बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत वाहतूक मार्गात बदल वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत वाहतूक मार्गात बदल

वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

उस्मानाबाद /प्रतिनिधी

 तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूरकडे येणाऱ्या विविध मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी या संदर्भातील आदेश नुकतेच जारी केले आहेत. दि.10 ऑक्टोबर  ते दि. 25 ऑक्टोबर 2018 पर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

          या कालावधीत तुळजापूर-सोलापूर या मार्गावर फक्त हलकी वाहने आणि परिवहन महामंडळाच्या बसेस ये-जा करू शकतील. मात्र 21 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपासून  ते  24 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण वेळ या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद

 

 

असेल  व ही वाहने मंगरुळ पाटी, इटकळ मार्गे ये-जा करतील. उस्मानाबाद-सोलापूर ही वाहतूक वैरागमार्गे होईल. उस्मानाबाद-हैद्राबाद मार्गावरील वाहने औसा-उमरगा,

 

हैद्राबादमार्गे ये-जा करतील. सोलापूर-औरंगाबाद या मार्गावरील वाहने बार्शी, येरमाळामार्गे ये-जा करतील. बार्शी-तुळजापूर या मार्गावर केवळ एकेरी वाहतूक सुरु राहील. तुळजापूरहून वाहने बार्शीला जाऊ शकतील. मात्र बार्शीहून तुळजापूरकडे येणाऱ्या वाहनांना प्रतिबंद करण्यात आलेला आहे. हैद्राबाद-औरंगाबाद या मार्गावर ये-जा करणारी वाहने उमरगा चौरस्ता, औसा, लातूर, अंबाजोगाई, मांजरसुंबा मार्गे ये-जा करतील. लातूर-सोलापूर मार्गे ये-जा करणारी वाहने मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी मार्गे सोलापूर ये-जा करतील.

          या बदलातून एस.टी. बसेसना वगळण्यात आले आहे. तुळजापूर ते सोलापूर या मार्गाने ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेस मंगरुळ पाटी-इटकळ मार्गे ये-जा करतील. सर्व प्रकारची शासकीय वाहने, महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने, सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठींची वाहने यांना या बदलातून वगळण्यात आले आहे. तरी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...