बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

शिवाजी महाविद्यालयात रंगली प्राध्यापकांची काव्य मैफल - शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी केले आयोजन

शिवाजी महाविद्यालयात रंगली प्राध्यापकांची काव्य मैफल - शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी केले आयोजन 

उमरगा/ प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे आयक्यूऐसी, राष्ट्रिय सेवा योजना व वाङ्ग्मय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी "शिक्षकांचे कविसम्मेलन"  हा अभिनव कार्यक्रम राबवला. या संमेलनात दहा प्रध्यापकांनी सहभाग नोंदवला. 


शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतो. एरव्ही वर्षभर अभ्यासक्रमाच्या चाकोरित शिकवतांना स्वतःच्या कलगुणांचा विसर शिक्षकला पडणे सहाजिक आहे. याच बाबींचा विचार करुन राष्ट्रिय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिक्षकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करतच कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतांनाच आम्हाला मार्गदर्शनही करावे ऐसे आवाहन श्री अमर सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकेत व्यक्त केले. स्वयंशासन दिनाचे औचित्य साधून वाङ्ग्मय मंडळाने हा उपक्रम राबवल्याबद्दल अभिनंदन केले व भविष्यात याही पुढे जाऊन साहित्य निर्मिती करावी असे मत उपप्राचार्य प्रा डी व्ही थोरे यांनी मांडले. 

संमेलनाध्यक्ष प्राचार्य घनश्याम जाधव यांनी आईची महती गाणारी कविता सदर करुन सम्मेलनाची सुरवात केली. डॉ  चंद्रकांत पवार, डॉ अनिल गाडेकर, डॉ विनोद देवरकर, डॉ पद्माकर पिटले, डॉ एस टी तोडकर, प्रा दत्ता माने, 

प्रा पी एस बनसोडे, प्रा  व्ही टी जगताप, प्रा अंकुश गायकवाड, आदींनी कविता सादर केल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी विनोद देवरकर, राजेंद्र सूर्यवंशी, डी डी पांढरे, एस डी शिंदे, एम  एस  निर्मळे यांच्यासोबतच स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्र संचलन कु  प्रतिक्षा पाटिल व श्री अमर सूर्यवंशी यांनी केले व श्री अनिल पवार यांनी काव्यमय आभार व्यक्त केले.

(अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या,जाहिरात,वर्गणीदार, प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606,9637938555)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...