नळदुर्ग वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह संपन्न
विवाह सोहळ्याचे गेल्या चार वर्षांपासून करण्यात येते आयोजन
नळदुर्ग/प्रतिनिधी
नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 18 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह येथील एकदा मैदान येथे मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी तेरा वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिक तसे वधू-वरांच्या वऱ्हाड कडील माणसाची नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती निर्णय घेतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही इस्तेमाई शादियां( सामुदायिक विवाह सोहळा) चे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे या वर्षीही इस्तेमाई शादिया( सामुदायिक विवाह सोहळा) चे आयोजन करण्यात आले होते गेल्या चार वर्षापासून नळदुर्ग शहरात मुस्लिम समाजासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहे.नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन च्या या कार्यामुळे नळदुर्ग शहर तसेच परिसरातील गरीब मुस्लिम बांधवांना मोठा आधार मिळाला आहे पहिल्या वर्षी सात जोडप्यांची विवाहबद्ध झाले होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी 15 जोडपे विवाहबद्ध झाले होते नंतर तिसऱ्या वर्षी 9 जोडपी विवाहबद्ध झाले होते यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी तेरा जोडपी विवाहबद्ध झाले 1) औसा - आरळी 2) किरनाळी - हैद्राबाद 3)नळदुर्ग - सोलापूर 4) बादोला - आरळी 5) जेवळी - विरवळे 6) सलगरा - उस्मानाबाद 7) येवती - येवती 8) गंधोरा - सोलापूर 9) शिरशाल - निलंगा 10) अफझलपुर - कराड 11) सोलापूर - सोलापूर 12) बोरगाव - अक्कलकोट 13) उमरगा - करमळा येथील वधुवरांचा विवाह पारपडला या विवाह सोहळ्यात व्यवस्थित झालेल्या नव वधू-वरांना नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे संसारोपयोगी भांडी भेट देण्यात आली तसेच तसेच नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नागरिकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लतीफ मामा शेख, मतीन बाडेवाले, रुकणोद्दिन शेख ,युनूस शेख, बरकत जागीरदार, अमीर शेख सादिक काझी खालीद इनामदार, अफरोज पंचभाई, अशपाक कुरेशी, आलीम शेख ,वसीम कुरेशी, खमर कुरेशी आबेद इनामदार, सज्जाद सावकार मुर्तुजा मोजन, दस्तगीर जागीरदार ,शौकत कुरेशी, असलम आतार, रहेमान कुरेशी ,फक्रुद्दीन मुजावर, सिद्दिक शेख, रब्बानी शेख, गौस इनामदार, शमा काझी, ईयाज काजी, आवेज शेख ,करीम इनामदार रफिक फुलारी,बकर कुरेशी, अरफात इनामदार,यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनला उस्मानाबाद येथील हजरत हाजी शमसुद्दीन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अलहाज सय्यद नादेरउल्ला हुसेनी व त्यांच्या सहकार्यासह हारुन भाई ईनामदार यांचे सहकार्य लाभले त्या विवाह सोहळ्याप्रसंगी हाफिस व खारी सय्यद मैनुद्दिन जागीरदार व आलेम मोहम्मद रजा यांचे धर्म प्रवचन झाले यावेळी हाफिज नियामतुला इनामदार हाफिज, फारुक शेख, हाफिज मोहम्मद मुसा जमादार ,हाफेज शब्बीर शेख,शहर काजी अहेमद अली काजी यांच्या सह शहरातील हाफिज, आलीम, खारी, मुफ्ती, व धर्मगुरू यांच्या सह या विवाह सोहळ्यात नळदुर्ग व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा