गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

लोहारा येथे परिसर भेटी उपक्रम अंतर्गत गुऱ्हाळास भेट

लोहारा येथे परिसर भेटी उपक्रम अंतर्गत गुऱ्हाळास भेट



लोहारा  / सुमित झिंगाडे

 लोहारा तालुक्यातील मोघा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,मोघा खुर्द च्या विद्यार्थ्यासाठी परिसर भेट उपक्रमाअंतर्गत अंगद शिवाजी भोंडवे, यांच्या शेतातील गुऱ्हाळास दि 21रोजी भेट देण्यात आली.यावेळी मुलांनी रस,गुळ व ऊसाचा आस्वाद घेतला.गुऱ्हाळातील महादेव पाटील ,यांनी करचर विषयी माहीती दिली. कालीदास गोरे, यांनी गुळ कसा तयार होतो, याविषयी विद्यार्थांना माहीती दिली.महादेव भोंडवे ,व सुभाष पाटील, यांनी रसापासून पाक,चिक्की कशी तयार होते तसेच गुऱ्हाळासाठी लागणारे साहीत्याची माहीती दिली.यावेळी गुऱ्हाळ मालक रविंद्र कोकणे, यांचा पुष्प देवुन विद्यार्थ्यांनी सत्कार करून आभार मानले.यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके,शालेय पोषण आहार कर्मचारी हमीद मुजावर, उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरील आनंद दिसुन येत होता.परिसर भेटीतुन विद्यार्थ्यावरील तणाव दुर व्हावा व परिसरातील उद्योगाचे ज्ञान विद्यार्थांना व्हावे ,याकरीता क्षेत्रभेटीचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक विकास घोडके ,यांनी सांगितले.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

जय अंबिका मंडळ प्रणित शिवजन्मोत्सवानिमीत्त वक्तृत्व स्पर्धेचे आज आयोजन

जय अंबिका मंडळ प्रणित शिवजन्मोत्सवानिमीत्त वक्तृत्व स्पर्धेचे आज  आयोजन


तुळजापूर/प्रतिनिधी


कमान वेस, तुळजापूर येथील जय अंबिका मंडळ, प्रणित शिवजन्मोत्सवानिमीत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले आहे. सदर स्पर्धेचे लहान गट व मोठा गट असे दोन गट असून, दोन्ही गटासाठी प्रथम, व्दितीय व तृतीय असे पारितोषिक देण्यांत येणार आहे. सदरची स्पर्धा आज गुरुवार (दि.21) रोजी कमान वेस, डुल्या मारुती समोर, सायंकाळी पाच वाजता आयोजीत करण्यात आली आहे.


मोठ्या गटातील प्रथम क्रमांकासाठी रु. 3100 माजी अंबरिष जाधव, द्वितीय क्रमांकासाठी रु. 2100, कै.हिम्मतराव लोंढे यांच्या स्मरणार्थ, धिरज लोंढे, तर तृतीय क्रमांकासाठी रु.1100, रमेश काकासाहेब चिवचिवे, यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.


लहान गटातील प्रथम क्रमांकासाठी रु. 2100, कै.बाळू भिमराव बर्वे, यांच्या स्मरणार्थ विनायक बर्वे, द्वितीय क्रमांकासाठी रू. 1100, किशोर राजू भोसले, तर तृतीय क्रमांकासाठी रू. 751, अमर संजय कदम, यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. तसेच कै. भगवानराव संभाजीराव कदम यांच्या स्मरणार्थ अभिजित कदम, यांच्या तर्फे चषक देण्यात येणार आहे.


तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्यास घेऊन, जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन जय अंबिका मंडळ, प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बसव प्रतिष्ठाण च्या आंदोलन आणि पाठपुराव्याला यश मुरूम परिसरातील रस्त्यासाठी रामलिंग पुराणे यांनी खेचून आणले 50 लाख रुपये

