गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापुर तालुकाच्या वतीने निवेदन



तुळजापुर /प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील  खरिप हंगाम २०१८ मध्ये  पावसाचा सलग ८५ दिवसाचा खंड पडल्याने पीकस्थिती चांगली नसताना आणेवारी ५०% हुन अधिक दाखवली म्हणून सुधारित आणेवारी घोषित करून चुकीची आणेवारी दाखवल्याबद्दल दोषींवर कारवाई करणे बाबत उस्मानाबाद चे  उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे  यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये अनेक मागण्या करण्यात आले आहेत ७६ गावांची नजर अंदाज आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दाखवण्यात आल्याचे वृत्तपत्रातील बातम्या पाहून समजले. वास्तविक पाहता खरीप हंगामात पावसाचा जवळपास सलग ८५ दिवसाचा खंड पडला होता.त्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर बनली व हातची पिके वाया गेली आहेत.परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.



मोठा खंड पडल्याने व पिकांना जेंव्हा पाण्याची गरज होती तेंव्हाच पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील विविध गावांची पीकस्थिती मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत वाईट आहे. या हंगामात सर्वच खरीप पिकांचा उतारा २० टक्केही येणार नाही ही वस्तुस्थिती असताना महसूल विभागाने जावईशोध लावत तालुक्यातील ७६ गावांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखवली आहे.



सदर अहवाल हा अत्यंत चुकीचा असून तो वस्तुनिष्ठ नाही.प्रशासनाकडून वारंवार या चुका घडत असल्याने शासनाच्या मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



गेल्या वर्षी नुकसान झाल्याने या हंगामात हातचे पीक वाया गेले तर कांहीतरी हातभार लागावा याकरिता यंदाही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.पीक विम्याच्या दाव्यासाठी ही आणेवारी उपयुक्त ठरते. परंतु गेल्या वर्षी प्रशासनाने चुकीची आणेवारी दाखवल्याने,प्रचंड नुकसान झालेले असताना देखील उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५००० शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित रहावे लागले.



गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रशासनाने चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत ५०% हुन अधिक आणेवारी दाखवली आहे.त्यामुळे यावर्षीही उस्मानाबाद-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.



उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने बियाण्यांसाठी झालेला खर्चसुद्धा हाती येणार नसल्याचे बहुतांश गावांत चित्र आहे. काही गावांमध्ये आतापासूनच टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसाने खरीप हंगामानंतर आता रब्बीच्या आशा बेभरवशावर पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.



दरम्यान आणेेवारी काढण्याची पद्धत ही निजामकाळापासून एकच असल्याने याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतो. प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आणेेवारीवरच शासनाच्या पुढील दुष्काळी उपाययोजना अवलंबून असल्याने शासकीय लाभापासून वंचित राहण्याच्या विवंचनेने चिंताग्रस्त असलेले शेतकरी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त झाले असून त्यांच्या भावना तीव्र आहेत.



५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाबाबतचे वेगवेगळे निर्णय लागू होऊ शकतात. परिणामी शेतकऱ्यांनाही विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.



आर्थिक संकटात सापडलेला शेतकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे शासनाची व पिकविम्याची मदत मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी तातडीने प्रत्यक्ष पीकस्थिती पाहून वस्तुनिष्ठ फेर आणेवारी घोषित करावी.चुकीच्या पद्धतीने आणेवारी घोषित करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन आमदार 

 राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले 


    यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद (दादा) कंदले, महादेव जाधव, रत्नदिप भोसले, दुर्गेश साळुके, समर्थ पैलवान, सुरज जगदाळे, राम जाधव, सुलेमान शेख, ओंकार इगवे व सहकारी उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...