शनिवार, १९ मे, २०१८

राष्ट्रवादीच्या जगदाळेंची प्रचारात आघाडी शिवसेनेच्या भूमिकेमुळे सुरेश धस संकटात

राष्ट्रवादीच्या जगदाळेंची प्रचारात आघाडी

शिवसेनेच्या भूमिकेमुळे सुरेश धस संकटात

उस्मानाबाद - लातूर – उस्मानाबाद – बीड विधानपरिषद निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे मनोमिलन झाल्याने अवघड वाटणारी निवडणूक राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासाठी सोपी झाली आहे. त्यातच शेवटच्या दोन दिवसात भाजपचे सुरेश धस प्रचारात मागे पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे युतीतील घटक पक्ष असलेले शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली नसल्याने धस यांच्या संकटात वाढ झाली आहे.

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठीही ही जागा जिंकणे महत्वाचे आहे असे सांगितले. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासाठी मुंडे प्रचारात सक्रीय झाले. पहिल्या टप्प्यात त्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत.

या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या मतदारांची संख्या भाजप – शिवसेनेच्या मतांहून अधिक आहे. मात्र, विजयासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मागे ठाम राहणे तितकेच महत्वाचे आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मतदार संघाचा दौरा सुरू केला आहे. नेत्यांना भेटून अशोक जगदाळे यांना विजयाचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, प्रशांत चेडे यांचीही भेट घेतली. तसेच, कॉंग्रेसच्या नेत्या माजी खासदार रजनी पाटील, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संजय दौंड यांचीही भेट घेऊन आपलेसे केले आहे. त्यामुळे मतदारसंघातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले आहे.

 

राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे गेल्या काही दिवसांपासून मनोमिलन झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यातच शेवटच्या दोन दिवसात भाजपचे सुरेश धस प्रचारात मागे पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे युतीतील घटक पक्ष असलेले शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली नसल्याने धस यांच्या संकटात वाढ झाली आहे. सेनेचे अर्धे सदस्य पुण्यात आहेत तर अर्धे सदस्य उमरग्यात आहेत. पुण्यातील सेनेसोबतची भाजपची बैठक फेल गेल्याने धस यांच्या संकटात वाढ झाली आहे. सेनेचे नेते भाजपवाल्यासाठी नॉटरिचेबल असल्याचे कळते. त्यामुळे धस यांचा प्रचार थंड पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...