नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी व चांगले कुस्ती पटटू निर्माण व्हावे यासाठी श्री खंडोबा यात्रेनिमीत्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले-अशोक जगदाळे.
नळदुर्ग/प्रतिनिधी
हाप्पी डावावर आवघ्या दिड मिनीटात उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान योगेश पवार याने महान भारत केसरी विजेता पैलवान योगेश बोंबाले याला आस्माना दाखवून नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धा जिंकून एक लाख अकरा हजार 111 रुपयेचे पहिले पारितोषीक व मानाचा चांदीचा गदा मिळविला. शेवटची ही कुस्ती अतिशय चिततथराक झाली.
दि. 22 जानेवारी रोजी नळदुर्ग ( मैलारपूर ) येथे श्री खंडोबा यात्रेनिमीत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पालिका व श्री खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समीतीने मैलारपूरात भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी पैलवानास एक लाख अकरा हजार 111 अकरा रपये व मानाचा चांदीचा गदा देण्यात आला. त्याचबरोबर या स्पर्धेत आणखी हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात आले. प्रारंभी दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करुन आखाडयाचे पूजन करण्यात आले. व त्या नंतर कुस्ती स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर शहरातील व ग्रामीण भागातील आलेल्या लहान मुलांच्या कुस्ती घेण्यात आल्या. यामध्ये नळदुर्ग येथील छोटा पैलवान समर्थ मारुती घोडके वय आठ वर्षे याने मैदान गाजविले. याने दोन कुस्त्या जिंकून नळदुर्गची कुस्ती क्षेत्रातील काय ताकद आहे हे दाखवून दिले.
या वेळी बोलताना अशोक जगदाळे म्हणाले की, कुस्ती हा खेळ मर्दानी खेळ आहे, मात्र सध्या हा खेळ लोप पावत चालल्याने आजच्या युवकांमध्ये कुस्ती खेळाची आवड निर्माण वहवी तसेच ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या नंतर कुस्ती आखाडयात कुस्तयांच्या दंगलीला सुरुवात झाली. या स्पर्धेचे मुख्य आकर्षन म्हणजे लातूरची पैलवान श्रुती ठाकूर व परभणीचा पैलवान संतोष धुळगुडे यांच्यात झालेली कुस्ती. मुला मुलींच्या या कुस्ती मध्ये श्रुती ठाकूर हिने संतोष धुळगुडे यास जेरीस आणले होते मात्र अखेर पंचानी ही कुस्ती बरोबरीत सोडविली. त्याच बरोबर कु. साक्षी ठाकूर व कुमारी आहूती जाधवर यांच्यात झालेल्या कुस्ती मध्ये कु. साक्षी ठाकूर हिने विजय मिळविला. त्याच बरोबर या स्पर्धेत झालेल्या 51 हजार रुपये बक्षीसाच्या कुस्ती मध्ये खुदावाडीचा पैलवान सुंदर जवळगे यांने पुण्याच्या पप्पू काळेला आस्मान दाखविले तर दुसरी 51 हजाराची कुस्ती मध्ये पैलवान विकास धोत्रे सोलापूर व पैलवान बबलू धनके सिंदफळ यांच्यात झाली. मात्र ही कुस्ती पंचांनी बरोबरीत सोडविली. त्याच बरोबर या स्पर्धेत पैलवान अंगद बुलबुले सोलापूर, पैलवान मार्तंड मोकाशे अणदुर, पैलवान रोहीत डुकरे नळदुर्ग, पैलवान शशिकांत कांबळे रामलिंग मुदगड, पैलवान बाबासाहेब चव्हाण सोलापूर, पैलवान आकाश भोसले होर्टी, पैलवान ज्ञानेश्वर जाधव सोलापूर, पैलवान रविंद्र साखरे सोलापूर, पैलवान राघवेंद्र बरवे मानेवाडी, पैलवान वजीर मारीआईवाले मंद्रुप, पैलवान राम हराळे, पैलवान महेश शेळके सोलापूर या पैलवानांनी आपआपल्या गटात विजय मिळविला. या स्पर्धेत लहान पैलवानांच्या तसेच तुळजापूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील अनेक पैलवानांच्या कुस्त्या झाल्या.
या नंतर शेवटची व मानाची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता व सोलापूर येथील श्री कृष्ण तालीम संघाचा योगेश पवार व महान भारत केसरी विजेता व गंगावेस तालीम संघ कोल्हापूरचा पैलवान योगेश बोंबाले यांच्यात झाली. दोन तगडया व ताकदवान पैलवानांची ही कुस्ती रंगतदार होण्याची शक्यता होती मात्र कुस्ती सुरु झाल्यानंतर पैलवान योगेश पवार यांने आवघ्या दिडच मिनीटात कुस्तीतील हाप्पी डावावर पैलवान योगेश बोंबाले याला आस्मान दाखवून पैलवान योगेश पवार याने स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये अकरा हजार 111 रुपये व मानाचा चांदीचा गदा पटकाविला. या कुस्ती मध्ये योगेश पवार याने योगेश बोंबाले यास कुठलीच बचावाची संधी दिली नाही. त्यामुळे आवघ्या दिडच मिनीटात ही कुस्ती निकाली लागली.
पहिली कुस्ती कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणच्या वतीने अशोक जगदाळे यांनी लावली होती तर स्पर्धेतील विजेत्या पैलवानास कै. नरहरी दादा बापूराव पूदाले यांच्या स्मरणार्थ पूदाले परिवारांकडून मानाचा चांदीचा गदा देण्यात आला. त्याच बरोबर स्पर्धेतील प्रत्येक विजयी पैलवानास अशोक जगदाळे यांच्या कडून स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. तर या स्पर्धेतील पहिल्या तीन कुस्तीतील विजेत्या पैलवानास कै. रेवप्पा सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र सोनकांबळे यांच्या कडून ढाल देवून त्यांचा गौरव करण्यात आला. ही स्पर्धा अतिशय शांततेत व चांगल्या वातावरणात व उत्साही वातावरणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या सहभागामुळे हि स्पर्धा अतिशय रंगतदार व थाटामाटात पार पडली. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन नागरीक उपस्थीत होते. या स्पर्धेसाठी अणदुरचे श्री घुगे, खुदावाडीचे उपसरपंच शिवप्पा जवळगे, भरत मेकाले, सुधाकर चव्हाण, शिवाजीराव वऱ्हाडे गुरुजी, राजेंद्र काशिद यांनी पंच म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती समीतीचे अध्यक्ष राजाभाउ ठाकूर, उपाध्यक्ष अनिल पूदाले, बंडू विनायक पूदाले, पदमाकर घोडके, रमेश जाधव, संजय मोरे, संजय बताले, नितीन कासार, अमृत पूदाले, शरद बागल, विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, संतोष पूदाले, ज्ञानेश्वर घोडके, नवल जाधव, संजय विठठल जाधव यांनी परिश्रम घेतले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी उपस्थीती दाखवीली शिवाय या सर्व मान्यवरांचा अशोक जगदाळे यांच्या हस्ते स्वागत ही करण्यात आले.
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा