मंगळवार, १९ मार्च, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत - 19/ 3/ 2019

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापे 22,700/- रु. चा माल जप्त 

 

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.00 वा.सु. मारुती मंदीराचे बाजूला तेरखेडा येथे मोबीन उस्मान तांबोळी रा.इंदीरानगर तेरखेडा ता.वाशी याने बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना कल्याण मटका जुगाराचे साहित्य, एक मोबाईल जु.वा.किं.अं. 5,000/- रु. व रोख रक्कम 820/- रु. असा एकुण 5,820/-रु च्या मालासह मिळुन आला म्हणून मोबीन उस्मान तांबोळी याचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन येरमाळा यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 18.03.2019 रोजी 16.20 वा.सु. संभाजी चौक भोई गल्ली उस्मानाबाद येथे 1) शिवराज महादेव कांबळे 2) नागराज प्रभुराज काटवटे 3) राजु फुलचंद कांबळे सर्व रा.भोई गल्ली उस्मानाबाद 4) भागवत सुखदेव पेठे रा.शेरखाने गल्ली उस्मानाबाद 5) बशीर खुदबोद्दीन कुरेशी रा.कुरेशी गल्ली उस्मानाबाद यांनी बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी पैशावर तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आले. त्याचे कब्जात तिरट जुगाराचे साहित्य, तीन मोबाईल जु.वा.किं.अं. 9,500/- रु व रोख रक्कम 3,090/-रु असा एकूण 12,590/-रु च्या मालासह मिळुन आले म्हणून वरिल अरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे म.जु.काचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) यांनी केली असुन  1) शिवराज महादेव कांबळे 2) नागराज प्रभुराज काटवटे 3) राजु फुलचंद कांबळे सर्व रा.भोई गल्ली उस्मानाबाद 4) भागवत सुखदेव पेठे यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 15.40 वा.सु. एस.टी. स्टॅन्ड मागील बाजुस माकणी येथे 1) सुरेश सिद्राम औरे रा.माकणी 2) संजय इराप्पा चव्हाण रा.पेठसांगवी  यानी बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना कल्याण मटका जुगाराचे साहित्य, व रोख रक्कम 3,150/- रु. च्या मालासह मिळुन आले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन ढोकी :-  दिनांक 18.03.2019 रोजी 19.00 वा.सु. पेट्रोल पंप ढोकी चौक येथील दोस्ती खानावळचे बाजुला मोकळया आवारात राहुल दशरथ सरवदे रा.माळकरंजा ता.कळंब याने बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी मुंबई मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना मुंबई मटका जुगाराचे साहित्य, व रोख रक्कम 1,140/- रु. च्या मालासह मिळुन आला म्हणून राहुल दशरथ सरवदे याचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन ढोकी यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

2

 उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे 10,936/- रु. चा माल जप्त 

 

 

 

 

 पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.15 वा.सु. फिल्टर टाकी समोर पत्र्याचे शेडमध्ये उस्मानाबाद येथे आरोपीत महिलेने विनापास परवाना बेकादेशीर रित्या गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 42 लिटर गाहभ दारु किं.अं. 1,810/-रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेली मिळुन आली म्हणून आरोपीत महिलेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन आनंदनगर यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 19.20 वा.सु. शेलगाव दि. पाटीवर सहारा मटन शॉपचे बाजूला राहुल शामराव दिवाणे रा.शेलगाव (दि) ता.कळंब याने स्वत:चे फायदयासाठी विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या किं.अं. 988/- रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला. व पोलीसांना पाहुन मागील शेतात पळुन गेला. म्हणून राहुल शामराव दिवाणे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन येरमाळा यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन शिराढोण :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.30 वा.सु. गौरगाव ते बोरगाव जाणारे रोडलगत आरोपीत महिलेने स्वत:चे फायदयासाठी विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारु व गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 50 बाटल्या किं.अं. 2,600/-रु. व 10 लिटर गाहभ दारु किं.अं. 600/-रु व दोन कॅन्ड किं.अं. 100/- रु असा एकूण 3,300/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेली मिळुन आली म्हणून आरोपीत महिलेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन शिराढोण यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.00 वा.सु. जयवंत बाबु आंडगळे रा.पोहनेर ता.जि.उस्मानाबादयाने त्याचे घरासमोर विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या एकुण किं.अं. 950/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून जयवंत बाबु आंडगळे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन बेंबळी :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.15 वा.सु. यशराज हॉटेल धाब्यामध्ये महादेव वाडी शिवारात सतिष वसंत सपकाळ रा.उमरेगव्हाण ता.जि.उस्मानाबाद याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या एकुण किं.अं. 1,140/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व पोलीसांना पाहून पळुन गेला म्हणून सतिष वसंत सपकाळ याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन बेंबळी यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 21.05 वा.सु. खानापुर फाटयाजवळ करमाळा जाणारे रोडवर विक्रम भानुदास झिरपे रा.जामगाव ता.परंडा जि.उस्मानाबाद याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या किं.अं. 988/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला. म्हणून विक्रम भानुदास झिरपे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन परंडा यांनी केली आहे.