सव प्रतिष्ठाण च्या आंदोलन आणि पाठपुराव्याला यश 

मुरूम परिसरातील रस्त्यासाठी रामलिंग पुराणे यांनी खेचून आणले 50 लाख रुपये

मुरुम/ प्रतिनिधी

मुरूम परिसरातील रस्त्या साठी बसव प्रतिष्ठाण च्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होते व तसेच त्यासाठी पाठपुरावा ही चालू होते. बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांच्या प्रयत्नामुळे मुरूम परिसरातील फुलसिंगनगर तांडा-मुरूम, भुयार चिंचोली-नाईक नगर, आलूर-जवळगा, येनेगुर-जेवळी, भुसणीवाडी-मुरूम या रस्त्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये 3054 मधून मंजूर करण्यात आले असून निधी उपलब्धतेनुसार कामास सुरुवात केली जाईल तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी मुरूम परिसरातील समस्याकडे पाठ फिरवली आहे   मुरूम परिसरातील रस्त्याची दैनिय अवस्था पाहून आमदारांनी ही त्याकडे दुर्लक्षित केले, ज्या रस्तासाठी गेले अनेक वर्षापासून संघर्ष चालू आहेत, त्या रस्त्याला तर आमदारांनी निधी आणली नाही, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांचे रस्त्यासाठी वारंवार आंदोलने, प्रशासनास केलेले पाठपुरावास यश आले असून, 3054 अंतर्गत एकूण 50 लाख रुपयेचे रस्ता कामासाठी मंजूर करून घेण्यात आले. कसल्याही प्रकारची पदे न बाळगणारा एक सामाजिक कार्यकर्ता जनतेचे होणारे त्रास लक्षात घेऊन प्रशासनास झगडून ही निधी हिसकावून आणले असे चर्चा परिसरात होत आहे.


चौकट

----------------------------------------

जनसामान्य नागरिकांसाठी बसव प्रतिष्ठाण सदैव कार्यरत आहे, फक्त जनतेने संयम बाळगणे महत्वाचे असते, कारण "सबर का फल मिठा होता है" निधीची उपलब्धता होताच कामास सुरुवात होईल, खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षित पणामुळेच आज उस्मानाबाद जिल्हा मागसलेच्या यादीत गेला आहे, कोटयावधी निधी जि.प. कडे पडून आहे ती वापर न झाल्याने परत जाणांच्या मार्गवर आहे. मंजूर झालेली निधीचा खऱ्या अर्थाने जनतेचा श्रेय आहे.


-रामलिंग पुराणे

सामाजिक कार्यकर्ता



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

स्पर्धेला स्वीकारले तर स्पर्धा परीक्षांची भीती वाटणार नाही- डॉ. राम जाधव

स्पर्धेला स्वीकारले तर स्पर्धा परीक्षांची भीती वाटणार नाही- डॉ. राम जाधव


सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी कळत न कळत या जीवघेण्या स्पर्धेचा भाग बनत असतो. त्यामुळे या स्पर्धेला सहजरीत्या स्वीकारले तर त्याची भीती आपल्याला वाटणार नाही* असे मत दिशा अकॅडमी चे संचालक डॉ. राम जाधव यांनी "सेट/नेट/ पेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा" उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. 


श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात (दि. २०) कला शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सेट/नेट/ पेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसंत हिस्सल हे होते तर उपप्राचार्य व्ही. एस. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रसंगी कितीही अपयश आले तरीही यशाची कास सोडू नका असे प्रतिपादन डॉ. हिस्सल यांनी अध्यक्षीय भाषणात केले. 


कार्यशाळेदरम्यान अनेक विषयावर चर्चा व उपस्थित तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संशोधन पूर्व परिक्षेसंबधी प्रा. डी. व्ही. थोरे, संशोधन पत्र कसे लिहावे? यावर डॉ. विनोद देवरकर, तयारी नेट/ सेटची यावर डॉ. एस. टी. तोडकर, बदलती परीक्षा पद्धती या विषयावर डॉ. ए. एम. गाडेकर व ऑनलाईन नेट/ सेट परीक्षा यावर प्रा. अंकुश गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 


या कार्यशाळेची प्रस्तावना उपप्राचार्य डी. व्ही. थोरे यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. सन्मुख मुछट्टे तर डॉ. डी. बी. ढोबळे यांनी आभार मानले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत- 20/02/2019

 

“ उस्मानाबाद शहरात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार

 

 

पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद :-  उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे उस्मानाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्था वाहतुकीचे नियंत्रण, महिला / मुलींची छेडछाडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर लक्ष ठेवणे व इतर महत्वाच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी उस्मानाबाद शहरातील महत्वपुर्ण 20 ठिकाणी  (चौक, शाळा, कॉलेज, एस.टी.स्टँड इत्यादी  ठिकाणी )  60 सी.सी.टी.व्ही  कॅमेरे यंत्रणा उभारणी करण्यात येणार आहे त्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. सदर निविदा संदर्भात संपुर्ण माहितीwww.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर CCTV System at Osmanabad City   या नावाने उपलब्ध आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद यांनी दिली आहे.

