मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला धावले तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थी

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला धावले तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थी


तुळजापूर/प्रतिनिधी


अर्थशास्त्र विभागाच्या वतीने केरळ येथील पुरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी तुळजाभवानी महाविद्यालयातील विद्यार्थी पुढे सरसावले त्यांनी अर्थशास्त्र विभागाच्या माध्यमातून महाविद्यालय आणि तुळजापूर शहरात मंगळवार, (दि.१८) रोजी फेरी काढून पुरग्रस्तांसाठी मदत मागितली. या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा. मारुती लोंढे आणि डॉ.टी.एल. बारबोले यांनी पंधरा दिवसापासून उपक्रमाचे नियोजन केले होते. केरळ येथे घडलेल्या दुर्घटनेत विद्यार्थ्यांनी आपलाही त्यांचे दुःख कमी करण्यासाठी  सहभाग असावा, यासाठी खारीचा वाटा म्हणून तुळजापूर शहरातून दिवसभर फिरून मदत मागितली. या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम. मणेर  यांनी अर्थशास्त्र विभागाचे कौतुक केले व अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम महाविद्यालयांमध्ये सातत्याने घेण्यात यावेत,  अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी स्वतः सर्वप्रथम मदत पेटीमध्ये मदत टाकून या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमासाठी एन.सी.सी.चे मेजर डॉ. वाय. ए. डोके यांचे  प्रा.डॉ.फर्जाना तांबोळी, प्रा.डॉ .सी.आर.दापके तसेच ईतर सर्व प्राध्यापकवृदांनी बहुमोल  सहकार्य केले. सदर मदत फेरीमध्ये बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनिनी आपला सहभाग नोंदविला.


(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या, जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...