 

3

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 20.00 वा.सु. बसस्थानक चे पाठीमागे तावशीगड येथे गोपाळसिंग विठ्ठलसिंग रजपुत रा. तावशीगड ता.लोहारा याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 12 बाटल्या किं.अं. 660/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला. म्हणून गोपाळसिंग विठ्ठलसिंग रजपुत याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन लोहारा यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन तुळजापूर :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.50 वा.सु. बाजार कट्टयावर तुळजापूर येथे दिगंबर वसंतराव काचोळे रा.शुक्रवार पेठ तुळजापूर याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 20 लिटर गाहभ दारु किं.अं. 1,100/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला म्हणून दिगंबर वसंतराव काचोळे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन तुळजापूर यांनी केली आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 लोकांवर कारवाई 

 

 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 18/03/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 51 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी  10  हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

 मौजे पिंपळा (खु) येथे महिलेवर जबरी संभोग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तामलवाडी :-  दिनांक 15.03.2019 रोजी 10.30 वा.सु. पिडीत फिर्यादी महिला ही घरामध्ये भांडी गोळा करत असताना ती एकटी असल्याचे पाहुन संजय सुब्राव परीट (चौगुले) रा. पिंपळा (खु) ता.तुळजापूर याने अनाधिकृतपणे घरात प्रवेश करुन पिडीत फिर्यादी महिलेशी  झोंबा झोंबी करुन जबरी संभोग केला व सदर बाबत कोणास सांगितले तर तुला व तुझे लेकराला खल्लास करील अशी धमकी दिली म्हणून पिडीत फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून संजय सुब्राव परिट (चौगुले) याचेविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 376(1)(अ),452,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे गणेगाव येथे व्याजाने दिलेल्या पैश्याचे कारणावरुन आत्महत्येस प्रवृत्त केले गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन भुम :-  दिनांक 14.03.2019 रोजी 17.00 वा.सु. 1) बाळासाहेब गटकळ रा.आंबी यांना आनंता गणपत खरपुडे (मयत) रा.गणेगाव ता.भुम यांनी गुत्तेदारीचे टेंडर भरण्यासाठी  2) घनश्याम निवृत्ती अनभुले 3) हणमंत बिभिषण दसमे व त्याची आई 4) दत्ता नामदेव साळुंखे सर्व रा. गणेगाव 5) सुभाष विटकर रा.सोनारी यांचेकडुन व्याजाने पैसे घेवून ते टेंडर भरण्यासाठी बाळासाहेब गटकळ यांना दिले होते. बाळासाहेब गटकळ यास इतर आरोपीतांनी व्याजाने दिलेले पैसे मागण्याकरिता गेले असता त्यानी तुम्ही व आनंता बघुन घ्या असे म्हणाल्यामुळे व इतर आरोपीतांनी पैसे देण्यासाठी आनंता गणपत खरपुडे यांना वेगवेगळया प्रकारे मानसिक छळ करुन अपशब्द बोलुन शिवीगाळ करुन शेन काढायला लावल्यामुळे मानसिक तनावात येवुन आनंता गणपत खरपुडे यांनी गगणेगाव शिवार शेत गट क्र. 266 मधील लिंबाचे झाडास गळफास घेवून आत्महत्या केली आहे व 1) बाळासाहेब गटकळ रा.आंबी 2) घनश्याम निवृत्ती अनभुले 3) हणमंत बिभिषण दसमे व त्याची आई 4) दत्ता नामदेव साळुंखे सर्व रा. गणेगाव 5) सुभाष विटकर रा.सोनारी यांनी आनंता गणपत खरपुडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. म्हणून आनंता गणपत खरपुडे यांच्या पत्नीच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 306,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

