सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

ग्रंथालये ही वाचनालये व्हावीत - डॉ. पद्माकर पिटले

ग्रंथालये ही वाचनालये व्हावीत - डॉ. पद्माकर पिटले  

ग्रंथालये हि वाचकांअभावी स्मशानव्रत झाली आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेचे साक्षिदार होण्यापेक्षा त्याला आनंदयात्रेचे स्वरूप कसे आणता येईल यावर विचार झाला पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तके धूळ खात न पडू देता वाचकांपर्यंत कशी पोहचवावीत जेणेकरून ग्रंथालये हि वाचनालयांमध्ये परावर्तीत होतील. यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. पद्माकर पिटले यांनी "वाचन प्रेरणा दिनानिमित्ते आयोजित व्याख्यानात केले. 

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि  १५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ते "वाचन प्रेरणा दिनाचे" आयोजन करण्यात आले होते. डॉ. कलाम यांचा वाढदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जावा अशी त्यांची इच्छा होती. ज्ञानाने मनुष्य समृद्ध व प्रगल्भ होतो. त्याकरिता प्राध्यापक, विद्यार्थी, व सर्व शिक्षित जनामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. समृद्ध ग्रंथालयातील पुस्तके वाचकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजेत  म्हणून हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला गेला. आपण कुठल्या जातीत जन्मलो त्यापेक्षा ज्ञानाच्या बळावर आपण कुठे पोहचलो हे महत्वाचे. वेगवेगळ्या जातीत जन्मूनही अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून शेवटी पुस्तकांसोबतच या जगाचा निरोप घेतला असेही मत डॉ. पिटले यांनी व्यक्त केले.   

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य, प्रा. डी. व्ही. थोरे म्हणाले कि, सुजलाम सुफलाम संस्कृती असणाऱ्या आपल्या देशामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याची वेळ यावी ही बाब भावी पिढीसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकविसाव्या शतकामध्ये पुस्तकांबरोबरच माणसंही वाचायला शिकली पाहिजेत. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी आपण मजबूत पायाभरणी केली जाईल.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे, हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. एम. खराडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विनोद देवरकर, डॉ. एम. एस. निर्मळे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. सुजित शिंदे, प्रा. डी. डी. पांढरे,  सर्व विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद देवरकर, सूत्र संचलन प्रा. एस. पी. पसरकल्ले, तर आभार डॉ. आर. एम. खराडे यांनी मानले.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 80875414141,8432860606)

1 टिप्पणी:

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...