शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

टंचाई परिस्थिती प्रशासनाने गांभिर्याने हाताळावी-आमदार मधुकरराव चव्हाण

टंचाई परिस्थिती प्रशासनाने गांभिर्याने हाताळावी-आमदार मधुकरराव चव्हाण

जिल्हयामध्ये अभूतपूर्व टंचाई परिस्थिती निर्माण झालेली असून टंचाई निवारणार्थ उपायोजना करण्यासाठी प्रशासन दिरंगाई करित असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य जनतेस बसत असून अशावेळी प्रशासनाने गांभिर्यपूर्वक काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.मधुकरराव चव्हाण यांनी केले. तुळजापूर येथे 8 फेब्रु 19 रोजी टंचाई निवारणार्थ बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी सौ.दिपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कोलते, सभापती शिवाजी गायकवाड, तहसीलदार श्रीमती योगिता कोल्हे,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे,उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बाफना,गटविकास अधिकारी ढवळशंख, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री.देवकर यांच्यासह सर्व यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी समन्वयाने काम करित नाहीत. त्याचबरोबर पंचायत समिती स्तरावर कामे होत नाहीत. ग्रामसेवक 8-8 दिवस ग्रा.पं.कडे फिरकत नाहीत गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने टंचाई परिस्थितीचा सामना यशस्वीपणे होत नाही याबददल आ.चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन यामध्ये सुधारणा झाली नाही तर लोकशाही मार्गाने मंत्रालयापर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यासोबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभापती यांनीही गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबाबत नापसंती व्यक्त केली.

यावेळी आत्तापर्यंत 29 गावाधून 63 प्रस्ताव अधिग्रहणासाठी प्राप्त झाले असून 45 अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहेत.7 प्रस्ताव रदद करण्यात आले असून 8 प्रस्ताव तहसीलकडे सादर करण्यात आलेले असून अद्याप 3 प्रस्तावाची पाहणीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर खुदावाडी व भांतब्री या दोन गावची टँकर मागणी प्रस्ताव आलेले असून खुदावाडीसाठी 3 अधिग्रहण करण्यात आले असून भांतब्री येथील प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. ग्रा.पं.कडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 4 दिवसात अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे शासन निर्देश असतानाही महिना - महिना अधिग्रहण मंजूर होत नाही ही खेदाची गोष्ट असून यापुढे तातडीने मंजूरी देण्याची सूचना आ.चव्हाण यांनी केली.

म.ग्रा.रो.ह.यो च्या कामाबाबत बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी विस्तृत आराखडा आखून कामे मंजूर करुन शेल्फवर ठेवावीत जेणे करुन मागणी करताच मजुरांना उपलब्ध करुन देता येईल.

तुळजापूर तालुक्यामध्ये एकूण 1,40,822 जनावरे असून त्यामध्ये मोठी जनावरे 72,627 लहान जनावरे 20,217 असून शेळया मेंढयाची संख्या 44,418 इतकी आहे. यासाठी प्रतिमहिना 15,750 मे.टन चाऱ्याची आवश्यकता असून 15 मार्च पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असून जून 19 पर्यंत 39,109 मे.टन चाऱ्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कामधेनू वैरण विकास, राष्ट्रीय कृषी विकास योजना, NDDB वैरण विकास योजना व जिल्हा नियोजन समितीचा निधीसह, आत्मा योजनेतून चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे.अधिग्रहण किंवा टँकर मंजूर करताना जनावराच्या पाण्याची सोय करण्याचाही विचार करण्याची सूचना आ.चव्हाण यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ -मुंडे यांचेसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मौलिक सूचना दिल्या.



