शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

तुळजापूर मध्ये पंचायत समिती च्या लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

तुळजापूर मध्ये पंचायत समिती च्या लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन


तुळजापूर /प्रतिनिधी

            पंचायत समिती परंडा येथील गट विकास अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी यांना दि 22 रोजी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून त्याच्या निषेधार्थ तुळजापूर येथील पंचायत समिती लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने दि 23 रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की  परंडा येथील गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे,प्रशासन अधिकारी सी जे पाकले यांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्या कडून जबर मारहाण करण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्या मध्ये दहशत निर्माण झाली असून त्या मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी हे लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे तसेच या आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना देण्यात आले आहे या निवेदनावर तुळजापूर लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष देविदास राजापुरे,सचिव मधुकर कांबळे, उपाध्यक्ष संतोष  मैंदंर्गी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच या लेखणी बंद आंदोलन मध्ये पंचायत समिती तुळजापूर च्या सर्व लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला या आंदोलनामुळे तालुक्यातुन पंचायत समिती ला कामासाठी  आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...