शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

भाविकांसाठी सुलभ शौचालय बनविण्याची संजयकुमार बोंदर यांची मागणी

भाविकांसाठी सुलभ शौचालय बनविण्याची संजयकुमार बोंदर यांची मागणी


तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी प्रती वर्षी ऐंशी लाखापेक्षा जास्त भाविक येतात. प्रतेक महिन्याला सरासरी सहा लाखापेक्षा जास्त भाविक येतात आणि प्रती दिवसाला सरासरी विस हजार पेक्षा जास्त भाविक येतात. हि माहिती . माहिती अधिकाराच्या  मागणीत संजयकुमार बोंदर यांना मिळाली असून  देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये लहान मुले वयोवृद्ध पुरुष व महिला यांचा समावेश असतो. तुळजापूर शहरामध्ये भाविकांनी प्रवेश केल्यानंतर किमान प्रत्येक भाविक अंदाजे तीन ते पाच तासापेक्षा जास्त वेळ तुळजापूर शहरात असतात. भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने व नगर प्रशासनाने सुलभ शौचालयाची सोय केलेली आहे. परंतु येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सुलभ शौचालय अपुरे पडत आहेत. तुळजाभवानी महाद्वार पासुन कमानवेस पर्यंत नगर परिषद चे एकही सुलभ शौचालय नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय इमारतीच्या बाजुला एक सुलभ शौचालय आहे. वाहनतळा मध्ये एक सुलभ शौचालय आहे परंतु त्याठिकाणी स्वच्छता नाही. 

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर परिसरात अजुन एका सुलभ शौचालयाची आवश्यकता आहे. मंदिर परिसर ते कमानवेस पर्यंत एका शौचालयाची आवश्यकता आहे.  मुख्याधिकारी साहेबांनी सुलभ शौचालय बांधुन भाविकांची गैरसोय टाळावी असे निवेदन संजयकुमार बोंदर यांनी मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी,  आमदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य मधुकरराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य, तहसीलदार तुळजापूर तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य, नगराध्यक्ष तुळजापूर तथा तुळजाभवानी मंदिर संस्थान सदस्य, व नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदनावर संजयकुमार बोंदर यांची स्वाक्षरी आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्र्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढविणार : अँड अनिल काळे

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढविणार : अँड अनिल काळे


तुळजापूर /प्रतिनिधी

आगामी काळात सन २०१९ मध्ये होणा-या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदारी करत असताना पक्षाचे धोरण व सरकारच्या योजना जनतेपर्यंत पाहोंच करण्यात यश आलेले आहे. मग "वन बुथ २५ युथ" ही योजना असेल गाव तेथे शाखा योजना असेल. तसेच समाजातील सर्व घटक महिला, तरूण यांना जोडण्याचे काम सातत्याने करत असल्याने, माझ्या सारख्या उच्च, विद्याविभुषित व स्वच्छ प्रतिमेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने तुळजापूर, विधानसभा मतदार संघामधून उमेदवारी दिल्यास मी, विधानसभा लढवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, अँड अनिल काळे यांनी सांगितले


तुळजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा काळे यांनी तालुका भाजप कार्यालय येथे पत्रकारदिन विशेष सन्मान सत्कार आयोजित केला होता त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले,यावेळी तुळजापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना पुढे म्हणाले की मी, गेल्या २५ वर्षापासून भाजपामध्ये अनेक प्रतिकुल परिस्थितीमध्ये काम करत असून, मौजे केमवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच, मौजे सावरगांव-केमवाडी वि.का.से.सो. चा चेअरमन म्हणूनही काम केले आहे. तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्हयामध्ये पक्षाच्या विविध पदावर काम केलेले आहे. भाजपाचा तुळजापूर तालुक्याचा कार्यकारिणी सदस्य म्हणून सन १९९६ मध्ये कामास सुरूवात करून, धाराशिव जिल्हा सहकार आघाडीचा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विधानसभा मतदार संघाचा पालक, प्रभारी म्हणून सध्या काम करत आहे. या कालावधी मध्ये पक्षाने संघटनेसाठी जी कांही जबाबदारी सोपविली, ती प्रामाणिकपणे, सातत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता, पार पाडलेली आहे.