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

आलियाबाद येथे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन

आलियाबाद येथे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन

जळकोट/ प्रतिनिधी
तुळजापूर  तालुक्यातील आलियाबाद येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत वाचनालय इमारतीचे व राष्ट्रीय पेय जल नळ योजनेचे उदघाटन माजी मंत्री तथा आमदार श्री मधुकररावजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय कोलते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती शिवाजी गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण,उपसभापती सौ.सुनिता पाटील, गटविकास अधिकारी बी. व्ही. ढवळशंक ,पाणी पुरवठा उपअभियंता सरवदे, बांधकाम उपअभियंता मुनगिरे ,उपअभियंता होळकर, अभियंता खान ए.आर. उपस्थित होते.
गावाने विविध पुरस्कार प्राप्त केल्याने व गावची राज्स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने आमदार चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी  कोलते यांनी गावकर्याना शुभेच्छा दिल्या व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले 
         प्रास्ताविक सरपंच ज्योती चव्हाण यांनी केले. यावेळी प्रकाश चव्हाण, शिवाजी गायकवाड, डाॅ.कोलते यांनी ही मार्गदर्शन केले.कार्यक्रमास उपसरपंच सूर्यकांत राठोड, अमृता चव्हाण, सिताराम राठोड, थावरू राठोड, रामचंद्र पवार, विनायक चव्हाण, डाॅ.वाय.के.चव्हाण, शिवाजी नाईक, नेमिनथ चव्हाण, सुभाष नाईक, ताराचंद राठोड, शंकर राठोड, वसंत चव्हाण, शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण, बाबुराव पवार, व्यंकट राठोड,अमोल चव्हाण, शिवाजी चव्हाण,ग्रा.प.सदस्या रेखा चव्हाण, धानाबाई राठोड, घमाबाई राठोड, ग्रामसेवक प्रशांत भोसले यांच्यासह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार विलास राठोड यांनी मानले.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न


तुळजापूर / प्रतिनिधी 

तुळजापूर येथील लिटल फ्लावर्स मराठी प्राथमिक शाळेत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम (दि ९ ) रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका प्रियंका दिवटे होते. माता पालक संघाचे उपाध्यक्ष उषा धाकतोडे व संघाच्या सदस्या यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

तत्पूर्वी शाळेतील विद्यार्थिनी मृदुला ठाकरे, वैभवी कावरे, श्रुष्टि भोसले यांनी स्त्रीभ्रूणहत्या गीतातून मुलींना दिली जाणारी वागणूक व्यक्त करण्यात आली. तसेच विद्यार्थिनीच्या भाषणातून शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून सांगितले. सहशिक्षिका श्रीमती सुनीता शिंदे यांनी विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांचा पोषाक कसा असावा याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती वैष्णवी  श्यामराज, उषा धाकतोडे, नूतन ठाकरे, लता बनकर, स्वाती थोरात या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  श्रीमती अनिता कदम यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे काम करणार- राम जवान सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियन च्या सरचिटणीस पदी राम जवान यांची निवड



कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे काम करणार- राम जवान
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियन च्या सरचिटणीस पदी राम जवान यांची निवड
तुळजापूर /प्रतिनिधी 

 सोलापुर येथील शासकीय विश्रामगृह मध्ये
महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (महाराष्ट्र राज्य) 
या युनियनची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक जनविकास माथाडी युनियनचे संस्थापक सरचिटणीस हरीभाऊ लेंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत 
सोलापुर व उस्मानाबाद संयुक्त जिल्हा सरचिटणीस म्हणुन राम जवान यांची नियुक्तीचे पत्र युनियनचे संस्थापक सरचिटणीस हरीभाऊ लेंगरे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी राम जवान बोलताना म्हणाले की,माथाडी,
ड्रायव्हर,किन्नर,
मार्केटमधील हमाल, 
विटभट्टी कामगार,
ऊसतोड कामगार,
टोलनाक्यावरील कामगार,
विडी कामगार, 
कंपनीतील कामगार,
 टावेल कारखान्यातील कामगार,
शेतामधील कामगार 
 कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी व दोन्ही जिल्ह्यातील असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांची रितसर नोंदणी माथाडी मंडळात करून त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना व त्यांची माहिती कामगारापर्यंत पोहचवुन काम करणार असल्याचे राम जवान यांनी निवडीच्या वेळी स्पष्ट केले
यावेळी प्रदिप शिंदे,सुनिल पाटील,
राहुल दुधाळ,उमेश काळे,पवन पाटील,संतोष बंडगर,तुकाराम कोळेकर,युवराज जानकर,सुरेश कागे,आप्पा काळे, समाधान वाघमोडे, किरण शेंडगे संतोष जवान यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

वारंवार मागणी करून ही प्रशासनाचे दुर्लक्ष ! शहरात गतिरोधक बसविण्याची मनसेची मागणी

वारंवार मागणी करून ही प्रशासनाचे दुर्लक्ष !


