शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

नळदुर्ग शहरात पत्रकार भवन साठी नगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोक जगदाळे नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

नळदुर्ग शहरात पत्रकार भवन साठी नगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोक जगदाळे

नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न



नळदुर्ग/प्रतिनिधी

नळदुर्ग शहर विकास कामात नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे मोठे योगदान असून पत्रकार संघाने काढलेले सन 2019 या वर्षाचे दिनदर्शिका सर्वांसाठी उपयुक्त आसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना सांगितले.

सालाबादप्रमाणे यावर्षी ही नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने सन 2019 या वर्षी ची वार्षिक दिनदर्शिका काढली आहे. पत्रकार संघाच्या या दिनदर्शिकेचे वैशिष्ठये म्हणजे या दिनदर्शिकेमध्ये बाजारात मिळणाऱ्या दिनदर्शिकेतील माहीती असतेच या शिवाय आपल्या परिसरातील सर्व धर्मीयांचे उत्सव,सण,उरुस, जयंती व वाढदिवसाच्या यामध्ये समावेश केलेले आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका केव्हा बाहेर येते याची सर्वजण वाट पहात असतात. नळदुर्ग पत्रकार संघ गेली सतरा वर्षे दिनदर्शिका काढण्याचा हा उपक्रम राबविते. शहर पत्रकार संघाने काढलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि. 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समीतीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नगरसेवक शहेबाज काझी, नितीन कासार, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख संतोष पूदाले, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, पालिकेचे पाणी पुरवठा समीतीचे सभापती महालिंग स्वामी, नगरसेवक विनायक अहंकारी, बसवराज धरणे आदी उपस्थीत होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अशोक जगदाळे म्हणाले की, नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिका काढण्याचा उपक्रम अतिशय स्तूत्य आहे. प्रत्येक विकास कामात पत्रकार संघाचे सहकार्य आहे. पत्रकारांनी सर्व सामान्यांना न्याय देण्या बरोबरच चुकीचे काम करणाऱ्याचे कान उघडण्याचे कामे करावे, येत्या एक वर्षात शहरात पत्रकारांना पत्रकार भूवन बांधण्यासाठी पालिकेकडून जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे. विकास कामात राजकारण करु नये, शहरातील लिंगायत स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी पालिकेने 15 लाख रुपयेचा निधी देवून रस्ता तयार करण्याचे सर्व प्रक्रीया पुर्ण केली आहे. मात्र या न्यायालयीन वाद आसल्याने पालिका सध्या त्या रस्त्याचे काम करण्यात आडचणी येत आहेत. ही वस्तूस्थीती असताना कांही नेत्यांनी या मध्ये राजकारण करुन आम्ही या रस्त्याच्या विरोधात असल्याचे सांगून यात राजकारण करायचा प्रयत्न केला आहे. लिंगायत समाज यांनी अशा नेत्या पासून सावध रहावे, रस्त्याचा हा वाद लिंगायत समाज अंतर्गत आहे. त्या मुळे समाजाने हा वाद मिटविला तर पालिका एक दिवसातच या रस्त्याचे काम सुरु करेल. रस्तयाच्या कामाचे श्रेय घेण्याचा आम्ही प्रयत्न कधीच करणार नाही. आम्हाला त्या ठिकाणी फक्त रस्ता करायचा आहे राजकारण करायचे नाही असे ही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. यावेळी कमलाकर चव्हाण, शहेबाज काझी, विनायक अहंकारी, संतोष पूदाले व शिवाजीराव मोरे यांनी ही आपल्या भाषणात शहर पत्रकार संघाचे कौतुक करुन पत्रकारांनी यापुढील काळात कोणते ही असे उपक्रम राबविण्याबरोबरच अन्याय व भृष्टाचाराच्या विरोधात लिखान करावे असे म्हटले आहे.

या कार्यक्रमास मनेसेच शहराध्यक्ष जोतीबा येडगे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, शिवसेनेच्या ग्राहक कक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, काँग्रेसच्या शिक्ष्क सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, तानाजीराव जाधव, शिवाजीराव वऱ्हाडे, मल्लीकार्जून हत्ते, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र काशीद, रघुनाथ नागणे, शरद देशमुख, पत्रकार आयुब शेख, सतीश राठोडे, अशोक अलकुंठे, भगवंत सुरवसे, संजय विठठल जाधव, उमेश जाधव, नेताजी किल्लेदार, अविनाश जाधव, कुलदीप येडगे, प्रशात पवार, मनोज जाधव, नितीन शिंदे, नेताजी जाधव, सोमनाथ पवार, सोमनाथ सावंत यासह शिवशाही तरुण मंडळा व धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन तानाजी जाधव यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे सचिव गुरुनाथ कबाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, गुरुनाथ कबाडे, सदस्य विलास येडगे, लतीफ शेख, उत्तम बनजगोळे, तानाजी जाधव, प्रा. दिपक जगदाळे, अमर भाळे यांनी परिश्रम घेतले.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...