मुंबईतील ३ डान्सबारचे परवाने रद्द – पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांचे आदेश
मुंबई – मुंबई पोलिसांनी बहुचर्चित असलेल्या ३ डान्सबारचे परवाने सुनावणीअंती रद्द केले असून मुंबई पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी हे आदेश दिले आहेत . या कारवाईमुळे डान्सबार मालकांचे धाबे दणाणले आहे . परवाना रद्द करण्यात आलेल्या बारमध्ये हॉटेल इंडियाना , ऑरो पंजाब व हॉटेल साईप्रसाद यांचा समावेश आहे . या बारना २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबईमध्ये परवानगी देण्यात आली होती मात्र या प्रकरणाची सुनावणी घेऊन हे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत । गेल्या साडे तीन महिन्यांच्या काळात पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी १४ हुन जास्त डान्सबारचे परवाने रद्द केले असून एकट्या जानेवारी २०१८ या महिन्यात ५ आर्केस्ट्रा व मुंबईतील सर्व परवाने रद्द केले आहेत . मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सचिन पाटील यांनी डान्सबार विरोधात कारवाईची मोहीम हाती घेत परवाने रद्द केले आहेत . डान्स बार मधील छमछम बंद झाल्याने बार मालक लॉबी चांगलीच वैतागली आहे .
बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८
मुंबईतील ३ डान्सबारचे परवाने रद्द – पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांचे आदेश
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज
उस्मानाबाद, दि.20 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...
-
तुळजापुर/ ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदीरात शुक्रवार दि 17 रोजी पहाटे अभिषेक पास काढण्यावरुन भाविक व घुसखोर पा...
-
उस्मानाबाद, दि.20 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...
-
तुळजापूर /सिद्दीक पटेल शहरात तापमानात मोठी वाढ झाली असून, सध्या तापमानाचा पारा ३७℃ ते 43 असून रखरखत्या उन्हामुळे, उन्हाचा जाणवणारा चटका, घ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा