शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

मृतांची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

 मृतांची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 दि.15 सप्टेंबर 2018 रोजी  पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव प्रल्हाद सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून, या गुन्हयातील अज्ञात मयत स्त्री वय अंदाजे 30 ते 35 वर्ष हिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात कशाने तरी मारून तसेच छातीवर, पाठीवर, गुप्त भागाजवळ मारहाण करून तिला चटके देवून तिचा खून केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या  उददेशाने  तिचे प्रेत आष्टा मोड ते येणेगूर एन एच 65 हायवे रोडच्या उत्तर बाजूच्या कडेला आणून टाकले आहे. या गुन्हयाचा  तपास पोलीस करीत आहे.

    अनोळखी मयत स्त्रीचे वर्णन खालीलप्रमाणे:- लिंग- स्त्री, वय-अंदाजे 30 ते 35 वर्ष, रंग-गोरा, नाक- आखूड, कान- लहान, डोळे-लहान, ओठ-पातळ शरीरबांधा- मध्यम,उंची-160 सेमी, पोषाख-फिक्कट गुलाबी रंगाचा गाऊन, त्यावर जांभळे काळे रंगाची फुलाची डिझाईन असलेला, राखाडी रंगाचे स्वेटर तसेच प्रेताच्या  जवळ थोडया अंतरावर  कपडयाच्या  गाठोडयामध्ये एक गुलाबी पिवळसर निळसर रंगाचे स्कार्प, एक पांढरे गुलाबी रंगाचे लहान फ्रॉक, एक गुलाबी रंगाची लहान लेगीज व इतर लहान मुलाचे कपडे 

त्याचबरोबर अनोळखी मुलीचे वय साडेतीन ते चार वर्ष, लिंग-स्त्री, रंग-गोरा, चेहरा-गोल, केस-काळे, अंगात टीशर्ट असलेले, त्यावर FUN IN FUN IN THE SUN SWEET  असे छापलेले,  Crazy Girls या कंपनीचे स्टीकर असलेले. (या मुलीच्या संदर्भात पो.स्टे. उमरगा गुरनं 303/18 कलम 302,201 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.)

तरी यांच्याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तसेच तपास अंमलदार  मुरूम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.आय. शेख (मोबाईल क्रमांक- 9822786524)  उमरगा पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक  श्रीमती सानप (मो.नं. 8491804044) यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

                                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...