बुधवार, २३ जानेवारी, २०१९

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 24 जानेवारीला नळदुर्ग येथे बुथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा



उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 24 जानेवारीला नळदुर्ग येथे बुथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

पदाधिकारी यांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने 
उस्मानाबाद/प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ आणि उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या मेळाव्याचे आयोजन गुरूवार दि. 24 जानेवारी 2019 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता नळदुर्ग ता. तुळजापूर येथील बी.के.फॅक्शन हॉल अक्कलकोट रोड येथे नियोजन केलेले आहे.
सदर मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे सहप्रभारी संपतकुमार समन्वयक महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, सरचिटणीस  सत्संग मुंढे व जिल्हा प्रभारी टी.पी.मुंढे, सरचिटणीस राजेश राठोडसाहेब हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास माजी मंत्री महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री  आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  आप्पासाहेब पाटील, जि.प.विरोधी पक्ष नेते शरण पाटील उपस्थित राहणार आहेत.
तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय, मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्यांक विभाग सर्व काँग्रेसचे सेल, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, न.प.सदस्य, ग्रा.पं. सदस्य, विविध कार्यकारी से.स.सो.सदस्य जिल्ह्यातील सर्व आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य संघटक  राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे  

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

तुळजापूर तालुक्यातील पवण चक्कीच्या नावाखाली एजंट मार्फत आर्थिक लुट

तुळजापूर तालुक्यातील पवण चक्कीच्या नावाखाली एजंट मार्फत आर्थिक लुट


तुळजापूर / प्रतिनिधी 


गमेसा कंपनी, डेव्हलपर्य (सब कंपनी) यांनी तुळजापूर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतात

अनाधिकृतपणे पवन चक्की प्लॅन्ट करीत या बाबद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. २१ जानेवारी रोजी तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .


या निवेदनावर असे नमूद केले आहे की, तुळजापूर तालुका व उस्मानाबाद तालुक्यातील गमेसा कंपनी (डेव्हलपर्स सब -कंपनी) यांनी शेतक-यांची कवडीमोल किंमतीने शेती.खरेदी करुन शेतक-यांची फसवणुक करित आहेत.


उस्मानाबाद तालुका व तुळजापूर तालुका येथे शेतक-यांच्या शेतात पवण चक्की प्लॅन्टसाठी तहसिल कार्यालयाची मान्यता व त्या प्लॅन्टसाठी जमीन एन. ए. करणे अवश्यक असताना सुध्दा त्यांनी अनाधिकृत काम चालु केले आह.


तसेच तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय यांना संबंधित कंपनीने फक्त अर्ज केलेले आहेत. मात्र तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय यांनी मान्यता दिलेली नाही. किवा कंपनीने तहसिल कार्यालयातुन एन.ए. परवाना सुध्दा घेतलेला नाही. जवळपास अर्धवट काम झालेले आहे.


सध्दा दुष्काळी परिस्थितीत अधित शेतकरी अर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातुन या पवन चक्की कंपनीचा मनमानी कारभार करीत आहेत. शेतकरी वर्गाचे उभ्या पिकांचे नुकसान करुन कंपनी च्या अवजड वहाने त्याच बरोबर इतर वहाने राजरोस पणे अनाधिकृत काम चालु आहे. संबंधित पवण चक्कीचे तुळजापूर येथे एका ठिकाणी ऑफिस सुध्दा नाही. फक्त दुकानदारी मांडली प्रमाणे ऑफिस आहेत.


जिल्हाधिकारी यांनी चौकशी करुन संबंधित कंपनीवर योग्य ती कार्यवाही करावी व शेतकरी वर्गाना न्याय द्यावा. अन्यथा तुळजापूर तालुका व उस्मानाबाद तालुका मध्ये पवन चक्कीचे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पणे काम चालु आहे ते येत्या ८ दिवसात बंद करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उग्र आंदोलन करुन काम बंद करण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .


या निवेदनावर शहराध्यक्ष धर्मराज(दादा)  सावंत, समिर शेख,

अविनाश पवार,विशाल माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, २० जानेवारी, २०१९

आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी शशीकला वाघमारे तर तुळजापूर ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष पदी शिवकुमार स्वामी यांची निवड

आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी शशीकला वाघमारे तर तुळजापूर ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष पदी शिवकुमार स्वामी यांची निवड 


नळदुर्ग/प्रतिनिधी




आम आदमी पार्टी उस्मानाबाद वतीने शासकीय विश्रामगृह नळदुर्ग येथे दि 20 रोजी कार्यकर्ता पक्ष प्रवेश व निवड करण्यात आली यावेळी  आम आदमी पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा महिला आघाडीच्या  अध्यक्षपदी नळदुर्ग येथील रहिवासीअसलेल्या


 सौ.शशीकला अंबादास वाघमारे यांची नियुकी करण्यात आली तसेच अणदूर येथील रहिवासी असलेले  शिवकुमार लिंगराज स्वामी यांची आम आदमी पार्टी ओबीसी सेलच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकत्यांना आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश देण्यात आला त्यानंतर त्यांची  निवड करून  सत्कार करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अँड अजित खोत,तुळजापूर अध्यक्ष तात्या रोडे , उपाध्यक्ष साहेबाल (लालु ) शेख, पिंपळे सर, उस्मानाबाद शहर अध्यक्ष मुन्ना शेख , आप जिल्हा मिडीया प्रमुख प्रा . चांदपाशा शेख, सौदागर कावळे , तालुका युवक अध्यक्ष केशव सलगर,भारती अंधारे , सोनाली गायकवाड,अंबादास वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.शशीकला वाघमारे यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

* पक्ष वाढीसाठी महिलांचे संघटन जिल्ह्यात मजबूत करणार तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे मत यावेळी न्यूज सिक्सर शी बोलताना शशीकला वाघमारे यांनी व्यक्त केले



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

वक्तृत्व स्पर्धेतून समाज प्रबोधन : महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर

वक्तृत्व स्पर्धेतून समाज प्रबोधन : महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर 



तुळजापूर  (दि.      ) शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षी मराठवाडा सामाजिक संस्था व युवास्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, "स्पर्धा तुळजाभवानीची... वक्ता महाराष्ट्राचा" ही स्पर्धा नसून ही महाराष्ट्रातील होतकरू व अभ्यासू वक्ते निर्माण करणारी एक चळवळ आहे. यातून अनेक वक्ते तयार होत आहेत. वक्तृत्व स्पर्धेतून समाज प्रबोधन केले जात आहे. याचे सर्व श्रेय मराठवाडा सामाजिक संस्था व युवास्पंदन सामाजिक संस्थेस असून निश्चितच भविष्यात ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजन नि:पक्षपाती धोरणामुळे एकतेच्या बळावर शतकपूर्ती करेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर यांनी केला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भ्रमणध्वनी द्वारे सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद देऊन विजेत्यांचे अभिनंदन केले. 


                 यावेळी शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षी मराठवाडा सामाजिक संस्था व युवास्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, "स्पर्धा तुळजाभवानीची... वक्ता महाराष्ट्राचा जागर तपपूर्तीचा" पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, नगरसेविका आशाताई पलंगे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, भाजपा जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, बार असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब सोंजी, मिर्झनपूरचे माजी सरपंच विश्वास चव्हाण, डायटचे चंद्रकांत साळुंखे इत्यादी उपस्थित होते. 


           राज्यातून "वक्ता महाराष्ट्राचा दिवसाचा मानकरी" म्हणून मुलीत सौ. माई सोपल आश्रमशाळा, खामगाव ता. बार्शी येथील कुमारी मनस्वी मनोज गादेकर ही विद्यार्थिनी तर मुलात कै. सो. डाॅ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यालय, इचलकरंजी येथील उत्कर्ष आप्पासाहेब शेंडगे हा विद्यार्थी तर तालुक्यातून मुलात नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, तुळजापूर येथील प्रणव पांडुरंग ढेरे यांना देविची प्रतिमा,हार, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सांघिक फिरते पारितोषिक मानकरी शाळा म्हणून बालवाडी गटात तुळजापूर येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, प्राथमिक गटात लातूर येथील आर. एन. मोटेगांवकर विद्यालय तर माध्यमिक गटात सोलापूर येथील बी. एफ. दमाणी प्रशाला या तीन शाळांना फिरता चषक, डिजिटल प्रमाणपत्र व फिरती ढाल देऊन गौरविण्यात आले. 


       या स्पर्धेत बालवाडी महाराष्ट्र गटातून प्रथम क्रमांक दमाणी विद्यामंदिर, सोलापूर  येथील स्वराज घाळे, द्वितीय क्रमांक महेश इंग्लिश स्कूल, सोलापूर येथील अंशुमन नडगेरी, तृतीय क्रमांक आर. एन. मोटेगांवकर विद्यालय, लातूर येथील मुक्ता गुंजोटीकर, चतुर्थ क्रमांक स्वामी विवेकानंद स्कूल, मुंबई येथील रुद्र पवार, पाचवा क्रमांक बालभवन विद्यामंदिर, लातूर येथील दिग्विजय चव्हाण तर उत्तेजनार्थ अनुक्रमे सुप्रीत चव्हाण, अर्णव सुपाते, कौटिल्य कुडकुले, आरव थोरमोटे, कौस्तुभ फुलारी, अहद सय्यद, विश्वेश्वर आंधळकर, क्षितिज जाधव, सार्थक उंडाळे व अन्वी शहा तर बालवाडी तुळजापूर तालुका गटातून प्रथम क्रमांक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, तुळजापूर येथील प्रणव ढेरे, द्वितीय क्रमांक पोतदार जम्बो स्कूल, तुळजापूर  येथील अनिकेत पडणूर, तृतीय क्रमांक दी वर्ल्ड स्कूल तुळजापूर येथील स्वामिनी पेंदे, चतुर्थ क्रमांक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, तुळजापूर येथील तनिष्का खुरुद, पाचवा क्रमांक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३,तुळजापूर येथील अपेक्षा जाधव व उत्तेजनार्थ अनुक्रमे श्रावणी कदम, श्रेया बोंदर, शरण्या रणदिवे, साई कदम, संस्कार घोडके, तेजस पवार, अंबिका जट्टे, श्रेयानशी रोकडे, भक्ती नरवडे, शरण्या हिरोळीकर,  इयत्ता पहिली ते इयत्ता दुसरी गटातून प्रथम क्रमांक कै. सो. डाॅ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यालय, इचलकरंजी येथील उत्कर्ष शेंडगे, द्वितीय क्रमांक आर. एन. मोटेगांवकर, लातूर येथील श्रावणी घाडगे, तृतीय क्रमांक महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, लातूर  येथील अमन सय्यद, चतुर्थ क्रमांक आर. एन. मोटेगांवकर, लातूर येथील मंगेश गुंजोटीकर, पाचवा क्रमांक मराठी कन्या प्रशाला, उस्मानाबाद येथील वसुंधरा गुरव तर उत्तेजनार्थ अनुक्रमे संस्कृती पवार, आद्रा शिंदे, सोहम येमूल, विराट जाधव, सिद्धी पट्टनशेट्टी, इयत्ता तिसरी ते इयत्ता चौथी गटातून प्रथम क्रमांक आर. एन. मोटेगांवकर, लातूर येथील संयोगिता जाधव, द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालय, बारामती  येथील वैष्णव जांभळे, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तपूर येथील स्वरा शिंदे,  चतुर्थ क्रमांक आदर्श प्राथमिक विद्यालय, घाटनांदुरी येथील श्रुती साळुंखे, पाचवा क्रमांक महेश इंग्लिश स्कूल सोलापूर येथील नेहा शहा, उत्तेजनार्थ अनुक्रमे कृष्णाई जेऊरकर, सिध्दी जाजी, हर्षवर्धन नवगीरे, कौमुदी खिचडे, आर्या कोल्हाळे, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी गटातून प्रथम क्रमांक सौ. माई सोपल आश्रमशाळा, खामगाव ता. बार्शी येथील कुमारी मनस्वी गादेकर, द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील श्रेनिका जांभळे, तृतीय क्रमांक दमाणी प्रशाला, सोलापूर येथील अनुष्का बिराजदार, उत्तेजनार्थ अनुक्रमे संचित देशमुख, अनुभव ठोंबरे, साक्षी नागरगोजे, आकांक्षा गुजर, रेहान सय्यद इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी गटातून प्रथम क्रमांक बी. एफ. दमाणी प्रशाला, सोलापूर येथील संकेत मेलगिरी, द्वितीय क्रमांक वसतिगृह विद्यालय काराटी येथील ऋतुराज राऊत, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज येथील प्राजक्ता सोनवणे, उत्तेजनार्थ अनुक्रमे साधना ठोंबरे, वैभवी भंडारे, स्वराज चेडे, रणजीत शिंदे, श्रेया झांबरे सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके म्हणून रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे व शालेय शिक्षण प्रधान सचिव यांचा संस्थेस शुभेच्छा व शुभाशीर्वाद म्हणून प्राप्त शुभसंदेशाचे वाचन युवास्पंदन सामाजिक संस्थेचे सचिव प्रा. प्रशांत भागवत यांनी केले. यावेळी स्पर्धकांना शुभेच्छा स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर यांनी दिल्या. आभार मराठवाडा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष  जीवन इंगळे यांनी तर सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख शिवशंकर जळकोटे व प्रा. प्रशांत भागवत यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर, महेंद्र कावरे, किरण हंगरगेकर, विनोद पलंगे, जीवन इंगळे, देवेंद्र पवार, प्रा. प्रशांत भागवत, संदीप गंगणे, निरंजन डाके, शिवशंकर जळकोटे, अमर वाघमारे, राहूल कुलकर्णी, अविनाश सराटे, आण्णासाहेब क्षीरसागर, कुमार टोले, दत्ता सोमाजी, पद्माकर मोकाशे, विष्णु गायकवाड, नितीन ढगे, विशाल सूर्यवंशी,  किरण लोहारे, स्वाती कावरे, प्रतिभा हंगरगेकर, बंडू शेटे, सद्दाम शेख, समीर माने, सारंग कावरे,शाम खोत, नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या मीना राजू मंचच्या विद्यार्थिनी यांच्यासह दोन्ही संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेत एकूण इयत्ता बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या एकूण सहा गटातून राज्यातील २५ जिल्ह्यातील ४६५ शालेय स्पर्धकांनी विक्रमी सहभाग नोंदविला. 


