गुरुवार, ९ मे, २०१९

मुख्यमंत्र्यांनी साधला उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनास निर्देश


मुंबई, दि. 9 : दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने 

आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनासंदर्भात तक्रारी अथवा सूचनांची प्रशासनामार्फत तातडीने दखल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान येथून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी टँकर पुरवठा, चारा छावणी, रोहयोची कामे आदीसंदर्भातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


सरपंचांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ निवारणाच्या या उपाय योजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होते की नाही, त्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत का, यासंबंधी माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. दुष्काळ उपाय योजनासंदर्भात आलेल्या तातडीच्या तक्रारींवर 48 तासात कार्यवाही करण्यात येईल. तसेच दीर्घकालीन उपाय योजनांवर धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.  


उस्मानाबाद जिल्ह्यात 139 टँकर सुरू आहेत. त्यामध्ये भूम तालुक्यात सर्वाधिक 34 तर लोहारामध्ये सर्वात कमी 1 टँकर सुरू आहे. जिल्ह्यातील 30 विंधन विहिरी, 1 तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना, 742 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींची देयके ही पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार देण्यात येणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी 436.41 लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यात 85 शासकीय चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये 55 हजार 247 मोठी व 6 हजार 558 लहान अशी 61 हजार 805 पशुधन दाखल आहेत. छावण्यातील मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी 90 रुपये तर लहान जनावरांसाठी 45 रुपये अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचा विचार सुरू आहे. केंद्र शासनाच्या निकषापेक्षाही राज्य शासन अधिक निधी छावण्यांसाठी देत आहे, असेही त्यांनी सांगितले.


श्री. फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यातील 640 गावांमधील 3 लाख 79 हजार 147 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 236.17 कोटी दुष्काळ निधी जमा करण्यात आला आहे. पिक विमा योजनेत नोंदणी केलेल्या 10 लाख 40 हजार 49 शेतकऱ्यांपैकी 4 लाख 75 हजार 82 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 168.96 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील 1.71 लाख शेतकऱ्यांपाकी 60 हजार शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यातील 11.98 कोटी रुपये देण्यात आले असून ऊर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याची कार्यवाही सुरू आहे.


रोहयोतून 703 कामे सुरू असून त्यावर 7 हजार 359 मजूर काम करत आहेत. जिल्ह्यात 10 हजार 173 कामे शेल्फवर असून आवश्यकता असल्यास व मागणी केल्यास आणखीन कामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


सरपंचाच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; प्रशासनास कार्यवाहीचे निर्देश


एका सरपंचाने गावात पाणी पुरवठा योजना नादुरुस्ती अभावी बंद असल्याची तक्रार यावेळी केली. त्यावर, पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी विशेष तरतूद केली असून श्रीमती हलगुडे यांच्या गावातील पाणीपुरवठा योजनेची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले.


सरपंच अशोक काटे व उस्मानाबाद तालुक्यातील सरपंचाच्या तक्रारीवर,  नागरिकांनी मागणी केल्यास गट विकास अधिकाऱ्यांनी रोहयोतून कामे सुरू करावीत. तसेच 2018 च्या लोकसंख्येनुसार आणि माणसांबरोबरच जनावरांची संख्या गृहित धरून टँकर व पाणी पुरविण्याचे असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.


विविध सरपंचांनी टँकर, चारा छावणी आदींचे प्रस्ताव पडून असल्याची तक्रार केली. यावर टँकर मंजुरीचे व चारा छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदारांना यावेळी केल्या व या संबंधीचा अहवाल देण्याचे निर्देश दिले.


ऑडिओ संवादद्वारे आलेल्या तक्रारींची नोंद प्रशासनाने घेतली असून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच व्हॉटसअपवर आलेल्या तक्रारींचे शिघ्रगतीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, ६ मे, २०१९

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल




मुंबई, दि. 06 

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. व्यापक लोकहिताचा विचार करून या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

दुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळविल्याने दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळ सदस्यांना दौरे काढता येणार आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेशित करता येणार आहे.

दुष्काळ निवारणासंदर्भातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती देता येणार असून पाणी टंचाईच्या ठिकाणी कुपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कामांच्या निविदा नव्याने मागविण्यासह निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे तसेच निविदांसंदर्भातील इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यानुसार करार करणे आणि संबंधित कामेही करता येणार आहेत. त्यामध्ये रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


शनिवार, ४ मे, २०१९

राष्ट्रीय श्रमिक आघाडी (जि.) संलग्नः नॅशनल फ्रट ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने दि. ५ मे रोजी पत्रकार परिषद


तुळजापूर /शहर प्रतिनिधी 


श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, मधील सर्व सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी आपण राष्ट्रीय श्रमिक आघाडी (महाराष्ट्र राज्य) या कामगार संघटनेचे सभासद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रमिकांसाठी लढणारी हि संघटना कामगारांचे झुंजार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.


संघटनेचे एकूण ३९,००० सभासद असून, शासकीय, निमशासकीय, विविध संस्थान, खाजगी कारखान्यामधील कामगारांच्या न्याय व हक्कासाठी संघटना गेली २५ वर्ष लढा देत आहे.


मंदिर संस्थान प्रशासनास आपले मागणी पत्र देण्यास स्वतः संघटनेचे अध्यक्ष, यशवंत भोसले आपल्या कार्यकारणी समवेत येत आहेत. रविवार, दि.०५ मे रोजी श्री.तुळजवानी मातेचे दर्शन ११:३० वाजता घेतील, नंतर दुपारी ४:०० वाजता पत्रकार परिषद होईल त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता दशावतार मठ, सर्व सभासदांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये यशवंतभाऊ भोसले मार्गदर्शन करणार आहे. तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने आपण आपल्या परिवारासह उपस्थित राहावे. स्थानिक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधवाणी पण उपस्थित राहावे असे संघटनेचे अध्यक्ष, यशवंत भोसले यांनी आव्हान केले आहे .



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

खाकी वर्दीतुन जपला सामाजिक भाव


ळदुर्ग /प्रतिनिधी 

खाकी वर्दी म्हटली की बंदोबस्त हे समीकरणच रुढ झाले आहे.उन,वारा,पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या कर्तव्यावर सदैव तत्पर अशी ओळख या पोलिस खात्याची आहे. एवढेच नाही तर वेळप्रसंगी सणासुदीच्या दिवसातही कुटुंबापासून दुर राहून बंदोबस्ताला प्राधान्य म्हणूनच ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’हे पोलीस खात्याचे ब्रीद आहे. रस्त्यावर ही वर्दी उभी दिसली की सगळे वातावरण  नीटनेटके असते.एक प्रकारचा रुबाब त्यातून जाणवतो. सज्जनांना आधार तर दुर्जनांना धाक वाटतो. एवढ्या सगळ्या धकाधकीत समाजातील सर्व प्रकारच्या सामाजिक कामात सहभाग घेणे,काम करणार्‍यांना प्रोत्साहन देणे ही नक्कीच साधी गोष्ट नाही पण ही किमया साधली आहे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  संजीवन मिरकले  यांनी यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे संपूर्ण मराठवाडा भीषण दुष्काळाशी तोंड देत आहे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या प्रेरणेतून रामतीर्थ,नळदुर्ग येथे वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली विनाअनुदानित गोवंश चारा छावणी मागील महिन्याभरापासून सुरू आहे.दातृत्व असलेले अनेक गोप्रेमी यासाठी कार्यरत आहेत.सदरील  चारा छावणीस नळदुर्गचे पोलीस अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 1000 कडबा पेंडी साठी लागणारी आर्थिक मदत देऊन सामाजिक भाव जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, ३ मे, २०१९

वेदांत नरवडे व प्रथमेश गुंड यांची राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी


काटी/ प्रतिनिधी 

पिंपळा बुद्रूक येथील वेदांत विठ्ठल नरवडे व सुरतगावमधील प्रथमेश विठ्ठल गुंड यांनी राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत पदकांची कमाई केली. भारतीय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने व भारतीय फुटबॉल टेनिस असोसिएशन तसेच सातारा शहर जिल्हा फुटबॉल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बारावी राज्यस्तरीय खुली फुटबॉल टेनिस स्पर्धा भाऊसाहेब भिलारे स्टेडियम पाचगणी जिल्हा सातारा येथे पार पडली.