पक्षामध्ये काम करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधण्याचा व त्यांच्या कामाच्या पध्दतीचा अनुभव जवळून पाहता आला. तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  तसेच ज्यांच्यामुळे राजकारणामध्ये मला खंबीर साथ मिळाली व सुख-दुःखामध्ये मला साथ दिली ते भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यामुळे हा राजकारणातील यशस्वी प्रवास करता आला.


आपण कांही तरी समाजाचे देणे लागतो, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या भावनेने काम करत असताना तुळजापूर तालुक्यातील गोर-गरीब, शेतकरी, तरूण सर्व जाती धर्मातील नागरीक यांच्यासाठी आपल्याला कांही चांगले काम करता आले तर त्यातच मी, धन्यता मानणारा कार्यकर्ता आहे.


तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये उद्योग-धंद्याची वाणवा आहे, आहे ते सहकरातील सर्व उद्योग बंद पडलेले आहेत, सहकारी बँकाही बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी, तरूण व नागरीक यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. शेतीसाठी शाश्वत पाणी नसल्याने शेती पिकत नाही, त्यामुळे शेतकरी सुजलाम-सुफलाम व्हावे, म्हणून माझे स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी उजनीचे पाणी तुळजापूर तालुक्याला मिळायला पाहिजे, यासाठी मी, प्रयत्नशिल आहे. घाटने बॅरेजेसमधून कॅनॉलद्वारे पाणी रामधरापर्यत आणणे व तेथुन मोर्डा मार्गे लोहारा, नळदुर्ग व उमरगा या मार्गे नेणे, हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता मी, प्रामाणिकपणे प्रयत्नशिल आहे.


श्री.तुळजाभवानी मातेचा आशिर्वाद आपणा सर्वाना आहे, त्यांचे नांव असलेल्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय वाचावे व ते बंद पडू नये व ते सरकार अधिग्रहीत करावे, यासाठी मी, शासनाकडे सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच तुळजापूरला एम.आय.डी.सी. नाही, ती आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातून व देशभरातून श्री.तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येत असतात, त्यांच्या सोयी-सुविधाकरिता प्राधिकरणाच्या माध्यमातून तुळजापूरचा विकास करणे हे प्रथमतः प्राधान्याने करणे हे माझे उद्दिष्ट आहे.


तुळजापूर तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून, शेजारील मोठी गांवे स्मार्ट व्हीलेज कशी बनविता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे. शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही, शेतक-यांनी उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहच करणे व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे स्वप्नातील तुळजापूर तालुका घडविण्याचा प्रयत्न करणार आहे.


अनेक वर्षापासून पक्षासाठी एकनिष्ठेने व निष्कलंकपणे सतत कार्यरत राहणारा कार्यकर्ता म्हणून मी, माझी प्रतिमा जपण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. तसेच सर्व धर्मीय जनतेच्या संपर्काच्या माध्यमातून जनतेच्या समस्यां सोडविण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. यापूर्वी दोन्ही वेळेस विधानसभेकरिता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती. परंतु जरी पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षाचा एक पाईक म्हणून त्या-त्या उमेदवाराचा निवडणूकीमध्ये प्रामाणिकपणे प्रचार करून, निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस आपलं घर येथे साजरा करून तेथील मुलांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस आपलं घर येथे साजरा करून तेथील मुलांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप 

मुख्याधिकारी गायकवाड यांचा हा उपक्रम एक आदर्श उपक्रम असून त्यांचा हा आदर्श इतरांनी ही घेण्यासारखा आहे

नळदुर्ग /सुहास येडगे 

नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस येथील आपल घर या आनाथ मुलांच्या प्रकल्पामध्ये साजरा करुन अनाथ विदयार्थी विदयार्थीनींना शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. दरम्यान या उपक्रमाबददल मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचे कौतुक केले जात आहे.

मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपली मुलगी परी हिचा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने आणि अनाथ मुलां बरोबर साजरा करण्याचा संकल्प केला होता आणि त्या नुसार गेल्या दोन वर्षापासून नळदुर्ग येथील आपल घर या अनाथ मुलांच्या बालग्राम मध्ये त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आज परी चा वाढदिवस होता आणि सकाळीच आपल घर बालग्राम मध्ये हा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करुन आपल घर मधील आनाथ मुला मुलींना शैक्षणिक साहीत्याची भेट ही देण्यात आली. या वेळी अनाथ मुला मुलींच्या चेहऱ्यावर मोठया प्रमाणात आनंद झालेला दिसून येत होता. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचा हा उपक्रम एक आदर्श उपक्रम असून त्यांचा हा आदर्श इतरांनी ही घेण्यासारखा आहे. या उपक्रमामुळे सकळ मराठा परिवार व त्या बरोबर शहरातील नागरीकांकडून श्री गायकवाड यांचे कौतुक होत आहे शिवाय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आनाथ मुला मुलींमध्ये जावून त्याच्यातील एक अविभाज्य घटक बनून आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करणारे उमाकांत गायकवाड हे एकमेव मुख्याधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा शहरातील नागरीकांतून कौतुक केले जात आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

गतीरोधक बसविण्याच्या मागण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा

गतीरोधक बसविण्याच्या मागण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा



तुळजापूर / सिद्दीक पटेल 

शहरातील शिवाजी चौक ते पार्किंगकडे जाणा-या रस्त्यावर गतीरोधक बसविण्याच्या मागणीकरीता  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तुळजापूर तहसलिदार योगिता कोल्हे यांना देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी चौक ते पार्किंगकडे जाणा-या रस्त्यावर गतीरोधक बसविण्याबाबत यापूर्वी वारंवार निवेदन देवूनही अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.‍ त्यामुळे मनसेच्यावतीने दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्रतिकात्मकरित्या गतीरोधक करुन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष धर्मराज सावंत शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, सचिव नंदकुमार पेंदे, मनसविचे जिल्हा उपाध्यक्ष अमीर शेख, जिल्हा सचिव सुरज कोठावळे, विशाले माने आदींच्या स्वाक्ष-या आहेत.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, २७ जानेवारी, २०१९

हे सरकार घोषणाबाजी करणारे पुन्हा येणार नाही -आमदार मधुकरराव चव्हाण

हे सरकार घोषणाबाजी करणारे पुन्हा येणार नाही : आमदार मधुकरराव चव्हाण

तुळजापूर विकास प्राधिकारणातील तीन विकास कामांचे भूमिपूजन

तुळजापुरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा चे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना निमंत्रित केले नाही म्हणून दाखवले काळे झेंडे 

तुळजापूर  /प्रतिनिधी

राज्य आणि केंद्रातील भाजपची सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे हे सरकार नक्की पुन्हा येणार नाही असा दावा तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिलजमाई झाल्याप्रमाणे या कार्यक्रमात राजकीय मैत्री दिसुन आली. 


तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,  हेलिपॅड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह आणि मातंगनगर येथील ८० लाख किमतीचे सभागृह या तीन कामाचे भूमिपूजन माजी परिवहन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील हे उपस्थित होते . व्यासपीठावर तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नरेंद्र बोरगावकर , आप्पासाहेब पाटील , नगराध्यक्ष अर्चना गंगणे  , प्रभारी नगराध्यक्ष बापूसाहेब कने , पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर ,नगरसेविका वैशाली कदम, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरसिंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.


याप्रसंगी उद्घाटक आमदार मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर नगरपालिकेची जबाबदारी मोठी आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून जी विकासकामे केली आहेत त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना जो निधी मिळणार आहे त्याचा योग्य वापर करून भक्तनिवास त्याचा उपयोग भक्तांना भावा तसेच तुळजापूर शहरात रखडलेला महत्त्वाचा रस्ता आर्य चौक जवाहर गल्ली ते साळुंखे चौक गल्ली हा दोन्ही बाजूंनी समान जागा घेऊन करण्यासाठी मंत्रालय स्तरावरील काम पूर्ण झाले आहे. लवकरच हे काम देखील पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पावले टाकावीत जी कामे अपूर्ण आहेत त्या गुत्तेदारांना पैसे न देता काम पूर्ण व दर्जेदार झाल्याशिवाय पैसे दिले जाणार नाहीत असे सांगितले


तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांना विरंगुळा म्हणून थांबण्यासाठी रामदरा तलावांमध्ये बगीचा आणि बोटिंग विकसित करण्यासाठी प्राधिकरणामध्ये तरतूद केलेली आहे त्यालाही आगामी काळात लवकरच सुरुवात करून येणाऱ्या भक्तांना निसर्गसौंदर्यात वापरता येण्याची सोय करण्याचा मानस आहे याशिवाय या सरकारने कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या अनुषंगाने जो लावा नेमलेला आहे त्यामुळे आपले हक्काचे 21 टी एम सी चे पाणी वाढून ते 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकते असा दावा आमदार चव्हाण यांनी करताना या सरकारने या योजनेसाठी कोणताही निधी दिला नाही केवळ घोषणाबाजी करून लोकांना या सरकारने नाराज केले आहे त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही यांनी केलेल्या घोषणा आपल्याला पूर्ण करावे लागतील असा राजकीय टोला मारला. तुळजाभवानी शाकंबरी सांस्कृतिक महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठी आपण  बैठकीमध्ये विषय मंजूर केला आहे त्याशिवाय तुळजापूर शहरांमध्ये सांस्कृतिक सभाग्रह ची गरज लक्षात घेऊन अद्यावत नाट्यग्रह बांधण्यासाठी देखील नगरपालिकेकडे जागेची मागणी केलेली आहे नगरपालिकेने नाट्यगृहासाठी जागा देऊन त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यास शहराला चांगले नाट्यग्रह मिळणार आहे असेही मधुकराव चव्हाण यांनी सांगितले


याप्रसंगी प्रमुख अतिथी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्रांसाठी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सुरुवात झाली आणि तुळजापूरच्या विकासाला गती देणारा कार्यक्रम त्यांनी दिला तो पूर्ण होण्यासाठी विलंब होत असला तरी मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम पुढे चालू आहे त्यातील तीन विकासकामांचे आज होणारे भूमिपूजन देखील समाधानकारक आहे यासह नाट्यगृहाच्या प्रश्नांमध्ये नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष घालून त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवाव्यात आणि शहराला चांगले नाट्यग्रह उपलब्ध करून द्यावे.  याशिवाय शहराची गरज लक्षात घेऊन शंभर खाटांचे आयसीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल झाल्यास तुळजापूर परिसराची मोठी गरज पूर्ण होणार आहे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न केले जावेत रामदारा तलावांमध्ये भाविक भक्तांना वावरता यावे असे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात यावे अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्या. तीर्थक्षेत्र विकास समितीचे सदस्य माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला निश्चित गती मिळाली आहे असे सांगितले तर प्राधिकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी शहराच्या विकासाच्या गरजा लक्षात घेऊन प्राधिकरणाने तयार केलेला आराखडा पूर्ण होत आला आहे मात्र निधीची गरज आहे असे सांगितले प्रारंभी नगराध्यक्ष बापूसाहेब कने यांनी प्रास्ताविक भाषणात नगरपालिकेने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन तुळजापूर नगरपालिका सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि हाती घेतलेली विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतिष महामुनी आणि आभार प्रदर्शन नगरसेवक अमर मगर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत रणजीत इंगळे  राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले,  संदीप गंगणे, पंडित जगदाळे , सचिन पाटील , प्रा. आशा बिडकर , विजय कंदले आदींनी केले. कार्यक्रमास माजी नगरसेवक राजा मामा भोसले , बाळासाहेब शिंदे , औदुंबर कदम ,लखन पेंदे,  भारत कदम ,अमर हंगरगेकर ,किशोर साठे ,अफसर शेख, सचिन रोचकरी  ,खंडू जाधव , सुनील रोचकरी, संतोष कदम ,कुलदीप मगर, विजय गंगणे, अभिजित कदम , राजेश शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवताना भाजपा कार्यकर्ते


चौकट मध्ये :

तुळजापुरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास आमदार सुजितसिंह ठाकूर यांना निमंत्रित न केल्याबद्दल निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली सुमारे वीस मिनिटे घोषणा देत कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचा निषेध केला दरम्यान सत्ताधारी नगरपालिकेच्या कार्यकर्त्याकडून देखील भाजप कार्यकर्त्यांना घोषणा देऊन प्रत्युत्तर देण्यात आले कोणताही अनुचित प्रकार न घडता हा घोषणाबाजीचा कार्यक्रम झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, २६ जानेवारी, २०१९

दिनेश बागल यांची धाराशिव जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड

दिनेश बागल यांची धाराशिव जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड.


तुळजापूर/प्रतिनिधी


भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते व झुंजार  प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश बागल, यांची धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्षपदी दि. 25 रोजी निवड झाली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दि.25 रोजी धाराशिव येथे नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य व सी.एम. चषक, तुळजापूर विधानसभा पालक अॅड.अनिल काळे, व धाराशिव जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.