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


शनिवार, १९ जानेवारी, २०१९

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्या संस्थेवर बंदी घालावी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्या संस्थेवर बंदी घालावी


दि १९/ शनिवार


लोहारा / प्रतिनिधी 


लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधणी विद्यालयात   अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन लोहारा येथील तहसीलदार यांना देण्यात आले आहे त्यात असे म्हटले आहे की हराळी येथील विद्यालय शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे त्यातील पाच आरोपी ना पकडण्यात पोलीसाना यश मिळाले मात्र एक आरोपी फरार झाला असून त्याला तात्काळ अटक करून त्या बेजबाबदार पणे वागणाऱ्या ज्ञान प्रबोधणी  संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी व तालुक्यातील प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही बसवण्यात यावी अशी मागणी लोहारा काँग्रेस   अल्पसंख्याक  तालुकाध्यक्ष  अस्लम खानापूरे, यांच्या वतीने करण्यात आली आहे त्या निवेदनावर ईनुस शेख,सरफराज सय्यद, मतीन गवंडी, आदींच्या सह्या आहेत या घटनेचा लोहारा तालुक्यातुन 

 जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे,




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी लागू - अप्पर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र खंदारे

                 

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी लागू

-           अप्पर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र खंदारे

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 दि.19 मौजे कानेगाव ता. लोहारा येथे चालू असलेल्या वादावरून सवर्ण व दलित समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सध्या तुळजाभवानी शकं भरी नवरात्र चालू असून सदर यात्रो करिता महाराष्ट्र, कर्नाटक, अध्रप्रदेश, तेलगना राज्यातून मोठया प्रमाणात भावीक येतात तरी   जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबांधित राखण्यासाठी शांततेत व सुरळीत पार पडण्याकरीता उस्मानाबाद जिल्हयात हे आदेश दि. 20 जानेवारी ते  3  फेब्रुवारी  2019  पर्यंत लागू राहतील.