या राज्यस्तरीय स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल सोलापूर या शाळेतून प्रथमेश गुंड व वेदांत नरवडे यांनी भाग घेतला होता. चौदा वर्षांखालील गटात सिंगल प्रकारात वेदांत विठ्ठल नरवडे ७ वी याने रौप्यपदक मिळवले तर दुहेरी प्रकारात प्रथमेश विठ्ठल गुंड  याने सुवर्णपदक मिळवले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधित्व करताना या खेळाडूंनी पदकांची कमाई केली. याबद्दल विजयी खेळाडूंचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य सुझेन थॉमस, क्रीडाशिक्षक धनाजी धेंडे , राकेश घाडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले .तसेच तामलवाडी परिसरात या खेळाडूंनी हे विशेष यश मिळवल्याबद्दल सुरतगावगावचे उपसरपंच विठ्ठल गुंड , दत्तात्रय शिंदे, बालाजी चुंगे , विठ्ठल नरवडे ,सर्जेराव गायकवाड यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच परिसरातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, २ मे, २०१९

भारतबाई सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उदघाटन

तुळजापुर / प्रतिनिधी 

तुळजापुर शहर हे तिर्थ क्षेत्र असल्यामुळे शहरात भाविकांची गर्दी नेहमीच असते उन्हाळ्यात भाविकांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यास मिळवे म्हणुन तुळजापुर नगर परिषदचे माजी नगरसेवक श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी  कै. सौ भारतबाई वसंतराव सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ शहरातील  पावणारा गणपती जवळ कायम स्वरूपी पाणपोई चालु केली. 

पाणपोईचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, पाळीकर पुजारी मंडळचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी नगरसेवक पंडितराव जगदाळे,   विजय आबा कंदले माजी नगरसेवक विनोद पिटु गंगणे, श्रीकृष्ण सुर्यवंशी, संतोष साळुंके, गणेश नन्नवरे, गणेश साळुंके, माऊली भोसले, आनंद नाईकवाडी, लखन पेंदे, विजय झाडपिडे, राजामामा भोसले, सचिन गरड, महेश सिरसट, चंद्रकांत झाडपिडे, सुरेश नेपते, अजय मस्के, विश्वास भोसले व शहरातील नागरिक उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, १ मे, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत-01/05/2019

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापे 590/- रु. चा मुद्देमाल जप्त 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :-  दिनांक 30.04.2019 रोजी 18.55 वा.सु. येडशी येथील बस डेपो चौक येथे काका वडापाव सेंटर येथे काकासाहेब शेकबा जगताप रा.येडशी ता.जि.उस्मानाबाद याने बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी मुंबई मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवून खेळत व खेळवीत असताना  मुंबई मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 590/-रु. चे मालासह मिळुन आला म्हणुन काकासाहेब शेकबा जगताप याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे मजुकाचे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे 780/- रु. चा मुद्देमाल जप्त 

 

पोलीस स्टेशन येरमाळा :- दिनांक 01.05.2019 रोजी 13.30 वा. मौजे शेलगाव (दि) येथे 1) गौतम वामन सोनवणे 2) संतोष उर्फ बापू गौतम सोनवणे 3) नितीन गौतम सोनवणे सर्व रा. शेलगाव (दि) ता.कळंब यांनी देशी दारुच्या 15 बाटल्या एकुण किं.अं. 780/-रु.चा माल चोरुन विक्री करण्यासाठी बाळगलेला मिळुन आले म्हणुन वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे मदाकाचे कलम 65(ई),83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन येरमाळा यांनी केली आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 53 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 30/04/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 53 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 11 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

   मौजे बहुला येथे शेती विकुन पैसे दे म्हणुन मुलाची वडीलांना मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 28.04.2019 रोजी 15.00 वा. महादेव आण्णा बिक्क्ड यांच्या बहुला शिवारातील शेत गट नं. 31 मधील घरासमोर महादेव आण्णा बिक्कड रा. बहुला ता.कळंब यांचा मलुगा बबन महादेव बिक्कड रा.बहुला ता.कळंब याने महादेव बिक्कड यांना तुझ्या नावावर असलेली शेती विकुन मला पैसे दे या कारणावरुन भांडणतक्रारी करुन शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व हातात दगड घेवुन महादेव आण्णा बिक्कड यांच्या डोक्यात मारुन जखमी केले म्हणून महादेव आण्णा बिक्कड यांचे फिर्यादवरून बबन महादेव बिक्कड याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 324,323,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

2

 

  मौजे कदेर पाटी येथे मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 20.03.2019 रोजी 07.10 वा.सु. आळंद ते उमरगा रोडवर कदेर पाटीजवळ धनराज सुर्यवंशी रा.सावळसुर ता.उमरगा जि.उस्मानाबाद याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 9227 ही हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन बंकट मारुती कातपुरे रा. माडज ता.उमरगा जि.उस्मानाबाद यांना पाठीमागुन येवुन जोराची धडक दिली त्यात बंकट कातपुरे हे रोडवर खाली पडून त्यांच्या डोक्यास, कमरेला, पायाला व हाताला जबर मार लागला आहे व बंकट कातपुरे यांचे दातास मार लागुन दात पडले आहेत. अपघातानंतर बंकट मारुती कातपुरे यांचा भाचा व धनराज सुर्यवंशी यांनी बंकट मारुती कातपुरे यांना पुढील उपचारकामी दवाखान्यात दाखल केले म्हणुन बंकट मारुती कातपुरे यांचे एम.एल.सी.जबाबवरून धनराज सुर्यवंशी याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम

  उस्मानाबाद येथे दोन मोटारसायकलींच्या अपघातात एकाचा मृत्यु गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 06.04.2019 रोजी 21.00 वा.सु. उस्मानाबाद ते वैराग रोडवर उस्मानाबाद येथे रमेश भारत काशीद (मयत) रा.वैराग यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सी.एफ. 8467 वर बसुन उस्मानाबाद ते वैराग जात असताना उस्मानाबाद चे पुढे थोडया अंतरावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 6336 चा चालक याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल ही हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन जोराची धडक देवुन न थांबता निघुन गेला आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्याने रमेश काशीद यांना प्रथम उपचारकामी स.द.उस्मानाबाद व तेथुन पुढील उपचारकामी स.द.सोलापुर येथे दाखल केले असता उपचार दरम्यान दिनांक 10.04.2019 रोजी 04.30 वा. मयत झाले असुन त्याचे मरणास मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 6336 चा चालक कारणीभुत आहे म्हणुन रमेश भारत काशीद यांची पत्नी रेश्मा रमेश काशीद रा. वैराग ता.बार्शी यांचे फिर्यादवरून मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 6336 चा चालक याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279, 338,304(अ) सह मोवाकाचे कलम 184,134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

