शनिवार, १९ मे, २०१८

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ - 2018च्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-       जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ - 2018च्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-

      जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे

उस्मानाबाद दि.१९-भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ - 2018 ची निवडणूक  दि.20.04.2018 रोजीच्या अधिसूचनेव्दाारे जाहीर  केली आहे .  

या निवडणुकीमध्ये श्री. सुरेश रामचंद्र धस व श्री.अशोक हरिदास जगदाळे हे अंतिम उमेदवार असून या निवडणुकीचे मतदान दि.21 मे 2018 रोजी सकाळी 08.00 ते  सायंकाळी 04.00 या वेळेमध्ये  होणार आहे. 

     उस्मानाबाद जिल्हयामध्ये एकूण 291,  लातूर  जिल्हयामध्ये एकूण 353  व  बीड जिल्ह्यामध्येे एकूण 361  मतदार असून तालुका बीड व तालुका गेवराई वगळता सर्व तहसिल कार्यालये हे मतदान केंद्र आहेत.  उपविभागीय अधिकारी कार्यालय,बीड हे बीड तालुक्यातील मतदारांसाठी व गेवराई नगरपरिषद कार्यालय हे गेवराई तालुक्यातील मतदारांसाठी मतदान केंद्र आहेत.  

       सर्व उप‍ विभागीय अधिकारी  हे झोनल अधिकारी असून  तहसिलदार मतदान केंद्राध्यक्ष आहेत. 14 झोनल अधिकारी,  29 मतदान केंद्राध्यक्ष व 145  मतदान अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांमध्येे  मतदारांची ओळख पटविण्यासाठी स्थानिक प्राधिकारी संस्थांचे  02 (दोन ) कर्मचारी असे एकूण 58 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.  

      प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.              

       मतदान अधिकारी/कर्मचारी दि.20 मे 2018 रोजी संबंधित मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह दाखल होणार आहेत. 

      मतदान  प्रकियेचे सकाळी 07.00 वाजल्यापासून मतपेटी सील करण्यापर्यंत अखंडीत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. 

       या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रामध्येट कोणत्या्ही प्रकारचे पेन, मोबाईल, टॅब, डिजीटल / इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रीक संयंत्र घेवून जाण्यास प्रतिबंध असून या बाबीचा उल्लंघन केल्यास आयपीसी 188 प्रमाणे शिक्षेस पात्र ठरतील व मुद्येमाल जप्त करण्यात येईल. 

       या  मतदानामध्ये मतदान हे पसंतीक्रमांकानुसार असून केवळ आयोगामार्फत पुरविण्यात आलेल्या जांभळया रंगाच्या‍  मार्कर पेननेच मतदान नोंदवावयाचे आहे.   

    आयोगामार्फत दि.19 मे, 2018 रोजी प्राप्त झालेल्या   मार्गदर्शनानुसार  दि.03 मे 2018 रेाजी जे मतदार अंतिम  मतदारयादीत समाविष्ठ होते त्या सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.  

    या मतदानाची मतमोजणी दि.24 मे 2018 रोजी सकाळी 08.00 वाजता तहसिल कार्यालय उस्मासनाबाद येथे होणार आहे.  मतमोजणीसाठी आवश्यक त्या  सर्व अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्याद आली आहे, अशी माहिती 

जिल्हाधिकारी  उस्मानाबाद तथा निवडणूक निर्णय अधिकारी 26-उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड

स्थानिक प्राधिकारी मतदार संघ, उस्माानाबाद श्री.राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...