मंगळवार, १९ मार्च, २०१९

निवडणूक खर्च निरीक्षण समितीमधील भरारी पथकाने अत्यंत सजगतेने काम करावे-- पी.सुधाकर नाईक

 निवडणूक खर्च निरीक्षण समितीमधील भरारी पथकाने अत्यंत सजगतेने काम करावे-- पी.सुधाकर नाईक

उस्मानाबाद,दि.19:- 

निवडणूक म्हटलं की खर्च आलाचं. लोकशाही बळकट करण्यासाठी मा.निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चावर पूर्ण लक्ष ठेवणे, ही निवडणूक खर्च निरीक्षण समितीची प्रमुख जबाबदारी आहे. त्यानुषंगाने या समितीचा प्रमुख भाग असलेल्या भरारी पथकाने अत्यंत सजगतेने काम करावे, अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक पी. सुधाकर नाईक यांनी आज येथे केली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, निवडणूक खर्च निरीक्षण समितीचे नोडल अधिकारी शेखर शेटे, उप नोडल अधिकारी अधिकारी श्री. घोटकर, श्री. सचिन कवठे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,लीड बँक मॅनेजर निलेश विजयकर आदि उपस्थित होते. 

श्री. नाईक यांनी मा. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसंबंधीच्या प्रत्येक विषयाबाबत अत्यंत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, निवडणुकीत होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत निवडणूक खर्च निरीक्षण समितीने अत्यंत सजग असणे आवश्यक आहे, या समितीमधील भरारी पथक तसेच एसएसटी टीमच्या सदस्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी तपासण्या कराव्यात, जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी, सार्वजनिक वाहनांची तपासणी करावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 

तसेच ते पुढे म्हणाले, व्हिडिओ सर्व्हिलन्सय टीमने राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या होणाऱ्या प्रत्येक रॅली, सभा, बैठका, सार्वजनिक कार्यक्रमांवर करडी नजर ठेवावी. प्रत्येक खर्चाची नोंद करावी. शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे राजकीय पक्ष व उमेदवारांनी केलेल्या खर्चाची तुलना करावी.  


श्री. नाईक यांनी या बैठकीत माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीच्या जबाबदारीविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी पेड न्यूज तसेच विविध राजकीय पक्ष व  उमेदवारांकडून प्रचाराविषयीचे सर्व प्रकारचे साहित्य, जाहिरात, जिंगल्स, व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडियावर प्रसारित करावयाचा मजकूर प्रसारित करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीकडून प्रमाणित करणे बंधनकारक आहे. याकडे या समितीने बारकाईने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सूचित केले. त्याचबरोबर त्यांनी C-VIGIL कक्ष,आचारसंहिता कक्ष,नियंत्रण कक्ष, मतदार तक्रार निवारण व मदत कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती कक्षाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व जिल्हा निवडणूक कार्यालयाने  2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

बैठकीच्या  सुरूवातीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी जिल्हाु प्रशासनाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत निवडणूक निरीक्षक श्री. नाईक यांना सविस्तर माहिती दिली तर बैठकीच्या शेवटी  निवडणूक खर्च निरीक्षण समितीचे नोडल अधिकारी शेखर शेटे यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे  आभार मानले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 80 87 54 41 41 ,84 32860606)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...