 “ उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे /- रु. चा माल जप्त 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 19.02.2019 रोजी 20.20 वा. भारत टॉकीज समोरील पश्चिमेस रोडलगत पत्र्याचे शेडचे बाजूला फिरोज गणी सय्यद रा.आगडगल्ली उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद  याने विनापास परवाना बेकायदेशीर प्रो दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 60 लि. सिंध्दी (ताडी) किं अं. 3,000/- रु. 4 घागर जु.वा.किं.अं. 400/-रु  , 2  प्लास्टिक मग जु.वा.किं.अं 20/-रु. असा एकूण 3,420/- रु.चा माल स्वताचे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 19.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर)  येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन नळदुर्ग :-  दिनांक 19.02.2019 रोजी 19.00 वा. काळेगाव येथे आकाश कालीदास भोवाळ रा.काळेगाव याने त्याचे घरासमोर  विनापास परवाना बेकायदेशीर गाहभ , देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 44 लि. गाहभ दारु व देशी दारुच्या 4 बाटल्या असा एकूण किं अं. 2,970/- रु. चा माल स्वताचे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 19.02.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग  येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली आहे.

  उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 08 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 19/02/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 08 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 5 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

 

 

2

  मौजे एरंडगाव येथे पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचे कारणावरून मारहान 

 

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 19.02.2019 रोजी 16.30 वा. मौजे एरंडगाव येथे बप्पा रणदिवे यांचे दुकानासमोर 1) संजय जिवन गायकवाड 2) राजेश जिवन गायकवाड 3) विजय जिवन गायकवाड 4) अजिंक्य राजेश गायकवाड सर्व रा.एरंडगाव ता.कळंब यांनी संगणमत करुन संभाजी हरिबा गायकवाड रा.एरंडगाव ता.कळंब यांना तु आमचे विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार का दिली या कारणावरून शिवीगाळ करुन  लाथाबुक्यांनी मारहान करित असताना राजेश जिवन गायकवाड, विजय जिवन गायकवाड, अजिंक्य राजेश गायकवाड हे तेथे आले त्यावेळी राजेश जिवन गायकवाड याने संभाजी हरिबा गायकवाड यांना धरले व लाथ मारली त्यावेळी विजय गायकवाड, अजिंक्य गायकवाड यांनी त्यांचे हातातील सायकलचे चैनने संभाजी हरिबा गायकवाड यांना मारहान केली तेवढयात संजय गायकवाड याने पळत जावुन लाकडी दांडा हातात घेवुन आला व संभाजी हरिबा गायकवाड यांच्या उजवे हाताचे कोपरावर मारला म्हणून संभाजी हरिबा गायकवाड यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 19.02.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कळंब येथे सार्वजनिक उत्सवामध्ये तीव्र आवाजात डॉल्बी वाजवणारांवर गुन्हे नोंद

 

पोलीस स्टेशन कळंब :-  दिनांक 19.02.2019 रोजी 19.15 वा. होळकर चौक कळंब येथे ते 20.58 वा. शिवाजी चौक कळंब येथे मिरवणुकीसाठी ध्वनीक्षेपकाचा / डॉल्बीचा आवाज मा.सर्वोच्च न्यायालयाने ठरवुन दिलेल्या मानांकनासमोर वेळोवेळी चेक केला असता त्याच्या आवाजाची तिव्रता 80 डेसीबल पेक्षा जास्त आढळुन आली त्यामुळे सार्वजनिक उत्सव मंडळ इंदिरानगरचे अध्यक्ष शशिकांत बप्पा निरफळ रा.कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद यास परवाना देतेवेळी सीआरपीसी. कलम 149 प्रमाणे लेखी दिलेल्या आदेशाचा भंग केला व विशाल प्रकाश चव्हाण रा.रविवार पेठ ता.कराड जि. सातारा यांना डिजे चा आवाज कमी करणेबाबत लेखी सुचनापत्र दिले असताना सुध्दा त्यांनी सदरच्या आदेशाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करुन सार्वजनिक उपद्रव थांबविण्याचा आदेश दिला असतानाही तो चालुच ठेवला तसेच ध्वनी प्रदुषण कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 291,188 सह पर्यावरण संरक्षण अधिनियमचे कलम 15 व ध्वनीप्रदुषण (विनीयम व नियंत्रण) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन कळंब :-  दिनांक 19.02.2019 रोजी 20.13 वा.  शिवाजी चौक कळंब येथे मिरवणुकीसाठी ध्वनीक्षेपकाचा / डॉल्बीचा आवाज मा.सर्वोच्च न्यायालयाने ठरवुन दिलेल्या मानांकनासमोर वेळोवेळी चेक केला असता त्याच्या आवाजाची तिव्रता 80 डेसीबल पेक्षा जास्त आढळुन आली त्यामुळे सार्वजनिक उत्सव मंडळ मार्केट यार्ड कळंब चे अध्यक्ष रामकिसन संभाजी राखुंडे रा.मार्केट यार्ड कळंब  यास परवाना देतेवेळी सीआरपीसी. कलम 149 प्रमाणे लेखी दिलेल्या आदेशाचा भंग केला व राहुल महादेव झिरपे रा.कोळगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर यांना डिजे चा आवाज कमी करणेबाबत लेखी सुचनापत्र दिले असताना सुध्दा त्यांनी सदरच्या आदेशाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करुन सार्वजनिक उपद्रव थांबविण्याचा आदेश दिला असतानाही तो चालुच ठेवला तसेच ध्वनी प्रदुषण कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 291,188 सह पर्यावरण संरक्षण अधिनियमचे कलम 15 व ध्वनीप्रदुषण (विनीयम व नियंत्रण) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

