रविवार, २७ जानेवारी, २०१९

हे सरकार घोषणाबाजी करणारे पुन्हा येणार नाही -आमदार मधुकरराव चव्हाण

हे सरकार घोषणाबाजी करणारे पुन्हा येणार नाही : आमदार मधुकरराव चव्हाण

तुळजापूर विकास प्राधिकारणातील तीन विकास कामांचे भूमिपूजन

तुळजापुरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा चे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना निमंत्रित केले नाही म्हणून दाखवले काळे झेंडे 

तुळजापूर  /प्रतिनिधी

राज्य आणि केंद्रातील भाजपची सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे हे सरकार नक्की पुन्हा येणार नाही असा दावा तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिलजमाई झाल्याप्रमाणे या कार्यक्रमात राजकीय मैत्री दिसुन आली. 


तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,  हेलिपॅड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह आणि मातंगनगर येथील ८० लाख किमतीचे सभागृह या तीन कामाचे भूमिपूजन माजी परिवहन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील हे उपस्थित होते . व्यासपीठावर तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नरेंद्र बोरगावकर , आप्पासाहेब पाटील , नगराध्यक्ष अर्चना गंगणे  , प्रभारी नगराध्यक्ष बापूसाहेब कने , पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर ,नगरसेविका वैशाली कदम, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरसिंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.


याप्रसंगी उद्घाटक आमदार मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर नगरपालिकेची जबाबदारी मोठी आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून जी विकासकामे केली आहेत त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना जो निधी मिळणार आहे त्याचा योग्य वापर करून भक्तनिवास त्याचा उपयोग भक्तांना भावा तसेच तुळजापूर शहरात रखडलेला महत्त्वाचा रस्ता आर्य चौक जवाहर गल्ली ते साळुंखे चौक गल्ली हा दोन्ही बाजूंनी समान जागा घेऊन करण्यासाठी मंत्रालय स्तरावरील काम पूर्ण झाले आहे. लवकरच हे काम देखील पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पावले टाकावीत जी कामे अपूर्ण आहेत त्या गुत्तेदारांना पैसे न देता काम पूर्ण व दर्जेदार झाल्याशिवाय पैसे दिले जाणार नाहीत असे सांगितले


तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांना विरंगुळा म्हणून थांबण्यासाठी रामदरा तलावांमध्ये बगीचा आणि बोटिंग विकसित करण्यासाठी प्राधिकरणामध्ये तरतूद केलेली आहे त्यालाही आगामी काळात लवकरच सुरुवात करून येणाऱ्या भक्तांना निसर्गसौंदर्यात वापरता येण्याची सोय करण्याचा मानस आहे याशिवाय या सरकारने कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या अनुषंगाने जो लावा नेमलेला आहे त्यामुळे आपले हक्काचे 21 टी एम सी चे पाणी वाढून ते 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकते असा दावा आमदार चव्हाण यांनी करताना या सरकारने या योजनेसाठी कोणताही निधी दिला नाही केवळ घोषणाबाजी करून लोकांना या सरकारने नाराज केले आहे त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही यांनी केलेल्या घोषणा आपल्याला पूर्ण करावे लागतील असा राजकीय टोला मारला. तुळजाभवानी शाकंबरी सांस्कृतिक महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठी आपण  बैठकीमध्ये विषय मंजूर केला आहे त्याशिवाय तुळजापूर शहरांमध्ये सांस्कृतिक सभाग्रह ची गरज लक्षात घेऊन अद्यावत नाट्यग्रह बांधण्यासाठी देखील नगरपालिकेकडे जागेची मागणी केलेली आहे नगरपालिकेने नाट्यगृहासाठी जागा देऊन त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यास शहराला चांगले नाट्यग्रह मिळणार आहे असेही मधुकराव चव्हाण यांनी सांगितले


याप्रसंगी प्रमुख अतिथी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्रांसाठी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सुरुवात झाली आणि तुळजापूरच्या विकासाला गती देणारा कार्यक्रम त्यांनी दिला तो पूर्ण होण्यासाठी विलंब होत असला तरी मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम पुढे चालू आहे त्यातील तीन विकासकामांचे आज होणारे भूमिपूजन देखील समाधानकारक आहे यासह नाट्यगृहाच्या प्रश्नांमध्ये नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष घालून त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवाव्यात आणि शहराला चांगले नाट्यग्रह उपलब्ध करून द्यावे.  याशिवाय शहराची गरज लक्षात घेऊन शंभर खाटांचे आयसीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल झाल्यास तुळजापूर परिसराची मोठी गरज पूर्ण होणार आहे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न केले जावेत रामदारा तलावांमध्ये भाविक भक्तांना वावरता यावे असे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात यावे अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्या. तीर्थक्षेत्र विकास समितीचे सदस्य माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला निश्चित गती मिळाली आहे असे सांगितले तर प्राधिकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी शहराच्या विकासाच्या गरजा लक्षात घेऊन प्राधिकरणाने तयार केलेला आराखडा पूर्ण होत आला आहे मात्र निधीची गरज आहे असे सांगितले प्रारंभी नगराध्यक्ष बापूसाहेब कने यांनी प्रास्ताविक भाषणात नगरपालिकेने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन तुळजापूर नगरपालिका सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि हाती घेतलेली विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतिष महामुनी आणि आभार प्रदर्शन नगरसेवक अमर मगर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत रणजीत इंगळे  राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले,  संदीप गंगणे, पंडित जगदाळे , सचिन पाटील , प्रा. आशा बिडकर , विजय कंदले आदींनी केले. कार्यक्रमास माजी नगरसेवक राजा मामा भोसले , बाळासाहेब शिंदे , औदुंबर कदम ,लखन पेंदे,  भारत कदम ,अमर हंगरगेकर ,किशोर साठे ,अफसर शेख, सचिन रोचकरी  ,खंडू जाधव , सुनील रोचकरी, संतोष कदम ,कुलदीप मगर, विजय गंगणे, अभिजित कदम , राजेश शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवताना भाजपा कार्यकर्ते


चौकट मध्ये :

तुळजापुरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास आमदार सुजितसिंह ठाकूर यांना निमंत्रित न केल्याबद्दल निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली सुमारे वीस मिनिटे घोषणा देत कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचा निषेध केला दरम्यान सत्ताधारी नगरपालिकेच्या कार्यकर्त्याकडून देखील भाजप कार्यकर्त्यांना घोषणा देऊन प्रत्युत्तर देण्यात आले कोणताही अनुचित प्रकार न घडता हा घोषणाबाजीचा कार्यक्रम झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...