मंगळवार, २६ मार्च, २०१९

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण 23जणांनी केले 37 नामनिर्देशन अर्ज दाखल

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मंगळवार दि. 26 मार्च 2019 रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेरपर्यंत एकूण 23 जणांनी 37 नामनिर्देशन फॉर्म दाखल  केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.


       नामनिर्देशन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे -

1. श्री.राणा जगजितसिंह पाटील (मु.पो. तेर, उस्मानाबाद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), 2. अर्चना राणाजगजितसिंह पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), 3.श्री. ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (मु.पो. गोवर्धनवाडी, उस्मानाबाद (शिवसेना),4.श्री. अर्जुन सिद्राम सलगर (मु.पो. सिरगापूर, उस्मानाबाद (वंचित बहुजन आघाडी), 5.डॉ . शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पार्टी ),6.दीपक महादेव ताटे (भापसे पार्टी), 7.अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), 8.श्री. विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (मु.पो. लिंबाळा, जि. लातूर (क्रांतिकारी जयहिंद सेना),9.श्री. नवनाथ दशरथ उपळेकर (मु.पो. उपळे (मा.), उस्मानाबाद (अपक्ष),10. श्री. सुशिलकुमार दत्तात्रय जोशी (मु.पो. कारी, जि. सोलापूर(अपक्ष),  11. श्री. विष्णू गोविंद देडे, शिवाजी नगर, उस्मानाबाद (अपक्ष),12.श्री.तुकाराम दासराव गंगावणे (मु. पो. परंडा, उस्मानाबाद (अपक्ष),13.जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष),14.सय्यद सुलतान लडखान (अपक्ष), 15.अतुल विक्रम गायकवाड (अपक्ष), 16.डॉ. वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष), 17.काकासाहेब बापूराव राठोड (अपक्ष), 18.नेताजी नागनाथ गोरे (अपक्ष), 19.बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे (अपक्ष),20.शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष),21.लिंबाजी गोपा राठोड(अपक्ष),22.श्री. आर्यनराजे किसनराव शिंदे(अपक्ष),23.श्री. मनोहर आनंदराव पाटील(अपक्ष) 





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...