3

 मौजे तुगाव येथे लहान मुलांच्या भांडणावरून मारहान

 

पोलीस स्टेशन मुरूम :-  दिनांक 19.02.2019 रोजी 19.00 वा.सु. मौजे तुगाव येथे 1) भिमसिंग दत्तात्रय रुपनुरे 2) योगेश शंकर लोहार 3) शंकर चंद्रकांत लोहार 4) महेश शंकर लोहार सर्व रा. तुगाव यांनी संगणमत करुन लहान लेकराचे भांडणाचे कारणावरून  किशोर विलास सोलनकर रा.तुगाव  यांना भिमसिंग दत्तात्रय रुपनुरे याने त्याचे हातातील साखळीने मारुन जखमी केले आहे. व योगेश शंकर लोहार याने कुऱ्हाडीच्या दांडयाने मारहान केली. तसेच शंकर व महेश यांनी पण किशोर सोलनकर त्यांचा चुलत भाऊ विकास व्यंकट सोलनकर व चुलतीस मारहान केली व मारहानीत चुलतीच्या गळयातील मंगळसुत्र व कानातील फुल व झुमके झोंबाझोंबीत तुटून पडले आहेत. तसेच भिमसिंग , योगेश, शंकर आणि महेश यांनी शिवीगाळ करुन तु पोलीस केस केलास तर तुला जीव मारुन टाकतो अशी धमकी दिली म्हणून किशोर विलास सोलनकर यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्‍द दिनांक 19.02.2019  रोजी पोलीस स्टेशन मुरूम येथे भादंविचे कलम 324,327,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तामलवाडी टोलनाक्याजवळ एस.टी. बसमध्ये चोरी

 

पोलीस स्टेशन तामलवाडी :-  दिनांक 19.02.2019 रोजी 15.30 वा.सु. तामलवाडी टोलनाक्याजवळ ज्ञानेश्वर शाहुराज पाटील रा. नांदुर्गा ता.जि.उस्मानाबाद हे स्वारगेट येथुन तुळजापूर येथे येत असताना एस.टी.बस मध्ये तामलवाडी टोलनाक्याजवळ पाहीले असता ज्ञानेश्वर पाटील यांच्या सुटकेस मध्ये ठेवलेले बॉक्समधील 13 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 3,000/-रु असा एकूण 3,28,000/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे म्हणून ज्ञानेश्वर शाहुराज पाटील यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भांदविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे आळणी शिवारात ज्वारीच्या पिकाची चोरी 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :-  दिनांक 09.02.2019 रोजी 12.00 वा. बबन मारोती तौर रा.आळणी ता.जि.उस्मानाबाद यांचे शेत गट नं. 479 मधील पाऊण एकर ज्वारीचे उभे पिक किं.अं. 7,000/- रु. चे 1) तानाजी मारोती तौर 2) नंदकुमार तानाजी तौर व एक महिला सर्व रा. आळणी ता.जि.उस्मानाबाद यांनी चोरुन नेले आहे. म्हणून बबन मारोती तौर यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ उस्मानाबाद येथे घरच्यांच्या जाचास कंटाळुन आत्महत्या गुन्हा नोंद

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 15.02.2019 रोजी व त्यापुर्वी दोन तीन महिन्यापासुन 1) दत्ता पांडुरंग काळे (नंदेचा पती) व ननंद दोघे रा. समता नगर उस्मानाबाद ,नंनंद रा. फिल्टर टाकी समोर उस्मानाबाद व सासु रा. विजय चौक जुनी गल्ली उस्मानाबाद यांनी गणेश रखमाजी मोरे (मयत) व त्यांची पत्नी यांना राहत असलेले खर प्लॉट नं. 17 फिल्टर टाकी जवळ, उस्मानाबाद शहरात राहते घरी येवुन घर खाली करुन देण्याचे कारणावरुन तसेच गाडी धंद्याचे पैशाचे कारणावरुन कुरापत काढुन मारहान व शिवीगाळ करुन मानसिक शारिरिक त्रास दिला त्यांचे त्रासास कंटाळुन गणेश रखमाजी मोरे (मयत) यांनी दिनांक 15.02.2019 रोजी 07.00 ते 07.30 वा.चे दरम्यान रॉकेल ओतुन घेवुन समता नगर उस्मानाबाद येथे पेटवुन घेतले त्यात ते 100 टक्के जळाल्याने दिनांक 19.02.2019 रोजी उपचारा दरम्यान मयत झाले आहेत. त्यांचे मरणास वरिल लोक जबाबदार आहेत म्हणून गणेश रखमाजी मोरे यांचे पत्नीचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 306,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

4

 उस्मानाबाद येथून 15 वर्षीय मुलास पळवुन नेले म्हणून गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 15.02.2019 रोजी 10.00 वा. अभिषेक मसु गायकवाड रा. बौध्द नगर , उस्मानाबाद हा घरातुन बाहेर जातो असे म्हणून गेला तो घरी परत आला नाही म्हणून दिनांक 20.02.2019 रोजी पावेतो त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही म्हणून शिवाजी बाबु शिंदे यांची खात्री झाली की त्यांचा नातु अभिषेक मसु गायकवाड यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन नेले आहे म्हणून शिवाजी बाबु शिंदे यांचे फिर्यादवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

मिटकर गुरुजींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे - न्यायमूर्ती अंबादास जोशी

मिटकर गुरुजींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे -            न्यायमूर्ती अंबादास जोशी

नळदुर्ग/प्रतिनिधी

आपल्या आयुष्यातील 32 वर्षे शिक्षकी पेशात राहून गुरुजींनी असंख्य विद्यार्थी घडवण्याबरोबरच समाजामध्ये अध्यात्मिक , व्यसनमुक्ती , धार्मिक , सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले . 

सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजीराव मिटकर यांच्या " अमृत महोत्सवानिमित्त”नळदुर्ग येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . प्रारंभी वाचन संस्कृतीची  गोडी रुजावी म्हणून महाराष्ट्रातील दर्जेदार लेखकांच्या पुस्तकांची ग्रंथतुला करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या कार्यावर आधारित दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन महंत तुकोजीबुवा, महाराष्ट्र बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष 

 प्रवीण घुगे , उद्योगपती  वैजनाथ लातूरे,  नळदुर्गच्या नगराध्यक्षा रेखा ताई जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी पासून अलिप्त राहून काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांना पाच लाखांचा सामाजिक कृतज्ञता निधी सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष,प्राचार्य गजानन धरणे , नगरसेवक श्री विशाल रोचकरी, एसबीआयचे अधिकारी श्री बाळासाहेब हंगरगेकर, उपनगराध्यक्ष श्री नितीन कासार, मुख्याधिकारी  उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखक, कवी जय मेहता, श्री रावसाहेब कुलकर्णी ,  डॉ. जितेंद्र कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री.बाळासाहेब हंगरगेकर व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने संबळ व तुतारीच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी उमरगा- लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले , तुळजापूर तालुक्याचे काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण, भाजपचे विधान परिषदेचे आमदार  सुजितसिंह ठाकुर, शिक्षण महर्षी,माजी आमदार 

