शनिवार, २७ जानेवारी, २०१८

शेकापचे जेष्ठ नेते भाई प्रकाशराव देशमुख यांचा उद्या नागरी सत्कार

शेकापनेते माजी नगराध्यक्ष भाई प्रकाशराव देशमुख यांचा आज नागरी सत्कार
ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून होणार गौरव
सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांचा सहभाग

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापुरातील शेकापचे ज्येष्ठ नेते भाई प्रकाशराव देशमुख यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा आज रविवार दि.२८ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. राज्यासह मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची या सत्कार सोहळयाला उपस्थिती राहणार आहे.
शहरातील शुक्रवार पेठेतील सुरेख स्मृती, आठवडा बाजार मैदानावर हा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा पार पडणार असून या समारंभास महाराष्ट्र विधीमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आ.गणपतराव देशमुख, राज्याचे सहकारमंत्री ना.सुभाषराव देशमुख, माजीमंत्री आ.मधुकरराव चव्हाण, खासदार रविंद्र गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहूल मोटे, आमदार ज्ञानराज चैगुले, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार बाळाराम पाटील, तुळजापूरच्या नगराध्यक्षा सौ.अर्चनाताई गंगणे, माजीआमदार नरेंद्र बोरगांवकर, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, माजी आमदार विवेक पाटील, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील,भाजपाचे जेष्ठ नेते  अॅड.मिलींद पाटील, माजी नगरसेवक अशोकराव मगर, उपनगराध्यक्ष पंडीत जगदाळे, माजी जि.प.अध्यक्ष अॅड.धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष खलीलसाहेब शेख, गटनेते न.प. संतोश कदम, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, अमरराजे परमेश्वर,अनंत कोंडो यांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे.

भाई प्रकाशराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत. सन १९६६ पासून २००१ या ३५ वर्षाच्या कालावधीत ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच १९७७ ते १९९६ या कालावधीत सहावेळा सुमारे पंधरा वर्ष त्यांनी शहराचे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
आणीबाणीच्या काळात पक्षाचे नेते अटकेत असताना त्यांच्यावतीने कायदेशीर लढाई करून न्यायासाठी लढा देण्यात त्यांचा पुढाकार होता.
१९९३ च्या प्रलयंकारी भूकंपामध्ये क्षतीग्रस्त झालेल्या तुळजापूर तालुक्यातील धनेगावचे पुनर्वसन त्यांनी आपल्या पाच एकर शेतात केले आहे.
एक तात्विक राजकारणी आणि समाजकारणी म्हणून देशमुख यांची ओळख आहे. शेकापचे खंदे नेते असूनही त्यांचे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे  राजकारणापलिकडचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अशा अजातशत्रू, मनमिळाऊ ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या प्रकाशराव देशमुख यांच्या सर्वपक्षीय आणि तालुक्यातील नागरिकांच्या वतीने होत असलेल्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यास सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष सौ.अर्चनाताई गंगणे, गौरव समितीचे कार्याध्यक्ष माधवराव कुतवळ, अध्यक्ष नगरसेवक अमर मगर यांनी केले आहे.

या सत्कार सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून तुळजापूरनगरीच्या वतीने प्रकाशराव देशमुख यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तुळजापूर नगरपालिका व इतर ७५ सामाजिक संस्था त्यांचा मुख्य कार्यक्रमानंतर सत्कार करीत आहेत.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी १५ विविध समित्या करुन कामाची विभागणी केली आहे, सर्वपक्षीय ४० पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते  महिनाभरापासून याचे नियोजन करीत आहेत. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, सोलापूर आदी भागातून प्रकाशराव देशमुख यांच्यासोबत काम केलेले विविध राजकीय नेते कार्यक्रमास आपली उपस्थिती लावणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...