 मौजे अणदुर जवळ ट्रकची - ट्रकला धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन नळदुर्ग :-  दिनांक 15.03.2019 रोजी 22.15 वा.सु. अणदुर स्मशानभुमी जवळ दत्तात्रय रघुनाथ कांबळे रा.अणदुर हे त्यांची ट्रक क्र. के.ए. 39 ए. 1386 ही सोलापूर ते हैद्राबाद असे जात असताना ट्रक क्र. एच.आर. 38 यु. 6321 चा चालक याने त्याचे ताब्यातील ट्रक ही हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन दत्तात्रय कांबळे यांच्या ट्रक ला समोरासमोर धडक देवून दत्तात्रय रघुनाथ कांबळे यांच्या उजव्या पायास दुखापत करुन डावे पायास मुक्कामार  लागणेस कारणीभुत झाला वगैरे दत्तात्रय रघुनाथ कांबळे यांचे एम.एल.सी.जबाबवरुन ट्रक क्र. एच. आर. 38 यु. 6321 चा चालक याचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 279,337 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 17.03.2019 रोजी 16.00 वा.सु. एल.आय.सी. ऑफीसचे बाजूस उस्मानाबाद येथे किरण महादेव लगदिवे रा. शेकापूर ता.जि.उस्मानाबाद हा त्याचे मित्रासोबत उभा असताना अनिल अर्जुन मगर व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम यांनी तु रोडचे बाजूला गाडी का उभी केली असे म्हणून शिवीगाळ करुन अनोळखी दोन ईसमांनी लाथाबुक्यांनी मारहान केली व किरण महादेव लगदिवे याचे डोक्यात दगड मारुन जखमी केले व अनिल मगर याने किरण महादेव लगदिवे याचे हातास चावा घेवून जखमी केले म्हणून किरण महादेव लगदिवे यांचे फिर्यादवरून अनिल अर्जुन मगर व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम यांचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे दाभापाटी जवळ ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन शिराढोण :-  दिनांक 06.02.2019 रोजी 20.30 वा.सु. महादेव माणिकराव ढगे पोलीस हवालदार पोलीस स्टेशन शिराढोण हे दिनांक 06.02.2019 रोजी 14.00 ते 20.00 वा.पावेतो पोलीस ठाणे अंमलदार डयुटी करुन डिकसळ येथे घरी येत असताना ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच. 5834 चा चालक याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर अचानक उजवे साईडला वळवल्याने महादेव माणिकराव ढगे यांचे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्ही 6002 हीस जोराची धडक बसल्याने महादेव माणिकराव ढगे यांचे डोक्यास , गळयास , छातीस , उजव्या पायास गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला आहे. म्हणून विजयकुमार महादेव ढगे यांचे फिर्यादवरून ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच. 5834 चा चालक याचेविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 279,337,338  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे मुलीस विशिष्ट हावभाव करुन जिवे मारण्याची धमकी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 17.03.2019 रोजी 15.30 वा.सु. पिडीत फिर्यादी मुलगी ही आजी सोबत घरी असताना अमोल महादेव राठोड रा.हाके तांडा ता.रेणापूर जि.लातूर याने पिडीत मुलीसोबत विशिष्ट हावभाव करीत पाठीमागुन पकडून खाली पाडले व तुझा झालेला साखरपुडा मोडुन टाक नाहीतर तुला जिवे मारेन अशी धमकी दिली म्हणून पिडीत मुलीचे फिर्याद वरुन अमोल महादेव राठोड याचेविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 509,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5

