गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

“आई राजा उदो, उदो” च्या गजरात श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात घटोत्थापन

“आई राजा उदो, उदो” च्या गजरात श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात घटोत्थापन


 

तुळजापुर /प्रतिनिधी

आई राजा उदो उदोच्या गजरात गुरुवार दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मंदीरातील होमकुंडावर पारंपारिक पद्धतीने अजाबली चा धार्मिक विधी सोहळा पार पडला. येथील तहसील कार्यालयातील शिपाई जिवन मोहनराव वाघमारे यांच्या हस्ते होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक सोहळा पार पडला.


तत्पुर्वी श्री तुळजा भवानी मातेचे पहाटे १ वाजता चरण तिर्थ होवुन भाविकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले होते. तसेच श्री देवीने दुर्गाष्टमीदिनी महिषासुराचा वध केल्याने शहरातील देवी भक्तांनी श्री देवीजीस गोड करंज्या आदीसह इतर वस्तुचा नैवद दाखवुन पानाचा विडा देण्यात येवुन श्री देवीजीस शहरवासियावतीने आरत्या ओवळण्यात आल्या. त्यानंतर श्री देवीजीस ५ ते ९ या कालावधीत भाविकांचे अभिषेक घालण्यात आले.


🔲शारदीय नवराञ महोत्सवाच्या ९ व्या माळे दिनी श्री तुळजा भवानी मातेची नित्योपचार करून धुपारती करण्यात आली. “आई राजा उदो उदो च्या गजरात मंदीरातील गाभाऱ्यातील घटोत्थापना करण्यात आली. संबळाच्या निनादात तुतारीच्या गजरात मंदीरातील विविध धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने पार पडले.


यावेळी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पाळीचे पुजारी प्रसाद बापुसाहेब पाटील, श्री तुळजा भवानीमातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा महंत हमरोजी बुवा पुजारी,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी सचिन पाटील, शशीकांत पाटील प्रशांत सोंजी, मुन्ना भैय्ये, कैलास पाटील, विकास मलबा, अविनाश मलबा, संजय कदम, संजय सोंजी तहसीलदार योगीता कोल्हे, प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कने, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, पाळीकर पुजारी अविनाश गंगणे, रणजीत इंगळे, रुषीकांत मगर, नरसिंग बोधले, प्रा. काकासाहेब शिंदे, आण्णासाहेब भोसले, प्रशांत अणदुरुकर, विकास शिंदे, बाळासाहेब भोसले, सतिश सांळुके, रणजीत करडे आदीसह पाळीकर पुजारी, सेवेदारी, चोपदार, छञे, पलंगे आदीसह पाळीकर पुजारी बांधव धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होते.तालुक्यातील सिंदफळ येथील अजाबली चे मानकरी गजेद्रं यशवंत लांडगे यांच्या मानाच्या अजाबली ची शहरातुन मिरवणूक काढुण अजाबली मंदीरात आणण्यात आला. त्यानंतर मंदीरातील होमकुंडावर दुपारी १२ वाजता धार्मिक सोहळा पार पडला. या धार्मिक सोहळा पहाण्यासाठी श्री तुळजा भवानी मातेचा परिसर गजबजुन गेला होता.त्याचबरोबर शहरातील नागरीकांनी पुजारी बांधवानी व पंचक्रोशीतील भाविकांनी श्री तुळजा भवानी मातेस नैवद दाखविण्यासाठी मंदीरात एकच गर्दी केली होती.यानंतर मंदीर कार्यालयात मंदीर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अजाबलीचे मानकरी गजेद्रं लांडगे व तहसील शिपाई जिवन वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. खंडे नवमीचा सोहळा पहाण्यासाठी शहरातील पुजारी बांधवासह श्री देवी भक्तानी मंदीरात एकच गर्दी केली होती. श्री तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. श्री तुळजा भवानी मंदीरात प्रचंड बंदोबस्तात मंदीरातील सर्व धार्मिक विधी पार पडले.


🔲"राञी नगरहुन येणाऱ्या पलंग पालखीचे शहरातुन मिरवणूक काढुन शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री देवीचा विजया दशमी (दसरा) पहाटे श्री तुळजा भवानी मातेचे सिमोल्लघंलन होणार आहे".

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...