 सि.ना.आलुरे गुरुजी,अतिरिक्त पोलिस  अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपाधीक्षक  संदीप घुगे,पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, महामार्ग पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर सुतार,महाराष्ट्र व गोवा राज्याचे भारतीय जनता पार्टीचे संघटक विजयराव पुराणीक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कुटुंब प्रबोधन प्रमुख  विवेकराव अयाचित, भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य  नितीन काळे,भाजप मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष  धनंजय रणदिवे, तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अँड मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य  प्रकाश चव्हाण, राष्टृवादी पक्षाचे नेते  महेंद्र धुरगुडे, श्री गणेश सोनटक्‍के, अणदूरच्या सरपंच सरिता मोकाशे ,अँड अनिल काळे , प्रभाकर मुळे ,  गुलचंद व्यवहारे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष  शिवाजी गायकवाड आरपीआयचे पदाधिकारी  एस के गायकवाड धनंजय शिंगाडे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत पदाधिकारी  बाबुराव पुजारी, बालाघाट शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. डॉ. अभय शहापूरकर, प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रांताध्यक्ष  बाळकृष्ण तांबारे, भारत शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर हराळकर, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, डॉ. कार्तिक यादव, डॉ. किरण पवार,डॉ.अजित नायगावकर, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. दिग्गज दापके जिल्हा सरकारी वकील अँड शरद जाधवर एकता फाॅउंडेशनचे अभीलाश लोमटे,नगरसेवक  अभिजित काकडे , श्री विनायक अहंकारी, उदय जगदाळे, भारतीताई बनसोडे ,  बसवराज धरणे , जिल्हा सोसायटीचे चेअरमन .एल.बी. पडवळ,  सुधीर आण्णा पाटील,  सुनील चव्हाण , मा.आरोग्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक  श्रद्धानंद पाटील, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य  नागेश नाईक,  विकास मलबा,न्यूज सिक्सर चे संपादक सोमनाथ बनसोडे  तसेच वेगवेगळ्या गावांचे सरपंच,उपसरपंच मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना प्रणिता मिटकर व समारोप राधा मिटकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी केले अतिशय आगळ्यावेगळ्या,सुंदर, देखण्या व समाजामध्ये चांगला संदेश देऊ पाहणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन मिटकर कुटुंबीयांनी केले़




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

चित्रपट निर्माता महेश पटेल यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

चित्रपट निर्माता महेश पटेल यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन 


तुळजापूर /प्रतिनिधी


चित्रपट निर्माता महेश पटेल यांनी मंगळवार दि. १९ रोजी तुळजाभवानी देवीचे श्रध्दा पुर्वक दर्शन घेतले यावेळी त्यांनी देवीचा कुलकुलाचार विधिवत पुजा केली यावेळी भोपे पुजारी अतुल मलबा यांची उपस्थिती होती.पुजा विधी संपन्न झाल्यानंतर अतुल मलबा यांच्या निवासस्थानी पटेल यांचा शाल श्रीफळ देवीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.


महेश पटेल हे देवीच्या दर्शनासाठी वर्षातुन दोन वेळा येतात. यावेळी दैनिक एकमतशी बोलताना ते म्हणाले कि, सुखी असतानाही देवीचे दर्शन घ्यावे. कारण दुख असते त्यावेळी च लोकांना देवधर्म आठवतो पण सुखात असताना देवाची आठवण लोक ठेवत नाहीत. परंतू आपल्याकडे सुख असतानाही देवाची आठवण ठेवल्यास अनखीन सुख वाढते त्याप्रमाणे मीही सुखात , आनंदात देवीचे दर्शनासाठी येतो 


पटेल पुढे बोलताना म्हणाले . सध्या तीन चित्रपटाची शुटींग झालेली आहे . आणि दोन नाटके पुर्ण झाली आहेत.भाई वन टु  तसेच, करून गेला गाव माझा , हे चित्रपट आहेत सध्या एक नाटक चालु आहे. त्यात भाऊ कदम व सागर करंडे मुख्य भुमिकेत आहेत . त्याच बरोबर अनखीन एका नविन चित्रपटचे शुटींग चालु आहे . आगामी काळात वाडा , पांघरुण असे चित्रपट येणार आहेत 

महेश मांजरेकर आणि महेश पटेल यांची चित्रपट निर्मातीत पार्टनरशिप आहे.


चित्रपट फाउंडेशन कट टु कट मुव्हिज या माध्यमातून ते .चित्रपट बनवित आहोत. 


यावेळी अँड बालाजी देशमाने, तुळजापूर शहर विकास प्राधिकरण सदस्य विकास मलबा, इंद्रजित केतन, बाबासाहेब मलबा, बाबासाहेब चव्हाण, शाम भोसले, तुषार मलबा पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, प्रमोद राऊत आदींची उपस्थिती होती

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...