंब हे बस स्थानक कळंब येथुन मोटारसायकल क्र. एम.एच. 26 ए.व्ही. 9272 वर बसुन कळंब चौकाकडे जात असताना फाटक यांच्या दुकानासमोर कळंब येथे पाठीमागुन ट्रक क्र. एम.एच. 43 ई 3425 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ऊसाने भरलेली ट्रक हयगईने व निष्काळजीपणे चालवुन रोहीत काटे यास जोराची धडक देवून गंभीर जखमी केले व जखमीस दवाखान्यात न नेता व अपघाताची माहिती पोलीसांना दिली नाही. तेथील लोकांनी रोहीत काटे यास उपचारासाठी स.द.कळंब येथे दाखल केले तेथुन पुढील उपचारासाठी स.द.अंबाजोगाई येथे दाखल केले असता तेथे रोहीत रत्नाकर काटे याचेवर उपचार चालू असताना तो दिनांक 10.03.2019 रोजी 00.30 वा मयत झाला आहे. म्हणून रोहीत रत्नाकर काटे याचे मामा निलेश अनंतराव काळे रा.गांधीनगर कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद यांचे फिर्यादवरुन ट्रक क्र. एम.एच. 43 ई 3425 चा चालक याचे विरुध्द दिनांक 13.03.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 279,304(अ),338 सह मोवाकाचे कलम 134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6
“ उस्मानाबाद येथे भरधाव वेगात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हे नोंद ”
पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 12.03.2019 रोजी 18.35 वा. सेन्ट्रल बिल्डींग समोर उस्मानाबाद येथे प्रदिप सुरेश कांबळे रा.तांबरी विभाग उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्र. एम.एच. 25 ए.जी. 9090 ही लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवित असताना मिळुन आला म्हणून प्रदिप सुरेश कांबळे याचेविरुध्द दिनांक 12.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 279 सह मोवाकाचे कलम 3(1)/181,239/177,130(3)/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा