बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

 तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

 

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवार दि.10 ऑक्टोबर पासून घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची तयारी सर्व प्रकारे पूर्ण झाली आहे.भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची यंत्रणा सज्ज्‍ झाली आहे.

     भाविकांना सुलभ दर्श्न व्हावे यासाठी दर्शनांची वेगवेगळया रांगातून धर्मदर्शन, मुखदर्शन यांच्या वेगळया रांगा केलेल्या आहेत. रांगांशेजारी आपतकालीन वेगळी जागा ठेवली आहे. परिसरात 4+1 मजली दर्शनी मंडप इमारत बांधलेली आहे. या इमारतीत भाविकासाठी पिण्याचे पाणी, पुरुष व महिलासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची प्रत्येक मजल्यावर सोय

 

 

करण्यात आली आहे. दर्शन रांगेत स्टीलरोलिंग, प्रत्येक हॉलमध्ये एलईडी स्क्रीनद्वारे गाभाऱ्यातील, मंदिर परिसरातील प्रक्षेपण भाविकांना पाहण्यासाठी मिळणार आहे.

          दर्शन मंडप मंदिर व मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या सूचनेनुसार सर्व ठिकाणी बॅरिकॅटींग लावण्यात आले आहेत.मंदिर संस्थानच्या वतीने परिसर स्वच्छ राहावा यासाठी

अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. हे काम तीन सत्रामध्ये जादा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कचराकुडयांसाठी डस्टबीन ठेवण्यात आलेले आहे. मंदिर परिसरात जंतूनाशक पावडरची फवारणीही करण्यात आली आहे. वेटस्वीपद्वारे सर्व स्वच्छतागृहांची प्रत्येक तासाला कामगारांकडून स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय सुलभ शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.भाविकांचे साहित्य तपासण्यासाठी प्रवेशद्वारातच दोन स्कॅनिंग मशिन बसविण्यात आल्या आहेत.

शारदीय नवरात्र महोत्सवात पूर्वापार पंरपरेनूसार श्री. देवीजींचे अनेक धार्मिक विधी होतात, यात घटस्थापना, छबीना, नवरात्राचे कालावधीत दररोज विविध अंलकार महापूजा, वैदिक होम, होमावरील धार्मिक विधी, सिमोल्लंघन, कौजागिरी पौर्णिमा, सोलापूरच्या काठयांसह छबीना ही धार्मिक विधी होतात. मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सर्व परिसर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रित करण्यात आला आहे.प्रशासनाचे विविध विभागावर नियंत्रण राहावे म्हणून मंदिरात नियंत्रण कक्ष, सहाय्यता केंद्र, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सेवा, मंदिराचे सुशोभिकरण, आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना करण्यात आली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक आर राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. आशिष लोकरे , मंदिर संस्थानचे व्यवस्थापकीय मंडळ लक्ष देवून कार्यरत आहेत.भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा तात्काळ कार्यान्वित करण्यात येत आहेत.    



(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...