  मौजे कसगी शिवारात ट्रॅक्टरची जीपला धडक दोघांचा मृत्यु गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 27.04.2019 रोजी 19.35 वा. चे सु. कसगी शिवारातील चौरस्ता ते आळंद जाणारे रोडवर ब्रम्हानंद मंगल कर्यालय समोर ता.उमरगा येथे मल्लीकार्जुन नरसिंग बेळमगे रा. गुंडुर ता.बसवकल्याण जि.बीदर राज्य कर्नाटक यांची जीप क्र. एम.एच. 17 क्यु. 511 कमांडर ही कसगी शिवारातील चौरस्ता ते आळंद जाणारे रोडवर ब्रम्हनंद मंगल कार्यालयसमोर आली असता ट्रॅक्टर क्र. के.ए. 32 टी.ए. 5009 न्यु हॉलंड कंपनीचे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हयगयीने व निष्काळजीपणे राँग साईडने चालवुन मल्लीकार्जुन बेळमगे हे बसलेल्या जिपला धडक देवुन मल्लीकार्जुन बेळमगे व जीपमधील प्रतिक, व आखील, संजय उर्फ बाहु मनोहर जगदाळे, महाळाप्पा विश्वनाथ गाडेकर यांना किरकोळ व गंभीर जखमी करुन मल्लीकार्जुन नरसिंग बेळमगे यांची पत्नी शालाबाई मल्लीकार्जुन बेळमगे व कसगी ता.उमरगा येथील प्रविण राजेंद्र आलगुडे यांचे मरणास कारणीभुत झाला आहे. म्हणुन मल्लीकार्जुन नरसिंग बेळमगे यांचे एम.एल.सी. जबाब वरुन ट्रॅक्टर क्र. के.ए. 32 टी.ए. 5009 चा चालक याचे विरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338,304(अ) सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

 

 उस्मानाबाद येथे चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 27.04.2019 रोजी 11.00 वा. पासुन ते दिनांक 29.04.2019 रोजी 21.00 वा.चे दरम्यान विजय वैजीनाथ सरवदे रा. दत्तनगर तेरणा कॉलेजच्या पाठीमागे उस्मानाबाद यांचे घरातील कपाटातील लॉकरमधील ठेवलेले पाच तोळे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने , तीन ग्रॅम चांदीचे जोडवे व एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप असा एकुण 1,30,300/-रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे म्हणून विजय वैजीनाथ सरवदे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तुळजापूर येथे चोरी गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन तुळजापुर :- दिनांक 30.04.2019 रोजी 16.30 वा.सु. श्री तुळजाभवानी मंदिरात कल्लोळ तिर्थ जवळील पायऱ्यावर प्रकाश लक्ष्मण सोनकांबळे रा. आचेगाव ता.अक्कलकोट जि.सोलापुर ह.मु. जगताप डेरी विशाल नगर पुणे व त्यांचे नातेवाईक तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे दर्शनासाठी आले असता मंदिरामध्ये कल्लोळ तिर्थ येथील पायऱ्या उतरत असतांना 1) ज्ञानोबा पिराजी सनमुखराव 2) आजिंक्य रमेश सनमुखराव दोघे रा. राजनगर बाभळगाव जि.लातुर 3) विशाल वसंत सुर्यवंशी रा. लातुर यांनी संगणमत करुन विशाल वसंत सुर्यवंशी याने प्रकाश सोनकांबळे यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात हात घालुन पैशाचे पॉकेट चोरी करुन घेवुन गेला व प्रकाश सोनकांबळे हे मंदीर चौकी येथे सांगितलेवरुन तेथील कर्मचारी व सिक्युरीटी गार्ड यांनी सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे आरोपीतांना पकडले असता रोख रक्कमसह मिळुन आल म्हणून प्रकाश लक्ष्मण सोनकांबळे यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 परंडा येथे टाटा सुमो जिपची चोरी गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 20.04.2019 रोजी 21.00 वा.चे नंतर हमीद शेख रा. समता नगर परंडा यांनी टाटासुमो जिप क्र. एम.एच. 20 सी.एच. 1253 जु.वा.किं.अं. 1,50,000/-रु ची टाटा सुमो त्यांच्या घरासमोर लावली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. म्हणुन हमीद शेख यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे मसला (खु) येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 19.04.2019 रोजी 08.30 वा.सु. ज्योतिबा मंदिरात मसला (खु) येथे फिर्यादी महिला व त्याचा पती व मुलगा असे गावातील ग्रामदैवत ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते व फिर्यादी महिलेचा पती व मुलगा हे बाहेर थांबले होते व फिर्यादी महिला ही मंदिरात गेली असताना 1) गजेंद्र उर्फ पप्पु दाजी पवार 2) सागर गजेंद्र पवार दोघे रा. मसला(खु) यांनी फिर्यादी महिलेजवळ येवुन गजेंद्र पवार हा फिर्यादी महिलेस म्हणाला की, तुझ्या मुलाने माझ्या मुलीची छेड काढली आहे. छेड काढल्यावर कसे वाटते ते तुम्हाला दाखवितो असे म्हणुन वाईट हेतुने फिर्यादी महिलेच्या गळयात हात टाकुन व फिर्यादी महिलेची छेड काढुन विनयभंग केला त्यावेळी फिर्यादी महिला ही जोरजोराने रडु लागली त्यावेळी फिर्यादी महिलेचा पती व मुलगा धावत मंदिरात मंदिरात जावुन काय झाले काय झाले असे विचारत असताना आरोपीतांनी हातात काठया घेवुन सागर पवार याने फिर्यादी महिलेच्या मुलास डोक्यात व पाठीत मारहान करुन मुक्का मार दिला व गजेंद्र पवार याने फिर्यादी महिलेच्या पतीचे डावे हाताचे मनगटावर काठीने मारुन जखम केली व पाठीत मारुन मुक्का मार दिला व शिवीगाळ केली म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून 1) गजेंद्र उर्फ पप्पु दाजी पवार 2) सागर गजेंद्र पवार यांचेविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 354(अ),324, 323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