पर्जन्यमान कमी पडल्याने  जनावराच्या चारा पाण्याचा तसेच सोयाबीनला योग्य भाव मिळावा व चारा छावण्या सुरू कराव्या उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागण्या करिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष,कॉग्रेस पक्ष व इतर पक्ष विविध आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुस्लीम धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मिळावी या व इतर मागण्यासाठी त्याच्याकडून आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी कॉगेस पक्ष व कॉग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल,डिझेल दर वाढीच्या अनुषंगाने अचानक पणे आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात दि. 20 ते 23 जानेवारी 2019 पावेतो श्री. खडोबा मैलापूर (नळदुर्ग)   संपन्न होणार आहे. सदर यात्रेकरिता जिल्हयातून  आजू बाजूच्या जिल्हयातून मोठया प्रमाणात भावीक दर्शना करिता येतात. दि 21 जानेवारी 2019 रोजी लोहार समाजाच्या वतीने लोहार समाजाला एस. टी प्रवर्गात आरक्षण मिळावे या व इतर मागणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा रॅली आयोजित आहे. दि.26 जानेवारी 2019 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रस पक्षा तर्फे लोहारा उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2016-2017 चा थकीत पिक विमा मिळावा या व इतर मागणी करिता पालकमंत्री उस्मानाबाद यांना घेराव आंदोलन आयोजित आहे. यांना  जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी   

  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या अधिनियम 22 च्या कलम 37 (1) व (3)अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी   राजेंद्र खंदारे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील.

          आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यता किंवा  नीतीमत्ता यास  बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्तीचे किंवा प्रतिकृत्तीचे / प्रतिमांचे पदर्शन करता येणार नाही. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने  , वाद्य वाजवणार नाहीत. सभा घेणार   नाहीत. हे आदेश उस्मानाबाद जिल्‍हयाच्या संपूर्ण हददीत लागू राहतील .

          तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकिय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्य यात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत. उक्त कालावधीत   परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. हे आदेश दि. 20 जानेवारी 2019  रोजीचे 06.00 ते  3  फेब्रुवारी  2019 रोजीच्या  रात्री  बारा पर्यंत लागू राहतील. 

                                     





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)              

तुळजापूर प्रहार जनशक्ती च्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन

तुळजापूर प्रहार जनशक्ती च्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन


मागण्या मान्य नाही केल्यास आमरण उपोषणास बसणार


तुळजापूर  (प्रतिनिधी)

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या दान पेटीत  भक्तांनी टाकलेल्या दान हे पिडित कुटूंबाच्या  आरोग्य निधी म्हणून खर्च करण्याची मागणी तुळजापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नायब तहसिलदार मोहिते यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

 नायब तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि तुळजाभवानी  देवस्थांनाच्या वतीने जे गरीब लोक ज्यांची परिस्थीती हालाकीची आहे. ज्यांची दवाखान्याचा खर्च करण्याची आयपत नाही अशा रुग्णाना बाकीच्या देवस्थाना

प्रमाणे आर्थीक मदत करण्यात यावी.दर्शनासाठी येणा-या  भाविकांना  आरोग्याची सोय तात्काळ व्हावी यासाठी देवस्थान वतीने अँबुलन्सची सोय करण्यात यावी. महावितरणने  ग्राहकांना बील वितरीत केले जाते ते अंदाजे व चुकीचे देवून ग्राहकंवर आर्थिक  भुरदंड बसवला जातो ते बिल दुरुस्तीसाठीचे अर्ज मागीतले जातात पण त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ग्राहकांची वारंवार हेळसांड केली जाते ती हेळसांड थांबवून ग्राहकांना न्याय देण्यात यावा. 

पंचायत समितीद्वारे  मंजूर केलेले   स्वच्छालय  अनुदान अधिका-याच्या बेजबाबदारी पणामुळे स्वच्छालयाचे  बिल वेळेवर मिळत  नाही. शासनाने तुळजापूर तालुका हा दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर केला असुन दुष्काळ भागात योजना तात्काळ सुरु करण्यात यावे, तालुक्यातील अवैध रित्या चालू असलेले धंदे खुलेआम चालू आहेत त्यावर प्रशासनाचा कसलाही  धाक नसुन आवैद  धंदे तात्काळ बंद करण्यात यावे आदी मागण्यासाठी अमरण उपोषण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार सौदागर,तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे,उपाध्यक्ष जुबेर शेख,तालुका सचिव अमर शेख,सोमनाथ झाडे,जिवन साखरे,हबीब पठाण,कृष्णा सावंत,सुनिल शिंदे,आदींच्या निवेदनावर  स्वाक्ष-या आहेत 



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...