बुधवार, ४ जुलै, २०१८

राहुल गांधीनी महाराष्ट्र बाल हक्क आयोगाकडे मागितली दहा दिवसांची मुदत

राहुल गांधीनी महाराष्ट्र बाल हक्क आयोगाकडे मागितली दहा दिवसांची मुदत


उस्मानाबाद/प्रतिनिधी



महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती त्यास उत्तर देण्यासाठी अजून दहा दिवसांची मुदत मागितली आहे. 

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता.

या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटकही करण्यात आली होती. त्या आरोपींवर "पॉक्सो" अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.


 परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले प्रकरणी बाल हक्क आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली होती.


*बाल न्याय अधिनियम कायद्यातील "कलम 74" नुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर न करणे जेणेकरून त्यांची ओळख पटू नये असे म्हंटले आहे*. राहुल गांधी यांनी यासंबंधीत मुलांचा व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग झाल्याचा तसेच

 "बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा" (पॉक्सो) नुसार या आरोपींन वर गुन्हा दाखल केलेला असतानाही या कायद्यातील "कलम 23" अन्वये अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो प्रसारीत करणे गुन्हा म्हंटले आहे 

        याही कायद्याचे राहुल गांधी यांच्या कडून उल्लंघन झाल्याच्या विषयी स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी यांना महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटीस बजावली होती.


 सदर नोटीस आपणास 22 जुन रोजी मिळाल्याचे सांगुन तक्रारअर्ज मराठीत असल्याने तो इंग्रजीमधून उपलब्ध करुन देण्याची तसेच उत्तर देण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदत देण्याची मागणी कॉँग्रेसचे राष्ट्रीय  अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

मंगळवार, ३ जुलै, २०१८

भारतरत्न डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रयोग शाळेचे उद्घाटन 

इटकळ/न्यूज सिक्सर 

भारतरत्न डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रयोग शाळा उद्घाटन व केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन विस्तार अधिकारी माळी यांच्या हस्ते करण्यात आले.  ता.३ रोजी जि.प.केंद्रिय शाळा इटकळ ता.तुळजापुर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.तुळजापूर तालुक्यात पहिल्या नाविन्यपुर्ण विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शासन व सारथी या खाजगी कंपनी मार्फय सुरु केलेल्या या उपक्रमात एकुण ५२० प्रयोग ठेवण्यात आले आहेत.इयत्ता५ते८वीच्या विद्यार्थ्यांना या प्रयोगाचे प्रात्यक्षिक व माहिती देण्यात येणार आहे. या प्रयोगाची माहिती आँनलाईन हि पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमात इटकळ केंद्रामधुन इयत्ता५वी मधुन शिष्यव्रती परिक्षेत पात्र विद्यार्थी शुभम दिनेश सलगरे करुणा केशव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला व इटकळ ग्रामपंचायती तर्फे प्रत्येकी एक हजार, मा.सरपंच अझर मुजावर व अस्पाक मुजावर यांच्या मार्फत पाचशे रुपये रोख उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.केंद्रामधील सोळा शाळामधील आदला बदली शिक्षकांचे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय समीतीचे अध्यक्ष अनिल भोपळे,केंद्रप्रमुख नामदेव सुर्यवंशी,महादेव सोनटक्के,विनोद सलगरे,अविनाश पाटिल, श्री क्रष्ण मुळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी केंद्रामधील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. 


बाल आयोगाच्या शिफारशीबाबत सरोगसी कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे -प्रविण घुगे

बाल आयोगाच्या शिफारशीबाबत सरोगसी कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे -प्रविण घुगे


सरोगसीच्या व्यापारीकरणावर निर्बंध आणण्यासाठी आणि जन्मास येणार्‍या बालकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी समिती काम करेल असा विश्चास बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केला. 


देशभरामध्ये सरोगसी विषयी कायदा अस्तित्वात नसल्यामुळे अनियंत्रित चालणारी सरोगसी केंद्रे, रुग्णालय यांच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न बाल हक्क संरक्षण आयोगाने केला असून  राज्यातील सरोगसी केंद्राबद्दल कडक निर्बंध करण्याच्या शिफारशी  बालक हक्क संरक्षण आयोगाने केल्या आहेत.