 मौजे बरमगाव येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा नोंद

 

पोलीस स्टेशन बेंबळी :-  दिनांक 14.03.2019 रोजी 14.00 वा.सु. फिर्यादी महिला ही तिचे मुलीचे घरी बरमगाव ता.जि.उस्मानाबाद येथे गेली असता फिर्यादी महिलेच्या मुलीस 1) अशोक ढवळे व एक महिला दोघे रा.बरमगाव ता.जि.उस्मानाबाद हे चुल उचलून दुसरीकडे का सारली म्हणून शिवीगाळ करुन मारहान करत असताना फिर्यादी महिला सोडविण्यास गेली असता अशोक ढवळे याने फिर्यादी महिलेस दगड मारुन जखमी केले व आरोपीत महिलेने ढकलून दिले वगैरे फिर्यादी महिलेच्या एम.एल.सी जबाब वरुन वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 324,.323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे खानापूर येथे मागील भांडणाच्या कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 16.03.2019 रोजी संध्याकाळी 7 वा.सु. खानापुर येथे फिर्यादी महिला ही तिचे राहते घरी असताना 1) शिवाजी नारायण मगर 2) राहुल शिवाजी मगर 3) अविनाश शिवाजी मगर 4)रंजीत शिवाजी मगर व तिन महिला सर्व रा.खानापूर ता.जि.उस्मानाबाद यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून मागील भांडणाचा राग मनात धरुन घरात येवुन फिर्यादी महिला तिचे पती ,मुलगी , आई अशा सर्वांना काठीने व लाथाबुक्याने मारहान केली व फिर्यादी महिला व तिचे मुलीस मुक्कामार दिला व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 143,147,149,324,323,452,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मा.न्यायालयात तारखेवर हजर न राहणाऱ्यांवर गुन्हे नोंद 

 

पोलीस स्टेशन भुम :-  दिनांक 19.03.2019 रोजी 11.30 वा.सु. बजरंग बाबू सोनवणे रा.चिंचपूर ढगे ता.भुम जि.उस्मानाबाद हा तहसील कार्यालय भूम चे गेट समोर मिळुन आला तो मा.न्यायालयाने काढलेल्या वॉरंट मध्ये हजर आला नाही. त्याने मा.न्यायालयाचे आदेशाचे पालन केलेले नाही. त्यास मा.न्यायालयाने जामीनावर किंवा बंधपत्रावर सोडलेले असताना काही कारण नसताना त्याने मा.न्यायालयात गैरहजर राहण्यास कसुर केली आहे. म्हणून बजरंग बाबु सोनवणे याचे विरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 229(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 19.03.2019 रोजी 09.00 वा.सु. आरोपीत महिला ही तिचे राहते घरी मौजे बरमाची वाडी ता.कळंब येथे मिळुन आली  आरोपीत महिला ही मा.न्यायालयाने काढलेल्या वॉरंट मध्ये हजर आली नाही. तिने मा.न्यायालयाचे आदेशाचे पालन केलेले नाही. आरोपीत महिलेस मा.न्यायालयाने जामीनावर किंवा बंधपत्रावर सोडलेले असताना काही कारण नसताना आरोपीत महिलेने मा.न्यायालयात गैरहजर राहण्यास कसुर केली आहे. म्हणून आरोपीत महिले विरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे भादंविचे कलम 229(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे चोरी गुन्हा नोंद  