शहरात गतिरोधक बसविण्याची मनसेची मागणी


तुळजापूर /प्रतिनिधी 

शहरातील शिवाजी चौक ते पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने मंगळवार, (दि.5) रोजी प्रतिकात्मकरित्या गतिरोधक करून आंदोलन करण्यांत आले.


यापुर्वी दि.१३ ऑगस्ट २०१८ व दि. २८ ऑगस्ट २०१८ रोजी निवेदने देवून, तसेच भेट घेऊनही कुठलीही उपाय योजना करण्यांत आलेली नाही.


त्यानंतर शहरातील शिवाजी चौक ते पार्किंग कडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक करण्याच्या मागणीकरिता तहसिलदार, तुळजापूर यांना दि. २९ जानेवारी २०१९ रोजी निवेदन देण्यात आले होते व निवेदनात असे म्हटले होते की, गतिरोधकबाबत यापुर्वी वारंवार निवेदने देऊनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे मनसेच्या वतीने दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रतिकात्मकरित्या गतिरोधक करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु त्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे मनसेच्या वतीने  मंगळवार, (दि. ५) रोजी गतिरोधकाच्या मागणीसाठी शिवाजी चौक ते पार्किंग रोड येथे प्रतिकात्मकरित्या गतिरोधक करून, आंदोलन करण्यात आले व त्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद, तुळजापूर, यांना देण्यात आले. तसेच यापुढे कोणतीही कारवाई नाही झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. सदर निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष धर्मराज सावंत, उपाध्यक्ष अविनाश पवार, शहर सचिव, वेदकुमार पेंदे, जि.अध्यक्ष मनविसे (सां.वि.)-प्रमोद परमेश्वर, मनविसे जिल्हा सचिव सुरज कोठावळे, विशाल माने, अजय पवार, गणेश पवार, आशिष पांचाळ,  अनिकेत सुतकर, योगेश जाधव, प्रथमेश मोरे, सौरभ टोले, वसीम शेख, रूतुराज शेटे, कृष्णा साळुंके, कृष्णा मोटे, आशिष कांबळे, आल्ताफ सय्यद, मुकेश चंदनशिवे, अभिषेक जमदाडे, आदिंच्या स्वाक्षऱ्या असून, यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पहिल्या बॅच मधील रस्तेविकास कामांस मंजुरी - आमदार मधुकरराव चव्हाण

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पहिल्या बॅच मधील रस्तेविकास कामांस मंजुरी - आ.मधुकरराव चव्हाण



तुळजापूर / प्रतिनिधी 

तुळजापूर विधानसभा मतदार संघातील खालील रस्ते विकासांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पहिल्या बॅच मधील कामांस मान्यता दिल्याची माहिती आ.मधुकरराव चव्हाण यांनी दिली.


जिल्हास्तरीय समितीचे सदस्य आ.मधुकरराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, मी शिफारस केलेल्या पैकी अर्धे प्रस्ताव बॅच-१ मध्ये मंजूर झालेले असून उर्वरित कामे बॅच-२ मध्ये लवकरच मंजूर होतील. या रस्ते सुधारणा कामामुळे वंचित गावांना व तांडयाना चांगल्या प्रकारचे रस्ते तयार होतील त्यामुळे दळणवळामध्ये सुलभता निर्माण होईल.