4

 मौजे कोळेवाडी येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 30.04.2019 रोजी 11.00 वा.सु. बस स्थानक कोळेवाडी येथे 1) सोमनाथ विठ्ठल आकोसकर 2) रेवणसिध्द विठ्ठल आकोसकर 3) सुदर्शन सोमनाथ आकोसकर 4) अनिल सोमनाथ आकोसकर सर्व रा. कोळेवाडी ता.जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन फिर्यादी महिलेच्या पतीस तु गोपीनाथ विठ्ठल आकोसकर यांचे शेत बघण्यासाठी का आलास असे म्हणुन मारहान करत असताना फिर्यादी महिला ही सोडवण्यासाठी गेली असता सोमनाथ आकोसकर व रेवणसिध्द आकोसकर यांनी वाईट उद्देशाने फिर्यादी महिलेची साडी फाडुन फिर्यादी महिलेचा विनयभंग करुन लाथाबुक्याने मारहान केली व फिर्यादी महिलेचा मुलगा भांडणे सोडवण्यासाठी आता असता त्यास पण रेवणसिध्द आकोसकर व सुदर्शन आकोसकर यांनी लाथाबुक्याने मारहान केली तसेच अनिल आकोसकर याने चावीच्या किचनमधील कटर ने फिर्यादी महिलेच्या पतीच्या दोन्ही हाताचे दंडावर मारुन जखमी केले म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 354,354(ब),324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे कोळेवाडी येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 30.04.2019 रोजी 11.00 वा.सु. फिर्यादी महिलेच्या शेतात फिर्यादी महिला , त्यांचा पती , मुले व दिर असे त्यांचे शेतात ट्रॅक्टरने कुळव मारण्यासाठी गेले असता 1) नवनाथ गंगाळध आकोसकर याने शेतात येवुन फिर्यादी महिलेच्या पतीस तुम्ही बांध का कुळवता असे म्हणुन शिवीगाळ केली तुम्ही गावात या तुम्हाला बघतो असे म्हणुन 2) अमरनाथ आकोसकर 3) राहुल नवनाथ आकोसकर 4) काशीनाथ निवृत्ती आकोसकर सर्व रा. कोळेवाडी ता.जि.उस्मानाबाद यांना बोलवुन घेवुन संगणमत करुन फिर्यादी महिलेच्या पतीस लाथाबुक्याने मारहान केली . फिर्यादी महिलेची मुले व दिर हे सोडवण्यास आले असता अमरनाथ आकोसकर याने फिर्यादी महिलेच्या एका मुलास चाकुने डावे हातावर मारुन  जखमी केले व अमरनाथ आकोसकर याने फिर्यादी महिलेच्या दुसऱ्या मुलास दगडाने हातावर मारुन मुक्कामार दिला व फिर्यादी महिलेच्या दिरास दगडाने व काठीने मारुन मुक्का मार दिला व नवनाथ गंगाधर आकोसकर याने फिर्यादी महिलेची साडी ओढली व दगडाने मारहान करुन कानातील झुबे तोडले म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 354,354(ब),324, 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 30.04.2019 रोजी संध्याकाळी 21.15 ते 22.00 वा.चे दरम्यान बावी पाटी ते उपळा या ठिकाणामधील रस्त्यावर महेश अंऋषी घोंगडे रा. उपळा (मा) ता.जि.उस्मानाबाद हे तेरकडुन उपळयाकडे त्यांचे घरी जात असताना बावी पाटी ते उपळा या ठिकाणी रस्त्यावर तीन आरोपीतांनी एका स्प्लेंडर मोटारसायकलवर मागुन येवुन मागे बसलेल्या चोरटयाने महेश अंबऋषी घोंगडे यांच्या मोटारसायकलला लाथ मारुन महेश घोंगडे यांना खाली पाडुन चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने बाजुच्या शेतात नेवुन महेश घोंगडे यांच्या डाव्या बगलात चाकुने जखम करुन महेश घोंगडे यांचे कपडे फाडुन त्याच कपडयाने महेश घोंगडे यांना बांधुन चाकुने दुखापत करण्याची भिती दाखवुन रोख रक्कम 5,000/-रु. एक मोबाईल किं.अं. 10,500/-रु. , एटीएम,मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व पॅन कार्ड असा एकुण 15,500/-रु चा माल जबरीने चोरुन घेवुन गेले आहेत. म्हणुन महेश अंबऋषी घोंगडे यांचे फिर्यादवरून अज्ञात तीन चोरटयाविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

5

 मौजे जवळा (नि) येथे गैरकायदयाची मंडळी जमवुन मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 10.04.2019 रोजी संध्याकाळी 07.00 वा.सु. मौजे जवळा (नि) ता.परंडा येथे फिर्यादी महिला ही वस्तीवर तिच्या राहत्या घरी असताना 1) कांतीलाल पि.दत्तु पवार 2) उमेश पि. कांतीलाल पवार 3) धिरज पि. कांतीलाल पवार 4) बाबासाहेब उर्फ बॉबीदेओल पि. कांतीलाल पवार व पाच महिला सर्व रा. सावदरवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन बेकायदेशिर रित्या जमाव करुन फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन कांतीलाल पि.दत्तु पवार याने फिर्यादी महिलेस सावकारकीची केस का केली कोर्टातील दावा काढुन घे असे म्हणाला व घरात घुसुन फिर्यादी महिलेच्या कमरेत लाथ मारुन शिवीगाळ करुन घरातुन बाहेर ओढत आणले व इतर सर्व आरोपीतांचे हातात काठया ,चैन ,सुरा हत्यार होते. त्यावेळी आरोपीतांनी फिर्यादी महिलेस लाथाबुक्यांनी मारहान करुन फिर्यादी महिलेस व तिच्या पतीस जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 01.05.2019रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 147,148,149,452,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ तुळजापूर येथे चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 01.05.2019 रोजी रात्री 00.30 ते 02.00 वा.सु. माऊलीनगर तुळजापूर येथे वैजीनाथ कुंडलीक सोनवणे रा. माऊली नगर तुळजापूर यांच्या बद घराचे किचनचा दरवाजाचे कडीकोंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील सोन्याची मोहन माळ तीन तोळयाची जु.वा.किं.अं. 60,000/-रु. व रोख रक्कम 10,000/-रु. असा एकुण 70,000/-रु चा माल चोरुन नेला आहे म्हणुन वैजीनाथ कुंडलीक सोनवणे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 






(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क -8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...