गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढविणार : अँड अनिल काळे

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढविणार : अँड अनिल काळे


तुळजापूर /प्रतिनिधी

आगामी काळात सन २०१९ मध्ये होणा-या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदारी करत असताना पक्षाचे धोरण व सरकारच्या योजना जनतेपर्यंत पाहोंच करण्यात यश आलेले आहे. मग "वन बुथ २५ युथ" ही योजना असेल गाव तेथे शाखा योजना असेल. तसेच समाजातील सर्व घटक महिला, तरूण यांना जोडण्याचे काम सातत्याने करत असल्याने, माझ्या सारख्या उच्च, विद्याविभुषित व स्वच्छ प्रतिमेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने तुळजापूर, विधानसभा मतदार संघामधून उमेदवारी दिल्यास मी, विधानसभा लढवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, अँड अनिल काळे यांनी सांगितले


तुळजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा काळे यांनी तालुका भाजप कार्यालय येथे पत्रकारदिन विशेष सन्मान सत्कार आयोजित केला होता त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले,यावेळी तुळजापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना पुढे म्हणाले की मी, गेल्या २५ वर्षापासून भाजपामध्ये अनेक प्रतिकुल परिस्थितीमध्ये काम करत असून, मौजे केमवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच, मौजे सावरगांव-केमवाडी वि.का.से.सो. चा चेअरमन म्हणूनही काम केले आहे. तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्हयामध्ये पक्षाच्या विविध पदावर काम केलेले आहे. भाजपाचा तुळजापूर तालुक्याचा कार्यकारिणी सदस्य म्हणून सन १९९६ मध्ये कामास सुरूवात करून, धाराशिव जिल्हा सहकार आघाडीचा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विधानसभा मतदार संघाचा पालक, प्रभारी म्हणून सध्या काम करत आहे. या कालावधी मध्ये पक्षाने संघटनेसाठी जी कांही जबाबदारी सोपविली, ती प्रामाणिकपणे, सातत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता, पार पाडलेली आहे.


पक्षामध्ये काम करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधण्याचा व त्यांच्या कामाच्या पध्दतीचा अनुभव जवळून पाहता आला. तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  तसेच ज्यांच्यामुळे राजकारणामध्ये मला खंबीर साथ मिळाली व सुख-दुःखामध्ये मला साथ दिली ते भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यामुळे हा राजकारणातील यशस्वी प्रवास करता आला.


आपण कांही तरी समाजाचे देणे लागतो, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या भावनेने काम करत असताना तुळजापूर तालुक्यातील गोर-गरीब, शेतकरी, तरूण सर्व जाती धर्मातील नागरीक यांच्यासाठी आपल्याला कांही चांगले काम करता आले तर त्यातच मी, धन्यता मानणारा कार्यकर्ता आहे.


तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये उद्योग-धंद्याची वाणवा आहे, आहे ते सहकरातील सर्व उद्योग बंद पडलेले आहेत, सहकारी बँकाही बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी, तरूण व नागरीक यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. शेतीसाठी शाश्वत पाणी नसल्याने शेती पिकत नाही, त्यामुळे शेतकरी सुजलाम-सुफलाम व्हावे, म्हणून माझे स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी उजनीचे पाणी तुळजापूर तालुक्याला मिळायला पाहिजे, यासाठी मी, प्रयत्नशिल आहे. घाटने बॅरेजेसमधून कॅनॉलद्वारे पाणी रामधरापर्यत आणणे व तेथुन मोर्डा मार्गे लोहारा, नळदुर्ग व उमरगा या मार्गे नेणे, हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता मी, प्रामाणिकपणे प्रयत्नशिल आहे.


श्री.तुळजाभवानी मातेचा आशिर्वाद आपणा सर्वाना आहे, त्यांचे नांव असलेल्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय वाचावे व ते बंद पडू नये व ते सरकार अधिग्रहीत करावे, यासाठी मी, शासनाकडे सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच तुळजापूरला एम.आय.डी.सी. नाही, ती आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातून व देशभरातून श्री.तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येत असतात, त्यांच्या सोयी-सुविधाकरिता प्राधिकरणाच्या माध्यमातून तुळजापूरचा विकास करणे हे प्रथमतः प्राधान्याने करणे हे माझे उद्दिष्ट आहे.


तुळजापूर तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून, शेजारील मोठी गांवे स्मार्ट व्हीलेज कशी बनविता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे. शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही, शेतक-यांनी उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहच करणे व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे स्वप्नातील तुळजापूर तालुका घडविण्याचा प्रयत्न करणार आहे.


अनेक वर्षापासून पक्षासाठी एकनिष्ठेने व निष्कलंकपणे सतत कार्यरत राहणारा कार्यकर्ता म्हणून मी, माझी प्रतिमा जपण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. तसेच सर्व धर्मीय जनतेच्या संपर्काच्या माध्यमातून जनतेच्या समस्यां सोडविण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. यापूर्वी दोन्ही वेळेस विधानसभेकरिता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती. परंतु जरी पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षाचा एक पाईक म्हणून त्या-त्या उमेदवाराचा निवडणूकीमध्ये प्रामाणिकपणे प्रचार करून, निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...