आमदार चव्हाण साहेबांच्या सततच्या पाठपुराव्या मुळेच तुळजापूर विधानसभा मतदार संघातील खालील रस्ते कामांना मंजुरी मिळाली.

i

अ.क्र. तालुका रस्त्याचे नाव लांबी (किमी) कामाची अंदाजीत     रक्कम(रु.लक्ष)


1. उस्मानाबाद उस्मानाबाद ते उपळा कि.मी 0/00 ते 5/00 5.00 509.94

2. उस्मानाबाद बावी (क) TR04 ते किणी रामा 239 कि.मी.0/00 ते 4/600 4.60 502.94

3. उस्मानाबाद TR 04 तुगाव ते तुगाव कि.मी.0/00 ते 5/450 5.45 558.71

7 तुळजापूर टि.आर -15 उमरगा (चि.) ते शिरगापूर रोड कि.मी.0/00 ते 6/080 6.08 578.56

8 तुळजापूर रामा 208 ते निलेगाव तांडा 2 कि.मी.0/00 ते 0/540 0.54 65.07

9 तुळजापूर राममा 65 ते केरुर रोड कि.मी.0/00 ते 0/600 0.60 70.21

10 तुळजापूर प्रजिमा 38 ते घोडकी तांडा (बिरोबाचा तांडा) कि.मी 0/00 ते 1/800 1.80 162.33

11 तुळजापूर राममा 65 ते मुळेवाडी, शेटे तांडा कि.मी.0/00 ते 2/700 2.70 319.50

12. तुळजापूर राममा 65 फुलवाडी, फुलवाडी तांडा  वासिराम तांडा कि.मी 0/00 ते 2/700 2.70 258.81

13 तुळजापूर राममा 65 ते खानापूर कि.मी. 0/00 ते 2/070 2.07 246.82

14. तुळजापूर जळकोट राममा 65 जळकोट ते सोमलिंगतांडा कि.मी 0/00 ते 0/900 0.90 105.03

एकूण 32.44 कि.मी. 34.6



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

भाविकांसाठी सुलभ शौचालय बनविण्याची संजयकुमार बोंदर यांची मागणी

भाविकांसाठी सुलभ शौचालय बनविण्याची संजयकुमार बोंदर यांची मागणी


तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी प्रती वर्षी ऐंशी लाखापेक्षा जास्त भाविक येतात. प्रतेक महिन्याला सरासरी सहा लाखापेक्षा जास्त भाविक येतात आणि प्रती दिवसाला सरासरी विस हजार पेक्षा जास्त भाविक येतात. हि माहिती . माहिती अधिकाराच्या  मागणीत संजयकुमार बोंदर यांना मिळाली असून  देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये लहान मुले वयोवृद्ध पुरुष व महिला यांचा समावेश असतो. तुळजापूर शहरामध्ये भाविकांनी प्रवेश केल्यानंतर किमान प्रत्येक भाविक अंदाजे तीन ते पाच तासापेक्षा जास्त वेळ तुळजापूर शहरात असतात. भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने व नगर प्रशासनाने सुलभ शौचालयाची सोय केलेली आहे. परंतु येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सुलभ शौचालय अपुरे पडत आहेत. तुळजाभवानी महाद्वार पासुन कमानवेस पर्यंत नगर परिषद चे एकही सुलभ शौचालय नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय इमारतीच्या बाजुला एक सुलभ शौचालय आहे. वाहनतळा मध्ये एक सुलभ शौचालय आहे परंतु त्याठिकाणी स्वच्छता नाही. 

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर परिसरात अजुन एका सुलभ शौचालयाची आवश्यकता आहे. मंदिर परिसर ते कमानवेस पर्यंत एका शौचालयाची आवश्यकता आहे.  मुख्याधिकारी साहेबांनी सुलभ शौचालय बांधुन भाविकांची गैरसोय टाळावी असे निवेदन संजयकुमार बोंदर यांनी मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी,  आमदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य मधुकरराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य, तहसीलदार तुळजापूर तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य, नगराध्यक्ष तुळजापूर तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य, व नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदनावर संजयकुमार बोंदर यांची स्वाक्षरी आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्र्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...