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 19.03.2019 रोजी सायंकाळी 02.00 ते पहाटे 04.00 वा.दरम्यान माणिक चौक येथे अज्ञात चोरटयांनी चंद्रकांत भारत मोळवणे रा.माणिक चौक उस्मानाबाद यांचे प्रदिप ट्रेडर्स नावाचे सळई व हार्डवेअर चे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन दुकानातील रोख रक्कम 5,500/-रु , एक कॉम्प्युटर संच जु.वा.किं.अं. 15,000/- रु. , कॅश मशिन किं.अं. 7,000/- रु. , गार्डन पाईप चार बंडल किं.4,000/-रु व गोल्डन कंपनीचे लिक्विड दोन बॉक्स किं. 20,000/- रु. चे साहित्य चोरुन नेले व चंद्रकांत भारत मोळवणे यांचे दुकानात ठेवलेले दोन रेबन गॉगलचे व छोटा हत्ती वाहन क्र. एम.एच. 24 जे. 6614 चे काचा फोडुन नुकसान केले आहे. म्हणून चंद्रकांत भारत मोळवणे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 461,380,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6

 ऊस तोडीसाठी करार करुन पैसे घेवून काम करण्यास नकार देवुन फसवणूक  

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 10.09.2018 व दिनांक 11.01.2019 रोजी परंडा येथे अशोक श्रीमंत माळी रा.पाचपिंपळा ता.परंडा जि.उस्मानाबाद यांचे सोबत 1) भाऊसाहेब मधुकर पवार व एक महिला  दोघे रा.वडशिवणे ता.करमाळा जि.सोलापुर यांनी धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चोराखळी येथील साखर कारखान्यासाठी गळीत हंगाम साल 2018 – 2019 या सालासाठी अशोक श्रीमंत माळी यांच्या ट्रॅक्टर वर ऊसतोड कामासाठी  करार केला होता व अशोक श्रीमंत माळी यांचे कडून 60,000/-रु उचल घेतली होती. परंतु अशोक माळी यांचेकडे कामासाठी  न येता 1) भाऊसाहेब मधुकर पवार व एक महिला  यांनी संगणमत करुन त्यांची फसवणुक केली व केलेल्या कराराचा भंग करुन रकमेचा अपहार केला वगैरे वरुन अशोक श्रीमंत माळी यांनी मा.न्यायालय परंडा येथे दिलेल्या फिर्यादवरुन मा.न्यायालयाचे आदेशान्वये अशोक श्रीमंत माळी यांच्या फिर्यादवरून 1) भाऊसाहेब मधुकर पवार व एक महिला   यांचे विरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 406,420,465, 468,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उमरगा येथे अवैद्य वाळु वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले 

मा.पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे विशेष पथक (ए.डी.एस.)  :-  दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा हद्दीत मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांची टिम पेट्रोलिंग करित असताना उमरगा बायपास रोड येथे अवैद्य वाळु वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांच्या पथकाने सापळा रचून अवैद्य वाळू वाहतुक करणारे टिप्पर क्र. के.ए. 34 बी. 2010 चालक नामे राहुल जगन्नाथ थोरात रा.गुंजोटी व टिप्पर क्र. के.ए. 34 बी. 2006 चालक आकाश मनोहर वाघमारे रा.काटेवाडी यांना ताब्यात घेवून 2 टिप्पर व वाळु असे एकूण 60 लाख रुपयांचा मुद्देमाल महसुल विभागामार्फत पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन उमरगा येथे हजर केला आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी केली आहे.

 पोलीस स्टेशन तुळजापूर येथे दाखल घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस पकडले  

मा.पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे विशेष पथक (ए.डी.एस.)  :-  दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा हद्दीत मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद हे पथक पाहिजे / फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस स्टेशन तुळजापूर येथे दाखल गुरनं. 318/2018 कलम 457,380 मधील रेकॉर्डवरील आरोपी अविनाश दिलीप भोसले रा.पाटोदा पाटी हा त्याचे राहते पाटोदा येथे असल्याची माहिती मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे हजर केले आहे. सदरचा आरोपी हा चोऱ्या , घरफोडया करणारा सराईत गुन्हेगार आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी केली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 80 87 54 41 41, 84 32 86 0606

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...