सोमवार, २५ मार्च, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत-25/03/2019

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापा 380/- रु. चा माल जप्त 

 

पोलीस स्टेशन वाशी  :-  दिनांक 24.03.2019 रोजी 16.50 वा. पारा चौक वाशी येथे बिभिषण पांडुरंग कवडे रा. वाशी ता.वाशी याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी सुरट नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवीत असताना मिळुन आला व सुरट जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 380/-रु चा माल जगीच टाकुन गल्लीबोळाचा फायदा घेवून पळुन गेला म्हणून बिभिषण पांडुरंग कवडे  याचेविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे मजुकाचे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन वाशी यांनी केली आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 लोकांवर कारवाई 

 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 24/03/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 23 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी  5  हजार 400 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 मौजे भातागळी येथे पाचट पेटवून देवून ठिबक सिंचन संच जळून नुकसान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 23.03.2019 रोजी  02.00 वा.सु. 1) पंडीत विश्वंभर जगताप 2) गोविंद गिरीश जगताप रा. भातागळी ता.लोहारा जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन मागील बांध फोडण्याचे कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मोहन विश्वंभर जगताप रा.भातागळी ता.लोहारा जि.उस्मानाबाद यांचे शेतातील पाचट पेटवून देवून बांधावरील व झाडावरील ठिबक सिंचन संच जळुन 2,00,000/- रु चे नुकसान झाले म्हणून मोहन विश्वंभर जगताप यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 435,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे येळी शिवारात ट्रक टेलरची टोयोटो गाडीस धडक गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 24.03.2019 रोजी  03.00 वा.सु. येळी शिवारातील अलफाईज पंपासमोर सोलापूर ते उमरगा रोड एन.एच. 65 रोडवर दिपक कन्हैयाराम वर्मा रा.विजयनगर झोपडपट्टी एस.पी.रोड ॲनटॉप हिल वडाळा ईष्ट मुंबई याने त्याचे ताब्यातील ट्रक टेलर क्र. एम.एच. 46 बी.बी. 4345 हा हयगयीने निष्काळजीपणे भरधाव वेगात चुकीच्या दिशेने चालवून सतिश नामदेव बडगे रा. जनता वसाहत मारुती मंदीर गल्ली क्र. 50 पर्वती पुणे यांच्या टोयाटो गाडी क्र. एम.एच. 12 डी.एम. 0573 ला उजव्या बाजुस जोरात कट मारल्याने सुशांत वाघमारे, पुष्पा बालाजी वाघमारे, अनिता गोविंद गरड , स्नेहल सुशांत वाघमारे यांना जखमी करणेस कारणीभुत झाला म्हणून सतिश नामदेव बडगे यांचे फिर्यादवरून दिपक कन्हैयाराम वर्मा याचेविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

2

 मौजे इंदापूर येथे किरकोळ कारणावरून मारामारी गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन वाशी :-  दिनांक 18.03.2019 रोजी  11.15 वा.सु. फिर्यादी महिलेच्या शेतात मौजे इंदापूर येथे फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा गणेश हे त्यांचे इंदापूर शिवारातील शेतात काम करित असताना त्यांचे शेताजवळच काम करणारे 1) गजेंद्र बाबासाहेब गपाट 2) बाबासाहेब नागनाथ गपाट 3) पंडीत नरहरी गपाट             4) विजय नरहरी गपाट 5) चंद्रकांत एकनाथ गपाट व तिन महिला सर्व रा. इंदापूर ता.वाशी यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन 1) गजेंद्र बाबासाहेब गपाट 2) बाबासाहेब नागनाथ गपाट यांनी फिर्यादी महिलेजवळ येवून तु आमचे शेतात बाभळीच्या काटाडया का टाकल्या असे म्हणाले तेंव्हा फिर्यादी महिलेने बाभळीच्या काटाडया आमच्या शेतात टाकल्या आहेत तुम्हाला काय अडचण आहे असे म्हणालेवरुन 1) गजेंद्र बाबासाहेब गपाट        2) बाबासाहेब नागनाथ गपाट यांनी फिर्यादी महिलेस काठीने मारण्यास सुरूवात केली तेंव्हा फिर्यादी महिला ओरडल्याने तिचे पती शेतात आल्याचे पाहुन  3) पंडीत नरहरी गपाट 4) विजय नरहरी गपाट 5) चंद्रकांत एकनाथ गपाट यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान करीत असताना सोबत काम करणाऱ्या आरोपीत महिलांनी फिर्यादी महिलेचा हात पिरगाळुन जिवे मारण्याची धमकी दिली हाणामारीत फिर्यादी महिलेच्या दोन्ही हाताच्या बोटाला मार लागला असुन उजवे हाताचे तळहातावर सहा टाके पडले असुन डाव्याहाताचे बोट व मनगट फॅक्चर झाले आहे. म्हणुन फिर्यादी महिलेच्या एम.एल.सी. जबाब वरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 143,147,148,149,325,323,504,506 सह मपोकाचे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे सरणवाडी येथे शेताचा बांध कोरल्याचे कारणावरून मारहान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 24.03.2019 रोजी  18.00 वा.सु. संतोष धोंडीराम कदम रा.सरणवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद यांना ज्ञानदेव पंढरीनाथ मुळीक रा. सरणवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद याने शेताचा बांध का कोरला म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्याने व दगडाने डोक्यात व छातीवर मारहान करुन दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन संतोष धोंडीराम कदम यांचे फिर्यादवरून ज्ञानदेव पंढरीनाथ मुळीक याचेविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे पाडोळी येथे शेतातील कोठा व साहित्य जळुन नुकसान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन बेंबळी :-  दिनांक 24.03.2019 रोजी  09.30 वा.सु.  शिवाजी नरहरी गुंड रा.पाडोळी ता.जि.उस्मानाबाद याने  राजेंद्र बाबुराव बोचरे रा.पाडोळी ता.जि.उस्मानाबाद यांचा शेतात बांधलेला कोठा जाळुन कोठयातील शेती औजारे, प्लास्टीकची टाकी, बैलगाडीचा साठा जळुन 30,000/- रु चे नुकसान केले आहे म्हणून राजेंद्र बाबुराव बोचरे यांचे फिर्यादवरून शिवाजी नरहरी गुंड याचेविरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 435 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे आलुर तांडा येथे शेतीचे कारणावरुन मारहान गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन मुरूम :-  दिनांक 16.03.2019 रोजी  08.30 वा.सु. हरी तुळशीराम राठोड रा.आलुर ता.उमरगा व त्यांचा भाऊ शंकर तुळशीराम राठोड यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरुन भांडणतक्रार होवुन व हरी तुळशीराम राठोड यांनी पोलीसात तक्रार दिल्याचा राग मनात धरुन 1) शंकर तुळशीराम राठोड याने 2) प्रदीप प्रेमनाथ राठोड 3) पवन शंकर राठोड 4) विनोद शंकर राठोड सर्व रा.आलुर ता.उमरगा यांनी संगणमत करुन हरी तुळशीराम राठोड यांचे घरी आलुर तांडा येथे शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली व प्रदीप प्रेमनाथ राठोड याने हरी तुळशीराम राठोड यांना चाकुने मारून दुखापत केली व  हरी राठोड यांची पत्नी हिस काठीने , दगडाने मारुन दुखापत केली व इतर अरोपीतांनी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून हरी तुळशीराम राठोड यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन मुरुम येथे भादंविचे कलम 324,452, 323,504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        