 या शिफारशी पुढील प्रमाणे आहेत. 

 1. संपूर्ण राज्यामध्ये सरोगसी प्रकरणे आणि सरोगसी केंद्रे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालतील यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण मंडळ स्थापन करण्याची महत्वपुर्ण शिफारस करण्यात आली आहे.

 2. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य व गृहखात्याच्या प्रतिनिधींसोबत दोन नामवंत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असणार्‍या  कृतीदलाची स्थापना करण्यात यावी असे म्हटले आहे. हे कृतीदल रुग्णालयांची मान्यता, रुग्णालयांची नोंदणी सरोगेट आई व मूल यांच्या सुरक्षिततेच्या विषयात काळजी घेईल. याबरोबरच ही सर्व केंद्रे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालतात की नाही याबद्दलही निगराणी करेल.

3. शासन सरोगसी केंद्र नोंदणी करण्यासाठीची कार्यपद्धती व प्राधिकरण निश्चित करेल आणि त्यासंबंधिची सुचना प्रसृत करेल. 

4. सरोगसी केंद्र सुरू करणाऱ्या रुग्णालयांना या प्राधिकृत केलेल्या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे अनिवार्य असेल .

5. सरोगसी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, वैधानिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी समिती स्थापन करतील आणि  कुटुंबाचा अहवाल तयार करतील. 

6. सदर अहवाल बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 अन्वये कलम 25 नुसार स्थापित बाल न्यायालयासमोर मांडून परवानगी घेतल्यानंतरच सरोगसीची प्रक्रिया सुरू होईल. 

7. या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन होईल. सरोगसीसाठी भाडोत्री गर्भ देणाऱ्या स्त्रीचे व जन्म घेणाऱ्या मुलाच्या भवितव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार केला जाईल.


बालक संरक्षण आयोगाने दिलेल्या ऐतिहासिक शिफारशीमुळे राज्यातील सर्व सरोगसी केंद्रां वरती नियंत्रण येणार आहे या शिफारसी त्वरित लागू होतील असा प्रयत्न ही समिती करेल अशी अपेक्षा बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केली.


सरोगशीची लक्षात आलेली प्रकरणे अस्वस्थ करणारी असून या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास बाजारीकरणास आळा बसेल आणि जन्मास येणाऱ्या बालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे पाउल असेल असा विश्वास प्रवीण घुगे यांनी व्यक्त केला.

सोमवार, २ जुलै, २०१८

उस्मानाबाद पोलिसांचे नागरिकांना आवाहन

उस्मानाबाद पोलिसांचे नागरिकांना आवाहन 

 तुळजापूर/न्यूज सिक्सर

गेल्या अनेक दिवसांपासून मुले पळविणारी टोळी आली म्हणून मारहाण करण्यात आली त्यामध्ये

 अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्या अनुषंगाने उस्मानाबाद पोलीस यांच्या कडून खालील प्रमाणे आवाहन करण्यात आले आहे  सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मागील काही दिवसापासून काही समाजकंटक  व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक  जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती  पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

 

त्यामुळे जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर  विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे व ही माहीती आपल्या सर्व काॅन्टॅक्ट व गृपला शेअर करावी. असे आवाहन उस्मानाबाद पोलीस यांच्याकडून  करण्यात येत आहे.

शनिवार, ३० जून, २०१८

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने औसा चौक येथे करण्यात आला रास्ता रोको लातूर येथील आमरण उपोषणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी


लातूर/न्यूज सिक्सर 

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने औसा उमरगा तुळजापूर रोड वरती औसा चौक येथे दि 30 रोजी 12.30 च्या सुमारास रास्ता रोको करण्यात आला मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू आहे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष अंगद वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई लोंढे हे आमरण उपोषण करत आहेत आज उपोषणनाचा चौथा दिवस आहे त्या उपोषणाची तात्काळ दखल घेण्यात यावी यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला यावेळी लहुजी शक्ती सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष लातूर काशिनाथ सगट,शिवाजी लोंढे,अँड भागवत सगट,संपत गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले  खालील प्रमाणे मातंग समाजाच्या मागण्या आहेत लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथील मातंग समाजाचे पुनर्वसन करण्यात यावे,मदनसुरी ता निलंगा येथील अशोक शिंदे यांचा खून झाला असून त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे व पंचवीस लाखाची मदत करावी,पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना हटवण्यात यावे व दुसऱ्या पालकमंत्र्याची नियुक्ती करण्यात यावे तसेच पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,लातूर जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी व कुटुंबाच्या जीवाला व मातंग जातीला यापुढे जीवित हानी,आर्थिक हानी,मानसिक छळ झाल्यास याला पालकमंत्री व पोलीस अधीक्षक,महाराष्ट्र शासन यांना जबाबदार धरण्यात यावे,लातूर जिल्ह्यातील मातंग समाजावर आतापर्यंत हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे यासह विविध मागण्या आहेत

रास्ता रोको वेळी दोन्ही बाजूनी वाहनांची लांब पर्यंत रांगा होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त होता यावेळी उपस्थित असलेल्या नायब तहसिलदार यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले 

गुरुवार, २१ जून, २०१८

तुळजाभवानी महाविद्यालयात जागतिक योगदिन ऊत्साहात संपन्न             


तुळजाभवानी महाविद्यालयात जागतिक योगदिन ऊत्साहात  संपन्न           

तुळजापूर/प्रतिनिधी

,दि.२१,येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय ,तुळजाभवानी डी.एड.कॉलेज तसेच शिक्षणमहर्षी वि.रा.शिंदे हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत जागतिक योगदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचा शुभारंभ कल्याणराव सोनवणे,महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ .एस.बी.शेतसंदी,प्राचार्य दौंड ,मुख्याध्यापक वागतकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुण करण्यात आला.                  तुळजापूर नगरीतील प्रसिध्द योगगुरु प्रदीप चव्हाण यांनी योगाचे महात्म्य सांगुण सर्व ऊपस्थितांकडुन योगातील विविध प्रकारचे प्राणायाम करवुन घेतले .या जागतिक योगदिनाच्या प्रसंगी शहरातील विविध शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.             कार्यक्रमाप्रसंगी एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.डॉ .वाय.ए.डोके,एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा.जी.व्ही.बाविस्कर यांनी मोलाचे सहकार्य केले,कार्यक्रमाचे सूञसंचलन डी.एड.कॉलेजचे प्रा.विवेक कोरे यांनी केले.या कार्यक्रमासाठी शहरातील निमंञीत नागरिक ,महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनि यांनी मोठ्या ऊत्साहात आपला सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे आभार शिंदे हायस्कुलच्या सौ.मोकाशे.एस.ए यांनी मानले,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ .एस.बी.शेतसंदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

मंगळवार, १९ जून, २०१८

महाराष्ट्र बाल हक्क आयोगाची काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस



महाराष्ट्र बाल हक्क आयोगाची काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस


महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे.

या घटनेसंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता.

या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्या आरोपींवर "पॉक्सो" अंतर्गत अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली आहे.


 परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले आहे असे बाल हक्क आयोगाकडे आलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.


बाल न्याय अधिनियम कायद्यातील "कलम 74" नुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर न करणे जेणेकरून त्यांची ओळख पटू नये असे म्हंटले आहे. राहुल गांधी यांनी यासंबंधीत मुलांचा व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग होत असून तसेच

 "बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा" (पॉक्सो) नुसार या आरोपींन वर गुन्हा दाखल केलेला असतानाही या कायद्यातील "कलम 23" अन्वये अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो प्रसारीत करणे गुन्हा म्हंटले आहे 

        याही कायद्याचे राहुल गांधी यांच्या कडून उल्लंघन झालेले असल्याने *या विषयात स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी यांना महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटीस बजावली आहे.


 राहुल गांधी यांना नोटीस बजावल्या मुळे एकच खळबळ माजली असुन, राहुल गांधी यांच्यावर "पॉक्सो" कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...