दिनेश बागल हा कार्यकर्ता अतिशय कष्टाळू व मनमिळावू कार्यकर्ता असून, झुंजार प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुळजापूर शहरांमध्ये व तालुक्यामध्ये अनेक समाजोपयोगी कामे केलेली असून, सर्वांसोबत राहून, तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करून, भारतीय जनता पार्टीचे कार्य व धोरण, सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोच करून, भाजपाचे संघटन मजबूत करेल, अशा अपेक्षा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अनिल काळे यांनी व्यक्त केली. सदरची  निवड आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली झाली असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले.

या निवडीचे स्वागत प्रदेश सरचिटणीस व आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.अनिल काळे, सरचिटणीस प्रभाकर मुळे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी, विजय शिंगाडे, शहराध्यक्ष सुहास साळुंके, तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, शिवाजी बोधले, राम चोपदार, सचिन रसाळ, इंद्रजीत साळुंके, प्रसाद पानपुडे, दत्ता राजमाने, ऋषिकेश साळुंके, सागर पारडे, सागर कदम, विशाल वाघमारे, बाळासाहेब भोसले आदिंनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.




 (महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी व चांगले कुस्ती पटटू निर्माण व्हावे यासाठी श्री खंडोबा यात्रेनिमीत्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले- अशोक जगदाळे

नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी व चांगले कुस्ती पटटू निर्माण व्हावे यासाठी श्री खंडोबा यात्रेनिमीत्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले-अशोक जगदाळे.

  


नळदुर्ग/प्रतिनिधी

 हाप्पी डावावर आवघ्या दिड मिनीटात उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान योगेश पवार याने महान भारत केसरी विजेता पैलवान योगेश बोंबाले याला आस्माना दाखवून नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धा जिंकून एक लाख अकरा हजार 111 रुपयेचे पहिले पारितोषीक व मानाचा चांदीचा गदा मिळविला. शेवटची ही कुस्ती अतिशय चिततथराक झाली.


दि. 22 जानेवारी रोजी नळदुर्ग ( मैलारपूर ) येथे श्री खंडोबा यात्रेनिमीत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पालिका व श्री खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समीतीने मैलारपूरात भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी पैलवानास एक लाख अकरा हजार 111 अकरा रपये व मानाचा चांदीचा गदा देण्यात आला. त्याचबरोबर या स्पर्धेत आणखी हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात आले. प्रारंभी दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करुन आखाडयाचे पूजन करण्यात आले. व त्या नंतर कुस्ती स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर शहरातील व ग्रामीण भागातील आलेल्या लहान मुलांच्या कुस्ती घेण्यात आल्या. यामध्ये नळदुर्ग येथील छोटा पैलवान समर्थ मारुती घोडके वय आठ वर्षे याने मैदान गाजविले. याने दोन कुस्त्या जिंकून नळदुर्गची कुस्ती क्षेत्रातील काय ताकद आहे हे दाखवून दिले.


या वेळी बोलताना अशोक जगदाळे म्हणाले की, कुस्ती हा खेळ मर्दानी खेळ आहे, मात्र सध्या हा खेळ लोप पावत चालल्याने आजच्या युवकांमध्ये कुस्ती खेळाची आवड निर्माण वहवी तसेच ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