3

 उस्मानाबाद येथे रात्रीच्यावेळी संशयीत रित्या फिरणाऱ्यावर गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 25.03.2019 रोजी  01.30 वा.सु. प्रसाद कॉलनी उस्मानाबाद येथे ओंकार दगडू एडके रा.गावसुद ता.जि.उस्मानाबाद हा काहीतरी मालाविषयी गुन्हा करण्याचे उद्देशानेच आपले ताब्यात टॉमी (रॉड) , कोयता असे हत्यार बाळगुन इमारतीच्या ओलसावलीला संशयीत रित्या दबा धरुन बसलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे मपोकाचे कलम 122(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 25.03.2019 रोजी  09.00 वा.सु. फिर्यादी महिलेच्या घरासमोर पाणी फिल्टर टाकीसमोर उस्मानाबाद येथे फिर्यादी महिला ही 1) आकाश व  दोन महिला सर्व रा. पाणी फिल्टर टाकीसमोर उस्मानाबाद येथे यांना आमचे साबण नेले आहे का असे विचारले असता 1) आकाश व  दोन महिला यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन आकाश याने फिर्यादी महिलेस घट्ट धरले व एका आरोपीत महिलेने फिर्यादी महिलेस लाथाबुक्याने मारहान केली व दुसऱ्या आरोपीत महिलेने फिर्यादी महिलेच्या डोक्यात लाकडाने मारले त्यामुळे फिर्यादी महिलेच्या डोक्यास मार लागुन रक्त येवून तीन टाके पडले आहेत . म्हणून फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे नांदुरी येथे किरकोळ कारणावरुन मारहान व शिवीगाळ गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन तामलवाडी :-  दिनांक 24.03.2019 रोजी  09.30 वा. मौजे नांदुरी येथे भानुदास शंकर साखरे व साक्षीदार रा.नांदुरी ता.तुळजापूर हे पानटपरी जवळील कट्टयावर बोलत बसले असताना राकेश रविराज भोकरे हा त्याचे ताब्यातील मोटारासायकल अतिवेगात घेवुन जात होता. म्हणून भानुदास साखरे व साक्षीदार लोकांनी तु जोरात मोटारसायकल पळवु नकोस गाडी थांबव असे म्हणाले असता राकेश रविराज भोकरे याने गाडी थांबविली व तुम्हाला काय करायचे ते करा मी गाडी पळविणार असे म्हणून जातीवाचक बोलून थोडयावेळा नंतर राकेश रविराज भोकरे याने फोन करुन गावातील प्रशांत दयानंद नवगिरे, धनाजी मारुती सरडे, मनोज दाजी सरडे व मारुती लक्ष्मण सरडे यांना बोलावुन घेवून गैरकायदयाची मंडळी जमवून  भानुदास साखरे व साक्षीदार यांना मोटार सायकलने तुमच्या लहान मुलांना उडवुन टाकतो अशी धमकी दिली व जातीवाचक बोलून धमकी दिली म्हणून भानुदास शंकर साखरे यांचे फिर्यादवरून दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 143,147,149,504,506 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदयाचे कलम 3(1)(R)(S) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...