या नंतर कुस्ती आखाडयात कुस्तयांच्या दंगलीला सुरुवात झाली. या स्पर्धेचे मुख्य आकर्षन म्हणजे लातूरची पैलवान श्रुती ठाकूर व परभणीचा पैलवान संतोष धुळगुडे यांच्यात झालेली कुस्ती. मुला मुलींच्या या कुस्ती मध्ये श्रुती ठाकूर हिने संतोष धुळगुडे यास जेरीस आणले होते मात्र अखेर पंचानी ही कुस्ती बरोबरीत सोडविली. त्याच बरोबर कु. साक्षी ठाकूर व कुमारी आहूती जाधवर यांच्यात झालेल्या कुस्ती मध्ये कु. साक्षी ठाकूर हिने विजय मिळविला. त्याच बरोबर या स्पर्धेत झालेल्या 51 हजार रुपये बक्षीसाच्या कुस्ती मध्‍ये खुदावाडीचा पैलवान सुंदर जवळगे यांने पुण्याच्या पप्पू काळेला आस्मान दाखविले तर दुसरी 51 हजाराची कुस्ती मध्ये पैलवान विकास धोत्रे सोलापूर व पैलवान बबलू धनके सिंदफळ यांच्यात झाली. मात्र ही कुस्ती पंचांनी बरोबरीत सोडविली. त्याच बरोबर या स्पर्धेत पैलवान अंगद बुलबुले सोलापूर, पैलवान मार्तंड मोकाशे अणदुर, पैलवान रोहीत डुकरे नळदुर्ग, पैलवान शशिकांत कांबळे रामलिंग मुदगड, पैलवान बाबासाहेब चव्हाण सोलापूर, पैलवान आकाश भोसले होर्टी, पैलवान ज्ञानेश्वर जाधव सोलापूर, पैलवान रविंद्र साखरे सोलापूर, पैलवान राघवेंद्र बरवे मानेवाडी, पैलवान वजीर मारीआईवाले मंद्रुप, पैलवान राम हराळे, पैलवान महेश शेळके सोलापूर या पैलवानांनी आपआपल्या गटात विजय मिळविला.  या स्पर्धेत लहान पैलवानांच्या तसेच तुळजापूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील अनेक पैलवानांच्या कुस्त्या झाल्या.


या नंतर शेवटची व मानाची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता व सोलापूर येथील श्री कृष्ण तालीम संघाचा योगेश पवार व महान भारत केसरी विजेता व गंगावेस तालीम संघ कोल्हापूरचा पैलवान योगेश बोंबाले यांच्यात झाली. दोन तगडया व ताकदवान पैलवानांची ही कुस्ती रंगतदार होण्याची शक्यता होती मात्र कुस्ती सुरु झाल्यानंतर पैलवान योगेश पवार यांने आवघ्या दिडच मिनीटात कुस्तीतील हाप्पी डावावर पैलवान योगेश बोंबाले याला आस्मान दाखवून पैलवान योगेश पवार याने स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये अकरा हजार 111 रुपये व मानाचा चांदीचा गदा पटकाविला. या कुस्ती मध्ये योगेश पवार याने योगेश बोंबाले यास कुठलीच बचावाची संधी दिली नाही. त्यामुळे आवघ्या दिडच मिनीटात ही कुस्ती निकाली लागली.


पहिली कुस्ती कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणच्या वतीने अशोक जगदाळे यांनी लावली होती तर स्पर्धेतील विजेत्या पैलवानास कै. नरहरी दादा बापूराव पूदाले यांच्या स्मरणार्थ पूदाले परिवारांकडून मानाचा चांदीचा गदा देण्यात आला.  त्याच बरोबर स्पर्धेतील प्रत्येक विजयी पैलवानास अशोक जगदाळे यांच्या कडून स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. तर या स्पर्धेतील पहिल्या तीन कुस्तीतील विजेत्या पैलवानास कै. रेवप्पा सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र सोनकांबळे यांच्या कडून ढाल देवून त्यांचा गौरव करण्यात आला. ही स्पर्धा अतिशय शांततेत व चांगल्या वातावरणात व उत्साही वातावरणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या सहभागामुळे हि स्पर्धा अतिशय रंगतदार व थाटामाटात पार पडली. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन नागरीक उपस्थीत होते. या स्पर्धेसाठी अणदुरचे श्री घुगे, खुदावाडीचे उपसरपंच शिवप्पा जवळगे, भरत मेकाले, सुधाकर चव्हाण, शिवाजीराव वऱ्हाडे गुरुजी, राजेंद्र काशिद यांनी पंच म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती समीतीचे अध्यक्ष राजाभाउ ठाकूर, उपाध्यक्ष अनिल पूदाले, बंडू विनायक पूदाले, पदमाकर घोडके, रमेश जाधव, संजय मोरे, संजय बताले, नितीन कासार, अमृत पूदाले, शरद बागल, विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, संतोष पूदाले, ज्ञानेश्वर घोडके, नवल जाधव, संजय विठठल जाधव यांनी परिश्रम घेतले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी उपस्थीती दाखवीली शिवाय या सर्व मान्यवरांचा अशोक जगदाळे यांच्या हस्ते स्वागत ही करण्यात आले.


  

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...